ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.212

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २१२ 

विष्णुवीण मार्ग घेशील अव्यंग । तरी वायांची सोंग करणी तुझी ॥ येऊनि संसारा वायाचि उजिगरा । कैसेनि ईश्वरा पावसी हरि ॥

नरदेह कैचे तुज होय साचें । नव्हे रे देहींचे सुख तुज ॥ ज्ञानदेव म्हणे शरण रिघणें । वैकुंठीचे ऐणे अंती तुज ॥

अर्थ:-

एका श्रीहरिला सोडून इतर मार्ग कांही व्यंग न देता आचरलेस तरी तो तुझा खटाटोप फुकट सोंग होईल. जन्माला येऊन असे फुकट परिश्रम केलेस तर श्रीहरिला कसा प्राप्त होशिल.

हा मनुष्य जन्म कायम टिकणारा आहे काय ? तसेच देहात होणारे विषयाचे सुख कसे हित करेल? म्हणून श्रीहरिला अनन्य भक्तीभावाने शरण जाऊन वैकुंठपद प्राप्त करून घे. असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *