संत चोखामेळा म. चरित्र २६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत चोखामेळा भाग  –  २६.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

केशवभटाच्या कांगाव्यावर सावतामाळ्याने आक्षेप घेत म्हणाले, क्षुल्लक गोष्टीला भयंकर रुप देऊन गवगवा करण्याची या लोकांना जुनी खोड आहे.यांत कसला आलाय देवाचा कोप?प्रसंगाचे गांभीर्य,ब्राम्हणवृदांचा रोष लक्षात न घेता,सावतामाळी मधे बोलल्या मुळे केशवभट संतापाने भान हरपुन त्यांंना अपमानकारक बोलुन पानउतारा केला.प्रसंगाचा रागरंग बघुन हस्तक्षेप करुन घडणारा प्रसंग थांबवला पाहिजे हे लक्षात आल्यावर ज्ञानदेवांनी आपली नजर उर्ध्व लावली.दुसर्‍याच क्षणी प्रसन्न चेहर्‍याने ते केशवभटाला म्हणाले, चोखां च्या घरी जेवण केल्याने धर्मबाह्य व महा पातक माझेकडुन घडल्यानेच विठ्ठलाचं तीर्थजल कडु व अशुध्द झालय अशी सर्व धर्मवृदांची धारणा झाली ना?तर त्याचा इलाज आतांच करु या!तेव्हा विलंब न लावतां तीर्थजलाचं मोठं पात्र आणने  शक्य नसल्यामुळे त्यांतील  तीर्थ जल एका छोट्या कलशात आणुन तो शुध्द करुन न्या.ते देवाचे तीर्थ असल्या मुळे सगळ्या समष्टींचा त्यावर अधिकार आहे.ब्राम्हणवृदांना हरकत घेण्याचे कारण नाही.

केशवभट त्वरेने मंदिरात जाऊन एका कलशात मोठ्या पात्रातील थोडे तीर्थजल कलशात ओतले व चव बघीतली तर अजुनही तेवढच कडूशार होते.तो छोटा कलश घेऊन ते साक्षीदारां सह तो चोखोबांच्या घरी परत आला. वाढुन ठेवल्याला पानावर मंडळी अजुन ही तिष्ठत बसली होती.केशवबरोबरच्या गर्दीबरोबर पंढरपूरचे कांही धर्मकांड व ब्राम्हणवृंदही होते.केशवभटाने कलश आणलेला पाहुन ज्ञानेश्वरादी भावंडांसह पानावरुन उठुन सारे संत त्याला सामोरे गेले.कलशाला मनोभावे नमस्कार केला.

केशवभट तुम्ही स्वतःच तो कलश आंत  आणा.माझा स्पर्श झाला तर कांही जादु टोणा करुन लोकांना फसवतो असा आरोप नको यायला.कलश घेऊन केशव भट चोखोबांच्या दाराशी आला,आंत जायला मात्र त्याचे मन धजवेना.त्याचा जास्त अंत न पाहतां म्हणाले,एकदा पुन्हा तीर्थ कडू असल्याचा पडताळा पहा केशवभटने चव बघीतल्यावर तीर्थ तसेच कडू होते.त्यांनी चोखोबांना समोर बोलावुन त्या तीर्थजलात बोटं बुडवुन चव घ्यायला सांगीतली.जर तुम्हाला कडु  लागले तर नक्कीच त्या पांडुरंगाचा कोप आहे.चला पुढे व्हा…पांडुरंगावर असलेल्या माझ्या भक्तीची ही कसोटी आहे,आपण वारकरी,भक्तीसंप्रदायाचे पाईक आहोत.देव एकच आहे यावर आपला विश्वास आहे.या सर्व गोष्टींचा आज कस लागणार आहे.बोलतां बोलता ज्ञानदेवांचा आवाज चढला.हा क्षण त्यांच्याच नव्हे तर सर्वांच्याच कसोटीचा परीक्षेचा होता.कसोटी होत त्यांची विठ्ठलावरच्या अधिकाराची,परीक्षा होती त्यांच्या भगभद् भक्तीची आणि सत्व पणाला लागणार होतं सार्‍या संतमंडळींच!

हे काय भलतच!तीर्थपात्राचं दर्शन ही ज्यांना दुर्लभ अशा अस्पृश्याला तीर्थात बोटं बुडवायला सांगताहेत, चोखोबांची अवस्था मोठी विचित्र झाली. ज्ञानदेवांच्या आज्ञेने ते अंतर्बाह्य थरारले, घाबरले.आदेश मोडवतही नव्हता व पाळवतही नव्हता.त्यांची स्थिती पाहुन म्हणाले,कसला विचार करतां?आपण पांडुरंगाचे निस्सीम भक्त आहोत हे सिध्द करण्याची वेळ आली आहे.कसलीही भिती न बाळगतां कलशात बोटं बुडवुन तीर्थ चाखुन बघा.धाडस एकवटुन चोखोबांनी कलशाला हात जोडत, विठ्ठलाचे नामस्मरण करुन उजव्या हाताची बोटं कलशात बुडवुन बाहेर काढली व तोंडात घातली.

आss हाss हा ss अत्यंत मधूर चव! साक्षात अमृतच!हे ऐकुन आपण काय करतो हे भान विसरुन केशवभटाने बोट बुडवुन चाखुन बघीतले,काय आश्चर्य! खरोखरच तीर्थाची चव अमृतासारखी मधूर होती.केशवभटाचा विश्वासच बसेना तो वारंवार तीर्थ चाटु लागला,त्याचे बघुन सोबत आलेल्या चिंतोपंतानीही चाटुन बघीतल्यावर,आश्चर्य,चमत्कार..चमत्कार तीर्थ मधुर झाले म्हणुन ओरडत इकडे तिकडे पळुं लागला.जमलेला जमाव आश्चर्यचकीत झाला.खरे भगवद्भक्त सर्व जातीधर्माच्या पलीकडे असतात हे परत एकदा सिध्द झाले.समुदायाने ज्ञानेश्वरादी भावंडांचा जयजयकार तर केलाच,पण चोखोबांचाही जयजयकार करुं लागले. लोकांच्या उत्साहाला नुसते उधाण आले. तीर्थकलश वाजतगाजत मिरवणूकीने नेण्याची तयारी होईस्तोवर सर्वांनी जेवणं उरकली.सहाजिकच कर्ममेळाचे बारसे अत्यंत आनंदात पार पडले

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *