संत चोखामेळा म. चरित्र ११

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत चोखामेळा भाग  –  ११.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

सुदामाने पुढे होऊन नामदेवांचे स्वागत केले.लग्नघटिका भरली. मंगलाष्टकं झाली.अंतरपाट दूर झाला. सोयरा-चोखोबांनी एकमेकांच्या गळांत माळा घातल्या.एकमेकांच्या साथीने उभ्या आयुष्याची संगत करुं पाहणारे दोन जीव एका अनोख्या बंधनांत बांधल्या गेले.लगीन लागले आणि जेवणाची एकच गडबड उडाली.जेवणा चा बेत छान होता.भेटायला येणार्‍या प्रत्येकाच्या पायावर डोके ठेवुन वधु वर नमस्कार करत होते.नामदेव बोहोल्या जवळ आल्यावर दोघांनी त्यांच्या पाया वर डोके ठेवले.नामदेवांनी दोघांना खांदे धरुन उभे केले.नामदेवांनी चोखोबाला मिठीत घेत म्हणाले,चोखोबा!पत्नीचा योग्य सन्मान ठेवुन सुखाने केलेला संसार म्हणजे एक प्रकारची देवभक्तीच आहे.ही भक्ती करतां करतां पांडुरंगाचे नामस्मरण पण करा.अंतस्फुर्तीने सोयरा पुन्हा नामदेवांच्या पायाशी वाकली.प्रसन्नतेने नामदेवांनी सुखी संसाराचा आशिर्वाद दिला. चोखोबा सोयराचा विवाह सोवळा मोठ्या उत्सुकतेने व आनंदाने पांडुरंग बघत होता.नामदेव-चोखाची ह्रदयस्पर्शी भेट तो डोळे भरुन बघत होता,चोखोबा सारखा सालस,प्रांजल भक्ताला नामदेवा च्या हाती सोपवुन देव निश्चिंत झाले.

वाजत गाजत वरात चोखोबाच्या दारात आली.उंबरठ्यावरचे माप ओलांडुन लक्ष्मीच्या पावलाने सोयरा चोखोबाच्या घरांत,संसारात,जीवनांत प्रवेशली.दोघांचा संसार सुरु झाला. सोयरा कामाला वाघीन होती.सासर्‍या च्या मागे लागुन दोन शेळ्या आणवल्या. परसदारी फुलझाडं,भाजीपाला लावला. संसार बहरु लागला.निर्मळा विवाहयोग्य झाली होती.ऐके दिवशी निर्मळा व सोयरा जात्यावर दळण दळीत असतांना सोयराने जनाबाईचा अभंग आपल्या सुस्वरात म्हटल्यावर त्याचे विश्लेषण निर्मळा विचारत होती.दोघींचा संवाद आंत सुरु असतांना चोखा नामदेव घरी आलेत.दोघींचा संवाद ऐकत तिथेच स्तब्ध उभे राहिले.निर्मळाचे प्रश्न संपत नव्हते.शेवटी सोयरा म्हणाली,पुरे आता..

नामदेवांसारख्या थोर विभूतीला दाराशी ताटकळत उभे रहावे लागल्याने एरवी शांत,समंजस चोखाला राग यायला लागला.याउलट नामदेवांना दोघींचेही विशेषतः जनाबाईच्या अभंगाचे साध्या सोप्या भाषेत सोयराने समजावुन सांगण्याच्या विलक्षण हातोटीचे कौतुक वाटले.चोखोबांसारख्या विठ्ठलानजीक जाऊ पाहणार्‍या भक्ताला अशी बुध्दीमान बायको मिळाल्याचे समाधान वाटले.दोघे घरांत प्रवेशले.त्यांच्यासाठी फराळाचे घेऊन आलेल्या दोघींनी नामदेवांना वाकुन नमस्कार करुन आंत जाऊ लागल्या तोच नामदेवांनी थांबवले. सोयराच्या समजाऊन सांगण्याच्या पध्दतीचे व निर्मळाच्या चौकसपणाचे कौतुक करीत म्हणाले,चोखोबा!तुम्ही खरोखरच नशीबवान आहांत.तुमची पत्नी या घरची लक्ष्मी तर आहेच पण सरस्वतीचे गुणही तिच्या अंगी आहेत.लक्ष्मी आणि सरस्वतीचे गुण एकत्रीत असणारे फार कमी व्यक्ती असतात.तुमचा संसार आदर्श ठरणार आहे.धन्य ती विठुमाऊली आणि धन्य तिचं भक्तावरील प्रेम!असे म्हणुन म्हणाले

“चोखोबा न लगे सायास जावे वनांतर।
सुखे येतो घरा नारायणा ।।”त्याचबरोबर इथे कुलजाती,वर्ण सारेच अप्रमाण आहे.
“अंतरी निर्मळ,वाचेचा रसाळ
त्याचा गळा,माळ असो नसो।।

नामदेवाचे बोलणे सर्वच जणं तल्लिनतेने ऐकत होते.नामादेवांसारख्या महान व्यक्तीने कौतुक केल्यामुळे सोयरा संकोचुन गेली.पंढरपूरला परत जातांना नामदेव म्हणाले,पुन्हा मी नक्की येईल असे आश्वासन देऊन ते निघुन गेले.कां कुणास ठावुक,भविष्य सागणार्‍या त्या साधुत आणि नामदेवांत चोखांना विलक्षण साम्य वाटले. चोखोबाचा विवाहसोहळा बघत असतांना चोखा संसारात गुरफटुन आपला विसर तर पडणार नाही ना?अशी बारीकशी भीती त्या विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाला वाटली होती,पण आजचा सारा प्रसंग,आधी दोघींचा नंतर नामदेवांचा संवाद ऐकुन आपली भीती निरर्थक असल्याची खात्री पटली.चोखा च्या उत्कट भक्तांतुनच भव्य काम होणार होते,आणि या भव्य कार्यात सोयराचा सहभाग असणार होता. सावित्री घरी आल्यावर घडलेली सर्व हकिकत ऐकुन तिचा उर अभिमाना ने भरुन आला.आतां सर्वांना निर्मळाच्या लग्नाचे  वेध लागले होते.अशातच आषाढी एकादशी आली.नामदेवादी संत मंडळींबरोबर राहण्यासाठी ८-१५ दिवस पंढरपूरला जाणार हे चोखोबांनी आधीच सांगीतले होते.आतुरतेने त्या दिवसाची चोखोबा वाट बघत होते.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *