ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.294

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २९४

दीपके माजीं दीपक दीप्तीसरे । बिंबोनी सहज बिंबि न मिळे ॥१॥
बिंब नाही पाहासील काई । ठायींच्या ठायी होऊनि राही ॥२॥
सर्वीसर्व रस समरसोनी आहे । उभारूनी बाहे वेद सांगे ॥३॥
ज्ञानदेव निजी निजोनी सहज । देहीचा निर्लज्ज रूसला सये ॥४॥

अर्थ:-

जीवाच्या ठिकाणी जो ज्ञानरुपी दिवा आहे. त्या दिव्याचे तेज परमात्मा आहे. त्या परमात्म्याचे तेजाचे प्रतिबिंब जीवांचे ठिकाणी आहे. बिंब व प्रतिबिंब एकच असते. त्याप्रमाणे जीवाचे ब्रह्माशी सहज एकत्व आहे.बिंबरूप परमात्मा नसता तर प्रतिबिंबरूपी जीव तरी कसा दिसला असता ?

म्हणून प्रतिबिंबरूप जो तूं, बिंबरूप परमात्म्याशी एकरूप आहे. परमात्मा सर्व ठिकाणी एकरूपाने आहे. असे वेद हात वर करून सांगत आहेत. मी माझ्या स्वरूपांच्या ठिकाणी सहजस्थित असल्याने माझ्या ठिकाणचा निर्लज्ज देहअहंकार निघून गेला आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *