संत संताजी महाराज जगनाडे अभंग गाथा १ ते १०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत संताजी महाराज जगनाडे संपूर्ण अभंग गाथा

Sant Santaj Maharaj Jagnade Death Anniversary
Sant Santaji Maharaj Jagnade Punyatithi

तेली संतश्री संताजी महाराज जगनाडे
तेली समाज गुरुगुरु गोरखनाथ
नावसंत श्री संताजी विठोबा जगनाडे
जन्म८ डिसेंबर १६२४ मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी
जन्मस्थळसुदुंबरे, तालुका- मावळ, महाराष्ट्र
समाधीइ.स १६८८
वडीलविठोबा भिवाजी जगनाडे
आईमथुबाईं (मथाबाई किंवा माथाबाई,)
पत्नीयमुनाबाई
मुलगाबाळोजी
मुलगीभागू (भागूबाई)
समाजतेली
गुरुसंत तुकाराम
साहित्य‘तेलसिंधु’, ‘शंकरदीपिका’
कार्यसंत तुकाराम महाराज अभंग गाथा लेखन, भजन, किर्तन, ज्ञानदान.

संत संताजी महाराज जगनाडे यांचा जन्म मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला पुणे जिल्ह्यातील चाकण येथे झाला. अंदाजे इ.स. १६२४ दरम्यान झाला,
समाधी – मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी इ. स. १६८८ साली संताजी महाराजांनी देह ठेवला.
इ.स. १६८८ ला
९ फेब्रवारी २००९ रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या काळात त्यांच्यावरील एक पोस्टाचं तिकीटही निघालं. संत संताजी महाराज जगनाडे हे संत तुकारामांनी रचलेल्या अभंगांच्या संग्रहाचे – अर्थात तुकाराम गाथेचे – लेखनिक करीत.



संत श्रीसंताजीमहाराज जगनाडे अभंग
जो पर्यंत संतू तेली व संताजी जगनाडे हे भिन्न आहेत, हे निश्चित होत नाही, तोपर्यंत प्रस्तुत – अभंग संताजी महाराज जगनाडे यांचेच आहेत असे मानावेच लागते

घाण्यावरील अभंग
अभंग १
माझिया जातीचा मज भेटो कोणी ।
आवडिची धनी पुरवावया ॥१॥
माझिया जातीचा मजशीं मिळेल ।
कळेल तो सर्व समाचार ॥२॥
संतु म्हणे येथें पाहिजे जातीचे ।
येरॅं गबाळाचें काम नाही ॥३॥

अभंग २
एकादिशी दिनी संतु तुका वाणी ।
राऊळा आंगणी उभे होते ॥१॥
तेव्हा संतु तेली गेलासे दर्शना ।
पांडुरंग चरणा नमियेले ॥२॥
तेथुनी तो आला तुका जेथें होतां ।
आलिंगन देतां झाला त्याशीं॥३॥
तुका म्हणे संतु पुसतो तुजला ।
सांगतो तुजला संतु म्हणे ॥४॥

अभंग ३
तुजशीं तें ब्रह्मज्ञान कांहीं आहे ।
किंवा भक्तिमाय वसे पोटी ॥ ॥१॥
काय तुझ्या मागें कोण तुज सांगे ।
काय ते अभंग जाणितले ॥२॥
घाणाची घेऊनी बैसलासि बुधा ।
जन्म पाठिमागा कां गेला ॥॥३॥
तुका म्हणे सर्व सांग तुं मजला ।
सांगतों तुजला संतु म्हणे ॥४॥

अभंग ४
मजशीं तें ब्रह्मज्ञान काहीं नाहीं ।
आपुल्या कॄपेनें होईल सर्वथाहीं ॥ ॥१॥
होइल मज आणि माझिया कुळांशीं ।
पांडुरंग मुळाशीं सर्व आहे ॥२॥
संतु म्हणे ब्रह्म ब्रह्मा सर्व जाणे ।
आपुलें तें मन सुधारलें ॥३॥

अभंग ५
भक्ति ते माऊली माझे नच पोटी ।
जाणें उठा उठी देवराया ॥ ॥१॥
भक्ति या भावाची करूनिया लाट ।
आलिंगितो तीस रात्रंदिन ॥२॥
संतु म्हणे आपुल्या कृपेचा प्रसाद
द्यावा वारंवार मजलागी ॥३॥


अभंग ६
मज मागें घाणा सांगे द्वारकेचा राणा ।
मज मागें संसार सांगे रूक्मिणीचा वर ॥१॥
मज मागें घेव देव सांगे रुक्मिणीचा राव ।
मज मागें निद्रा आहार सांगे उमा सारंगधर ॥२॥
किर्तीविना कांहीं मागें तें राहिना ।
संतु सांगे खुणा तुकयाशी ॥३॥

अभंग ७
ज्याचा नोहे भंग तोची जाणावा अभंग ।
देह आपुला भंगतो माति मिळोनियां जातो ॥१॥
त्याचें होइनाच काहीं अंतरीं शोधुनियां पाही ।
प्राण जातो यमपाशीं दुःख होतें ते मायेशीं ॥२॥
संतु म्हणे असा अभंग गाईला ।
पुझें चालुं केला देहावरी ॥३॥

अभंग ८
जन्मलों मी कुठे सांगतां नये कांहीं ।
निरंजन निराकार आधार नव्हतां ठाई ॥१॥
तेथें मी जन्मलों शोधुनियां पाही ।
जन्मले माझें कुळ आशेच सर्वही ॥२॥
असाच हा जन्म पाठी मागा गेला ।
पुन्हा नाहीं आला कदा काळीं ।॥३॥
संतु म्हणे वनमाळी ।
चुकवा जन्माची हे पाळी ॥४॥

अभंग ९
सगुण हा घाणा घेऊनि बैसलों ।
तेलीजन्मा आलों घाणा घ्याया ॥१॥
नाहीं तर तुमची आमची एक जात ।
कमी नाहीं त्यांत आणु रेणु ॥२॥
संतु म्हणे जाती दोनच त्या आहे ।
स्त्री आणि पुरुष शोधुनिया पाहे ॥३॥

अभंग १०
आमुचा तु घाणा त्रिगुण तिळाचा ।
नंदी जोडियला मन पवनाचा । ॥१॥
भक्ति ही भावाची लाट टाकियली ।
शांती शिळा ठेवली विवेकावरी ॥२॥
सुबुद्धीची वढ लावोनी विवेकांस ।
प्रपंच जोखड खांदी घेतीयले ॥॥३॥
फेरे फिरो दिले जन्मवरीं ।
तेल काढियलें चैतन्य तें ॥॥४॥
संतु म्हणे मी हे तेल काढियले ।
म्हणूनी नांव दिले संतु तेली ॥५॥

संत श्रीसंताजीमहाराज जगवाडे – अभंग समाप्त

संताजी जगनाडे महाराज अभंग गाथा
संताजी जगनाडे महाराज तेली यांनीही तुकाराम महाराजा प्रमाणेच काही अभंग लिहिले आहेत,

संत संताजी जगनाडे महाराज अभंग गाथा पहा

संत संताजी महाराज जगनाडे चरित्र

वारकरी संत चरित्र

Sant santaji jagnade maharaj
sant santaji maharaj jagnade, Teli samaj, Teli Samaj Maharashtra, Sahu Teli Samaj, Teli Samaj Pune, Teli Samaj Nagpur
जय संताजी, तेली समाज
महाराष्‍ट्र तेली समाज
तेली समाज
तेली समाज You Tube
तळेगाव दाभाडे तेली समाज श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी
संताजी जगनाडे एक योद्धा या संजय येरणे लिखित कादंबरीस रसिकराज चा राज्य साहित्य पुरस्कार प्रदान
तेली समाज गोंदिया देवरी संताजी जयंती महोत्सव व वधु वर परिचय मेळावा
संत संताजी जगनाडे महाराज यांनी संत तुकाराम महाराजांच्या गाथा समाजपुढे आणल्या
Sant Santaji Maharaj JagnadeSant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे
teli samaj surnameTeli Samaj Surname Sahu teli samajSahu Teli Samaj ganiga teli castGANIGA TELI VAISHYA Teli sahu samajतेली साहू जाति की उत्पत्ति संबंधित प्रचलित कथाएं maa karma devi माँ कर्मा देवी का जीवन परिचय साहू तेली समाज का इतिहास santaji maharaj jagnadeश्री संत संताजी महाराज जगनाडे यांची ओळख teli samaj sant Guru Gorakhnath तेली समाज के संत गुरु गोरखनाथ

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *