ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१०४

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

 ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग १०४

सर्वत्र समान भावयुक्त पूर्ण । धृति धारणा धन वर्ते जया ॥ सामान्यत्व हरि समसेज करी । चित्त वित्त घरीं हरिपाठें ॥

आकार निराकारी त्रिपथ शेजारीं । हरि भरोवरीं घेतु विरूळा ॥ ज्ञानदेवाजिणें अवघें ज्ञान होणें । विज्ञानीं राहाणें गुरुकृपा ॥

 अर्थ:-

 सर्वत्र समान व भावयुक्त राहुन जर नाम घेतले तर धर्माचे धारण होते व नामधनाचा वर्षाव होतो. ह्या हरिपाठामुळे हरि सामान्य होऊन त्याच्या बरोबर सम सेज करतो म्हणजे जागृत अवस्थेत तसेच झोपेतही बरोबर राहतो व त्याचे चित्त व वित्त सगळेच हरिरुपाला प्राप्त

होते. निराकारातील त्रिगुण व मायेतील जगताचा आकार ह्यांना बाजुला सारुन हरिनामात रतणारा विरळाच असतो. असे हे ज्ञान प्राप्त झाले की सहज संसाररुपी विज्ञानात राहण्याची बाधा गुरुकृपेने दुर होते असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *