संत संताजी महाराज जगनाडे अभंग गाथा ११ ते २०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत संताजी महाराज जगनाडे संपूर्ण अभंग गाथा

Sant Santaj Maharaj Jagnade Death Anniversary
Sant Santaji Maharaj Jagnade Punyatithi

तेली संतश्री संताजी महाराज जगनाडे
तेली समाज गुरुगुरु गोरखनाथ
नावसंत श्री संताजी विठोबा जगनाडे
जन्म८ डिसेंबर १६२४ मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी
जन्मस्थळसुदुंबरे, तालुका- मावळ, महाराष्ट्र
समाधीइ.स १६८८
वडीलविठोबा भिवाजी जगनाडे
आईमथुबाईं (मथाबाई किंवा माथाबाई,)
पत्नीयमुनाबाई
मुलगाबाळोजी
मुलगीभागू (भागूबाई)
समाजतेली
गुरुसंत तुकाराम
साहित्य‘तेलसिंधु’, ‘शंकरदीपिका’
कार्यसंत तुकाराम महाराज अभंग गाथा लेखन, भजन, किर्तन, ज्ञानदान.

संत संताजी महाराज जगनाडे यांचा जन्म मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला पुणे जिल्ह्यातील चाकण येथे झाला. अंदाजे इ.स. १६२४ दरम्यान झाला,
समाधी – मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी इ. स. १६८८ साली संताजी महाराजांनी देह ठेवला.
इ.स. १६८८ ला
९ फेब्रवारी २००९ रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या काळात त्यांच्यावरील एक पोस्टाचं तिकीटही निघालं. संत संताजी महाराज जगनाडे हे संत तुकारामांनी रचलेल्या अभंगांच्या संग्रहाचे – अर्थात तुकाराम गाथेचे – लेखनिक करीत.

संत श्रीसंताजीमहाराज जगनाडे अभंग
जो पर्यंत संतू तेली व संताजी जगनाडे हे भिन्न आहेत, हे निश्चित होत नाही, तोपर्यंत प्रस्तुत – अभंग संताजी महाराज जगनाडे यांचेच आहेत असे मानावेच लागते

अभंग ११
देह क्षेत्र घाणा ऐका त्याच्या खुणा ।
गुदस्थान जाणा उखळ ते ॥१॥
स्वाधिष्टानावरी मन पुरचक्र ।
विंदु दंत चक्र आनु हात ॥२॥
एकविस मनी खांब जो रोविला ।
सुतार तो भला विश्वकर्मा ॥३॥
मनाशीं जुंपले फेरे खाऊं दिले ।
तेल हाता आले सुटे मन ॥४॥
संतु म्हणे माझा घाणा हो देहांत ।
चालवि आपोआप पांडुरंग ॥५॥

अभंग १२
निंदक हा घाणा म्हणावा तो जरी ।
विवाहा भितरी फिरे कैसा ॥१॥
ब्राह्मण पुरोहित आणिक ते जोशी ।
भरा आधीं घाणा म्हणती सर्वांशी ॥२॥
भरल्यावांचुनी कार्य सिद्धी नाहीं ।
शोधुनिया पाहीं संतु म्हणे ॥३॥

अभंग १३
निंदक हा घाणा म्हणावा तो जरी ।
शुभ कार्या आधिं भरतात ॥१॥
श्रीकृष्णाचे लग्नी भरीयला घाणा ।
म्हणवेना कोणा निंदक तो ॥२॥
संतु म्हणे म्यां तो घाणा भरियला ।
सिद्धीस तो नेला पांडुरंगे ॥३॥

अभंग १४
आणिक तो घाणा कोणता सादर ।
सोहं ब्रह्मध्वनी अनुहात गजर ॥१॥
ब्रह्मांड शिखरीं ठोक वाजे ।
दशनाद होती सर्वांचें ब्रह्मांडीं ॥२॥
संतु म्हणे हा तो देवा घराचा घाणा ।
सद्गुरु वांचोनी कळेनाच कोणा ॥३॥

अभंग १५
घाण्याचा कर करा पुसलासी मज ।
तरी तुकया गुज सांगु आतां ॥१॥
दशनाद होती सर्वांचे ब्रह्मांडीं ।
तुझे काय पिंडी वाजताती ॥२॥
संतु म्हणे माझे घाण्याचा करकरा ।
दशनादाचा तो खरा जगा माजी ॥३॥

अभंग १६
आशा मनाशा तृषा माया पाचरौचारी आणुन ।
दुर्गतीचा खील त्यांमधी दीला ठोकून ॥१॥
त्याच्या योगें चारी पाचरी आल्या आवळून ।
सरकायासीं जागा नाहीं मुळापासून ॥२॥
संतु म्हणे ह्या घाण्याच्या पाचरी ।
जग भुलव्या नारी खर्‍याच ह्या ॥३॥

अभंग १७
भुलविले ह्यांनी भस्मासुर दैत्याशीं ।
आणिक नारदाशी त्याच रीती ॥१॥
ब्रह्मदेवा आणि विश्वाही मित्रांशीं ।
तसेच भुलविले इंद्रा आणि चंद्राशीं ॥२॥
संतु म्हणे अशा ह्या घाण्याच्या पाचरी ।
काढाव्या वेगशीं देहांतुनी ॥३॥

अभंग १८
हरिचंद्रराजाने पाचरी ओळखिल्या ।
हाकलुनि दिल्या घरांतुनी ॥१॥
अशा ह्या पाचरी ओळखिल्या कोणी ।
गोरोबानी आणि तुकारामजिनी ॥२॥
संतु म्हणे माझ्या घाण्याच्या पाचरी ।
सद्गुरुबांचोनी ओळखिना कोणी ॥३॥

अभंग १९
पाचरीनीं प्रताप दाखविला शंकरा ।
भुलवोनी गेला भिल्लीनीशी ॥१॥
विश्वामित्रासी रंभेनें कुत्रा बनविला ।
मागें मागें नेला घराप्रती ॥२॥
संतु म्हणे अशा घाण्याच्या पाचरी ।
दाखविल्या चारी सद्गुरुजिनी ॥३॥

अभंग २०
सद्गुरुवांचोनी दाखविना कोणी ।
संसार मोहनी पाडली असे ॥१॥
संसार करूनि पांचरी ओळखिल्या ।
उद्धरूनि नेल्या तुकोबाने ॥२॥
संतु म्हणे माझ्या सद्गुरुच्या कृपेनें ।
पाचरी बसविल्या घाण्यामाजी ॥३॥

संत श्रीसंताजीमहाराज जगवाडे – अभंग समाप्त

संताजी जगनाडे महाराज अभंग गाथा
संताजी जगनाडे महाराज तेली यांनीही तुकाराम महाराजा प्रमाणेच काही अभंग लिहिले आहेत,

संत संताजी जगनाडे महाराज अभंग गाथा पहा

संत संताजी महाराज जगनाडे चरित्र

वारकरी संत चरित्र

Sant santaji jagnade maharaj
sant santaji maharaj jagnade, Teli samaj, Teli Samaj Maharashtra, Sahu Teli Samaj, Teli Samaj Pune, Teli Samaj Nagpur
जय संताजी, तेली समाज
महाराष्‍ट्र तेली समाज
तेली समाज
तेली समाज You Tube
तळेगाव दाभाडे तेली समाज श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी
संताजी जगनाडे एक योद्धा या संजय येरणे लिखित कादंबरीस रसिकराज चा राज्य साहित्य पुरस्कार प्रदान
तेली समाज गोंदिया देवरी संताजी जयंती महोत्सव व वधु वर परिचय मेळावा
संत संताजी जगनाडे महाराज यांनी संत तुकाराम महाराजांच्या गाथा समाजपुढे आणल्या
Sant Santaji Maharaj JagnadeSant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे
teli samaj surnameTeli Samaj Surname Sahu teli samajSahu Teli Samaj ganiga teli castGANIGA TELI VAISHYA Teli sahu samajतेली साहू जाति की उत्पत्ति संबंधित प्रचलित कथाएं maa karma devi माँ कर्मा देवी का जीवन परिचय साहू तेली समाज का इतिहास santaji maharaj jagnadeश्री संत संताजी महाराज जगनाडे यांची ओळख teli samaj sant Guru Gorakhnath तेली समाज के संत गुरु गोरखनाथ

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *