५ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!!   श्रीकृष्ण   !!! भाग – ५.

त्या गाड्यात समारंभाच्या भोजना साठी आणलेल्या दही,दुध व अन्य मिष्टांनांची अवजड रिकामी भांडी ठेवली होती.इकडे नंद यशोदा पंगतीत सर्वांना आग्रहाने वाढत असतांना,कांही मुलं ओरडा करत धावत येऊन कृष्ण पाय झाडत रडत असुन त्याने पायाने गाडा उलथवल्याचे सांगीतल्या बरोबर, यशोदा तशीच धावत बाहेर आली.पाहते तो काय कृष्ण कळवळुन रडत आहे,अवाढव्य गाडा पलीकडे उलथुन पडला आहे,त्या तील सर्व अवजड भांडी अस्ताव्यस्त पसरली आहेत.तिचा जिव गलबलुन गेला नंदाने ब्राम्हणाकरवी रक्षोहन होम करुन कृष्णाला अभिषेक केला.गर्गमुनी व वसुदेवाचे “सतत दक्ष रहा” हे वाक्याची नंदाला आठवण झाली.आतां असे उत्पात घडतच राहतील.

दिवस जात होते.राम-कृष्ण कलेकलेने वाढत होते.उभे राहु लागले, चालु लागले.आतां ते पांच वर्षाचे झाले. बलराम तसा शांत,पण कृष्ण अति खोड कर,भारी चपळ.यशोदा घरातील कामे करुन व त्याला सांभाळतांना ति अगदी थकुन जात असे.कृष्णाच्या जास्त खोड्या वाढल्याने एक दिवस त्याला न हलतां गुपचाप बसुन राहण्यास सांगुन ती घरांतील कामात गुंतली,पण  आंतुन त्याच्याशी बोलणे सुरु होते.व तो ही प्रत्यु त्तरे देत होता.कांही वेळाने त्याचा आवाज येईनासा झाला म्हणुन बाहेर येऊन त्याला मांडीवर घेतले.त्याने तोंडभर माती खाल्लेली,ती माती काढायचा प्रयत्न करी तो तेवढेच ओठ घट्ट मिटुन घेई.शेवटी त्याचे नाक दाबुन म्हणाली,चल उघड बरं तोंड. त्याने पुर्ण आ करुन तोंड उघडले तर तिला काय दिसले?

पुर्ण विश्वदर्शन झाले.ती विलक्षण गोंधळली.तेवढ्यात त्याने तोंड मिटुन तिच्या कुशीत शिरला. तिच्या स्तनातुन जणुं पान्हा फुटुन दुध ओघळु लागले.वात्सल्याने ह्रदय भरुन आले.ते अर्धरितं स्वप्न तिच्या मनातुन विरुन गेलं. तो पळुन गेला म्हणुन ती ही त्याच्या मागे धावली.शेवटी पकडुन  अंग णात असलेल्या उखळाला बांधुन टाकले. व ती घरातल्या कामात गुंतुन गेली.

बराच वेळ झाला व त्याला भूक लागली असेल असे वाटल्याने बाहेर येऊन बघते तर, बांधलेला कृष्णही नाही व उखळही नाही. चौकशीअंती गावाबाहेरच्या दोन प्रचंड अर्जुन वृक्षास अडकुन पडला व पिढ्यान पिढ्यांची ती दोन्ही जुनी वृक्ष दोन बाजुंनी उन्मळुन पडलेली,आणि दोरासकट उखळाला बांधलेला कृष्ण वृक्षांच्यामधे कावरा बावरा होऊन उभा असलेला पाहुन तीने धावत जाऊन बंधनमुक्त केले व पश्चातापाने विदीर्ण ह्रदयाने त्याला छातीशी कवटाळले. संध्याकाळी मथुरेहु न नंद घरी आल्यावर ही हकीकत कळल्यावर म्हणाला गेल्या पांच वर्षात पांच मोठे उत्पात झालेत. दुसर्‍या दिवशी त्याची शांती केली.त्याला दाव्याने बांधले म्हणुन लोक त्याला दामोदर म्हणु लागले.

बलराम कृष्णची बालदशा संपुन किशोरावस्थेत आलेत.निळासावळा कृष्ण नेहमी पीत वस्रे व गौर वर्णीय संकर्षण नील वस्रे परिधान करीत असे. दोघांचेही सौंदर्य अनुपम होते.पण त्यातही कृष्णाचे सौंदर्य? त्याच्या निळ्या सावळ्या,खोडकर,मिश्कील,हसर्‍या चेहर्‍यावर एकदा का नजर गेली की, ती खिळून बसे.आतां ते गोपांबरोबर रानांत गाईवासरे चारण्यास सोबत न्याहारी घेऊन जाऊ लागले.सात वर्षाचा नटखट, खोडकर,पिवळे वस्र नेसलेला,कानात मोरांची पिसे,तर कधी पल्लवांचा गुच्छ मुकुटासारखा मस्तकी ठेवलेला,गळ्यात वनमाला घातलेल्या कृष्णाला पहायला गोपी आपापल्या दारात खिळुन उभ्या राहत वेणूचा आवाज ऐकु येईनासा होई पर्यंत!

दिवस जात होते,ऋतु बदलत होते. आतां पुर्वीसारखे उत्पातही होत नव्हते. पण दुरवरच्या जंगलातुन येणार्‍या लांडग्यांचा ऊपद्रव सुरु झाला. शिवाय गोकुळ परिसरही उजाड झाला.जाळण्या साठी बरेच जुने वृक्ष तोडल्या गेले.गुरां साठी मिळणारे गवत कमी झाले.पुर्वी मोठ्या वृक्षांचे भींतीसारखे संरक्षण होते, ते जळतनासाठी वापरल्या गेले.जमीनी चा कस कमी झाल्याने गवत उगवेनासे झाले.एके दिवशी नंदाने वृध्द व अनुभवी गोपांची सभा घेऊन म्हणाला, हे व्रज गोकुळ पुर्णतः उजाड झाल्याने इथल्या ब्राम्हणांना द्विजकर्म करणे अशक्य झाल्याने तेही दुसरीकडे निघुन गेले. गुर, माणसं सर्वांचेच हाल होत असल्यामुळे हे स्थान बदलण्याची वेळ येऊन ठेपलीआहे

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *