ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१३३

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १३३

जे शंभूने धरिलें मानसीं । तेंचि उपदेशिलें गिरीजेसी ॥ नाम बरवें बरवें । निज मानसी धरावें ॥ गंगोदकाहुनीनिकें । गोडी अमृत जालें फिके ॥

शीतळ चंदनाहुनी वरतें । सुंदर सोनियाहुनि परतें ॥ भुक्तिमुक्तिदायक । भवबंधनमोचक ॥ बापरखुमादेविवरें । सुलभ नाम दिधलें सोपारें ॥

अर्थ:-

त्या चांगल्या नामाला शिवशंभुने मनात धरले त्याच नामाचा उपदेश त्यांनी गिरिजेस केला तेच नाम निजमानसात दृढ धरावे. ते नाम गंगोदकापेक्षा पवित्र व अमृतापेक्षा गोड आहे.

तेच चंद्राहुन शितळ व सोन्यापेक्षा सुंदर व तेजस्वी आहे. ते नाम भक्ती व मुक्ती दायक अ़सुन ते भवबंधनापासुन सोडवते. माझे पिता व रखुमाईचे पती त्यांनी हा सुलभ व सोपा नाममंत्र दिला असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *