ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.286

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २८६

असार घेईजे सार पारखूनियां विचार । जेणे तुटे येरझार मरणजन्मीं ॥
ते रूपस रूपडें पाहतां न संपडे । हृदयी सांपडे ज्ञानगोष्टी ॥
सांगता अनुमान अद्वैत सार पूर्ण । ज्ञानाज्ञानी सज्ञान विरूळा जाणे ॥
ज्ञानदेव सोपान संगितलिया संपन्न । हरितत्त्व अनुप्रमाण लाधे पूर्वपुण्ये ॥

अर्थ:-

असार असा जो संसार त्यांत सत्य मिथ्या काय आहे. हे पारखून म्हणजे शास्त्रदृष्टीने विचार करून त्यातील सार जे परमतत्त्व त्याचे गृहण केले तर जन्ममरणाची येरझार तुटून जाईल. ते परमात्मस्वरूप पाहु गेले तर डोळ्याला सापडणार नाही.

संताच्याकडून ज्ञानाच्या गोष्टी ऐकल्यानंतर ते परमात्मतत्त्व तुझ्या हदयातच सापडेल. तात्पर्य आत्माच ब्रह्म आहे. अनुमान म्हणजे युक्तीने विचार केला तर अद्वैत हेच सर्वसार आहे.

हे सार ज्ञानाने म्हणजे ज्या ज्ञानाने हा साधक परमात्मतत्त्व जाणणार त्या ज्ञानातच शुद्ध ज्ञानस्वरूपभूत ज्ञानतत्त्व आहे. असे जाणणारे फार विरळे आहेत. माऊली ज्ञानदेव सांगतात ज्याचे पूर्वपुण्य उत्तम आहे तो सांगितलेल्या मागनि जाईल तर अत्यंत सूक्ष्माहून सूक्ष्म जे हरितत्त्व ते त्यास प्राप्त होईल.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *