ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.188

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-७ वे, बाळक्रीडा अभंग १८८ सार्थ गाथा क्र. १८८

पावया छंदे तल्लीन गोविदें । नाचती आनदें गोपाळ कैसे ॥ यमुनेच्या तीरी गाई चारी हरि । गोपाळ गजरी आनंदले ॥ ठायीं ठायी मातु पेंद्या पैं नाचतु ।

वाकुल्या दावितु हरिछंदे ॥ ठायीं ठाती उभ्या विसरल्या माया । हाकितु लवलाह्या कृष्णहरि ॥ ज्ञानदेवा जीवीं कृष्ण चिरंजिवीं । गोपाळ रंजवी प्रेमभक्ती ॥

अर्थ:

पावा वाजवताना कृष्णाला पाहुन ते गोपाळ तल्लीन होऊन आनंदाने नाचायला लागले. स्वतः तो हरि यमुना तीरी गायी चारताना पाहुन ते गोपाळ त्याच्या नामाचा गजर करु लागले. त्या आनंदात ते सर्व गोपाळ नाचत

असताना तो पेंद्या ब्रह्मादिकांना वाकुल्या दाखवत आहे. व हे पाहुन चरताना ठिकठिकाणी उभ्या गोमातांना तो हरि घाईने वळु लागला आहे. माझ्यासाठी चिंरजिंव असलेला तो परमात्मा त्या गोपाळांना प्रेम भक्तीने रंजवीत आहे असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *