संत संताजी महाराज जगनाडे संपूर्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Sant Santaj Maharaj Jagnade Death Anniversary
Sant Santaji Maharaj Jagnade Punyatithi

तेली समाज गुरुगुरु गोरखनाथ
नावसंत श्री संताजी विठोबा जगनाडे
जन्म८ डिसेंबर १६२४ मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी
जन्मस्थळसुदुंबरे, तालुका- मावळ, महाराष्ट्र
समाधीइ.स १६८८
वडीलविठोबा भिवाजी जगनाडे
आईमथुबाईं (मथाबाई किंवा माथाबाई,)
पत्नीयमुनाबाई
मुलगाबाळोजी
मुलगीभागू (भागूबाई)
समाजतेली
गुरुसंत तुकाराम
साहित्य‘तेलसिंधु’, ‘शंकरदीपिका’
कार्यसंत तुकाराम महाराज अभंग गाथा लेखन, भजन, किर्तन, ज्ञानदान.

संत संताजी महाराज जगनाडे यांचा जन्म
मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला पुणे जिल्ह्यातील चाकण येथे झाला. अंदाजे इ.स. १६२४ दरम्यान झाला,

समाधी – मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी इ. स. १६८८ साली संताजी महाराजांनी देह ठेवला.
इ.स. १६८८ ला
९ फेब्रवारी २००९ रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या काळात त्यांच्यावरील एक पोस्टाचं तिकीटही निघालं.

संत संताजी महाराज जगनाडे हे संत तुकारामांनी रचलेल्या अभंगांच्या संग्रहाचे – अर्थात तुकाराम गाथेचे – लेखनिक करीत

महाराष्ट्रातील पुणे जिल्यातील सुदुंबरे गावी त्यांचे वास्तव्य होते.
संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा इहलोकात आगमन ८ डिसेंबर १६२४ रोजी महाराष्ट्र मध्ये पुणे जिल्ह्यात खेड तहसील मधील मावळ या गावी विठोबा जगनाडे यांच्या पोटी झाला

बालपण
संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुंब्रे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला.
विठोबा जगनाडे व आई मथाबाई हे विठ्ठलभक्त होते, त्यामुळे संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. तेल्याचे घर असल्यामुळे मुलांला हिशोब करता येणे गरजेचेच असते त्यामुळे संताजी महाराजांना देखील लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण घेतले होते. घरची परिस्थिती चांगली होती त्यामुळे संताजी महाराजांना कसली कमी पडली नाही संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. कीर्तनाला, भजनाला जाण्याची सवय लागली. कीर्तनाची आवड त्यांच्यात बालपणीच निर्माण झाल्यामुळेच ते नंतर संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्या पैकी एक झाले..

आई बापाचे संस्कार कामी आले

संताजी महाराज बालपणीची रोज आपल्या आईसोबत गावातील चक्रेश्वर मंदिरात जात. गावातील या मंदिरात आई पूजा करायची आणि देवाला नैवेद्य अर्पण करायची. चक्रेश्वराच्या मंदिरात अनेकजण आश्रयाला राहत.

एके दिवशी एक भुकेने व्याकूळ झालेला मनुष्य त्यांना दिसला. संताजींनी नैवेद्याचं ताट त्या भुकेल्या माणसाला दिलं. तो तृप्त झाला. मात्र नैवेद्यासाठी आणलेलं ताट संताजींनी कुणालातरी दिल्याने आई रागावली. त्यावर संताजी महाराज म्हणाले मी, ज्याला अन्नाची जास्त गरज आहे त्याला पहिल्यांदा ते दिलं पाहिजे. लहानपणीच त्यांना माणसातील ईश्वर दिसला.

संताजी जगनाडे महाराजांचा विवाह
संताजी महाराजाचे आजोबा भिवा जगनाडे यांच्या कडे मोठा तेलाचा घाणा होता. तेलाचा हा व्यवसाय तेली समाजाचा पारंपारिक व्यवसाय, पुढे हा व्यवसाय त्यांचा मुलगा विठोबा यांच्याकडे आला. विठोबा यांचं लग्न सुदुंबरे येथील काळे परिवारातील मथुबाईंसोबत (मथाबाई) झालं. विठोबा आणि मथाबाईंच्या पोटी संताजी महाराजांचा जन्म झाला. विठोबा जगनाडे व आई माथाबाई हे विठ्ठल भक्त होते त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर धार्मिक संस्कार झाले व धार्मिकता त्यांना आवडत असे.

संताजींमहाराजांचे शिक्षण त्या काळाच्या पद्धतीनुसार हिशोब करण्यापुरते झाले. आणि ते झाल्यानंतर त्यांनी आपल्या पारंपरिक व्यवसाय म्हणजे तेल गाळण्यास सुरुवात केली.

त्याकाळी बालविवाहाची प्रथा होती त्यामुळे संत संताजी महाराजांचा विवाह खेड येथील कहाणे परिवारातील यमुनाबाईंसोबत त्यांचं लग्न झालं. वयाच्या १२ व्या वर्षीच यमुनाबाईशी विवाह झाला व ते संसाराच्या बेडीत अडकले. आणि आता त्यांचे लक्ष फक्त कुटुंबावरच लागले. त्याच बरोबर त्यांना जसा वेळ मिळेल त्यानुसार भजनाला कीर्तनाला ही जात असत. त्यांच्यावर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार असल्यामुळे त्यांचे कुटुंबापेक्षा जास्त लक्ष सामाजिक कार्यात होते, पुढे चालून त्यांना बाळोजी व भागू ही मुलं झालीत.

गुरु भेट व विरक्ती
आता त्यांचे लक्ष्य फक्त कुटुंबावरच लागले. त्या काळी वारकरी संत परंपरेतील संतांचे समाजाला कीर्तने अभंगांच्या माध्यमातून शिकवण देण्याचे कार्य चालू होते. तेव्हा संत तुकाराम महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती असेच एकदा संत तुकाराम महाराज संताजींच्या गावी कीर्तनासाठी आले होते. तिथे संत तुकारामांचा प्रभाव संताजींवर खूप मोठ्या परमात पडला व त्यांनी संसार सोडण्याच्या निर्णय घेतला. तेव्हा संत तुकारामांनी संताजीना समजावून सांगितले कि संसारात राहूनही परमार्थ करता येतो . आणि तेव्हा पासून संत संताजी जगनाडे महाराज ( सन्तु तेली ) हे संत तुकारामाच्या १४ टाळकऱ्यातील प्रमुख टाळकरी म्हणून ओळखले जावू लागले. संत तुकारामांच्या सोबत राहून त्यांनी तुकाराम महाराजांची अभंगे लिहिण्यास सुरवात केली.

संत तुकाराम महाराज गाथा पुन्हा लिहिला

संताजी जगनाडे महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आज जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग आपल्यापर्यंत पोहचलेत. इंद्रायणीत बुडवलेल्या गाथा, जनसागरातून बाहेर काढण्याचा चमत्कार हा संताजी जगनाडे महाराजांनी केला. त्यांनी हे अभंग पुन्हा मिळवून लिहून काढलेत.

संत तुकाराम महाराज यांचा जसा लोकांवर प्रभाव वाढत जात होता तो प्रभाव त्या काळातील काही लोकांनां सहन होत नव्हता, कारण त्यामुळे त्यांच्या व्यवसाय कमी होत होता व त्यावेळी संत श्री तुकारामांनी लिहिलेल्या अभंगांची गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु संत तुकारामांचे सर्व अभंग हे संताजी महाराजांना मुखोत्गत पाठ होते म्हणून त्यांनी ते ते पुन्हा लिहून काढले.

संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्या नंतर ४० वर्षे जीवन जगले. त्यांनी जगाला सदुपदेश दिला, जनजागृती केली समाजाची सेवा केली.

इहलोकाचा त्याग अर्थात समाधी

मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी इ. स. १६८८ साली संताजी महाराजांनी देह ठेवला.
संत तुकारामांनी संताजीना शेवटच्या क्षणी माती टाकण्यास येणार असे वाचनही दिले होते. संत तुकाराम महाराज हे संत संताजी जगनाडे महाराजांच्या आगोदरच वैकुंठाला गेले पण ज्यावेळी संत संताजी महाराजांचा अंत समय आला

संत तुकाराम महाराज वैकुंठाहून आले.
त्यांचे अवताराचे कार्य संपल्यावर वयाच्या ७५ व्या वर्षी मार्गशीर्ष |वद्य त्रयोदशी इ.स. १६९९ रोजी अनंतात विलीन झाले.

अत्यंत संस्काराचे तीन प्रकार आहेत

१) अग्नी संस्कार, २) मृतीका संस्कार ३) समाधीत पुरविणे हे संत असल्यामुळे ह्यांना समाधीत पुरविले. पुष्कळ माती टाकून ही त्यांचे तोंड वरच राहात होते. शेवटी लोक कंटाळून गेले बरीच रात्र झाली ते सर्वघरी परतले
माय त्यांचा मुलगा बाळोजी हे एकटेच होते. रात्री १२ वाजता तुकाराम महाराज विमानात बसून त्या ठिकाणी आले. तेथे बाळोजी होते त्याला तुकारामाने सांगितले की संताजीचा व माझा वचन भाग झालेला आहे.

“चारीता गोधन, माझे गुंतले वचन ।।१।।
आम्हा झाले येणे एका तेलीया कारणे ।।२।।
तीन मुष्ठी मृतीका देख, तेव्हा लोपवीले मुख ।।३।।
आलो म्हणजे तुका, संतु न्यावया विष्णु लोका।।४।।”


त्याप्रमाणे ३ मुष्ठी माती संताजीच्या डोक्यावर सोडली तेव्हा व्हा संताजीचे डोके आत गेले. त्यावेळेस बाळुजीला तुकारामानी १३ अभंग सांगितले व तुकाराम महाराज निघुल गेले.


संत संताजी जगनाडे महाराजांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथ्याचे लिखाण तर केलेच पण स्वता: त्यांनी काही अभंग रचना व ‘शंकर दीपिका’, ‘योगाची वाट’, ‘निर्गुणाचं लावण्य’ आणि ‘तेल सिंधू’ या ग्रंथांचं लेखन केल्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. त्यांची काव्यप्रतिभा विलक्षणच होती. तेलाच्या व्यवसायातील अनेक रूपकं, उपमा, अलंकार व चित्रण त्यांच्या अभंगांतून झळकतं. त्यांच्या सहजलेखनात किती मोठ्ठं जगण्याचं तत्त्वज्ञान होतं, हे पुढील अभंगांवरून लक्षात येईल-

मजशी ते ब्रह्मज्ञान काही नाही। आपुल्या कृपेने होईल सर्वथाही।। १ ।।
होईल मज आणि माझिया कुळांशी। पांडुरंग मुळाशी सर्व आहे।। २।।
संतु म्हणे ब्रह्म ब्रह्मा सर्व जाणे। आपुले ते मन सुधारले।। ३ ।।

आमुचा तो घाणा त्रिगुण तिळाचा। नंदी जोडियला मन पवनाचा।।१।।
भक्ति हो भावाची लाट टाकियली। शांती शिळा ठेवीली विवेकावरी।।२।।
सुबुद्धीची वढ लावोनी विवेकांस। प्रपंच जोखड खांदी घेतीयले।।३।।
फेरे फिरो दिले जन्मवरी। तेल काढियले चैतन्य ते।।४।।
संतु म्हणे मी हे तेल काढियले। म्हणुनी नांव दिल संतु तेली।।५।।

संताजी जगनाडे महाराज अभंग गाथा
संताजी जगनाडे महाराज तेली यांनीही तुकाराम महाराजा प्रमाणेच काही अभंग लिहिले आहेत,

संत संताजी जगनाडे महाराज अभंग गाथा पहा

संत संताजी महाराज जगनाडे चरित्र

संत संताजी महाराज जगनाडे चरित्र

वारकरी संत चरित्र

Sant santaji jagnade maharaj
sant santaji maharaj jagnade, Teli samaj, Teli Samaj Maharashtra, Sahu Teli Samaj, Teli Samaj Pune, Teli Samaj Nagpur
जय संताजी, तेली समाज
महाराष्‍ट्र तेली समाज
तेली समाज
तेली समाज You Tube
तळेगाव दाभाडे तेली समाज श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी
संताजी जगनाडे एक योद्धा या संजय येरणे लिखित कादंबरीस रसिकराज चा राज्य साहित्य पुरस्कार प्रदान
तेली समाज गोंदिया देवरी संताजी जयंती महोत्सव व वधु वर परिचय मेळावा
संत संताजी जगनाडे महाराज यांनी संत तुकाराम महाराजांच्या गाथा समाजपुढे आणल्या
Sant Santaji Maharaj JagnadeSant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे
teli samaj surnameTeli Samaj Surname Sahu teli samajSahu Teli Samaj ganiga teli castGANIGA TELI VAISHYA Teli sahu samajतेली साहू जाति की उत्पत्ति संबंधित प्रचलित कथाएं maa karma devi माँ कर्मा देवी का जीवन परिचय साहू तेली समाज का इतिहास santaji maharaj jagnadeश्री संत संताजी महाराज जगनाडे यांची ओळख teli samaj sant Guru Gorakhnath तेली समाज के संत गुरु गोरखनाथ

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *