२६ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – २६.

कालयवन भस्म झाल्यावर श्रीकृष्ण समोर आला.मुचुकुंद हा इक्ष्वाकु वंशातील मांद्यातांचा पुत्र, असुरांविरुध्द खास लढण्यासाठी देवांनी त्याल मदती साठी बोलावले होते.शेकडोंवर्षे युध्द चालुन शेवटी मुचुकुंदाने असुरांचा पराभव केल्यावर,देवांनी संतुष्ट होऊन दीर्घ काळ निद्रा यावी हा वर मागीतल्यानुसार ते त्रेता युगापासुन निद्रिस्त होते.सध्या व्दापारयुगाचा शेवट असुन लवकरच कलीयुगाचा आरंभ होईल,

श्रीकृष्ण स्वतः चा परिचय देत म्हणाला,सोमवंशीय नहुषाचा पुत्र ययातीचा जेष्ठ पुत्र यदु व चार धाकटे पुत्र होते.यदुवंशात उत्पन्न झालेल्या वसुदेवाचा पुत्र मी वासुदेव आहे कालयवनाशी शेकडो वर्षे युध्द केले असते तरी,त्याला शंकराचा वर मिळाला असल्यामुळे तो अवध्य होता.आपण त्याला दग्ध केल्यामुळे येणारे अरिष्ट टळले.वासुदेवा तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो.आतां हिमालयात जाऊन तपश्चर्या करीतच हा देह ठेवणार.तथास्तु!म्हणुन कालयवनाच्या सर्व संपत्तीसह मथुरेला येऊन उग्रसेनला सगळी हकीकत सांगुन,सैन्य व मिळालेले द्रव्य घेऊन द्वारकेला परतला.


आतां तो निश्चिंत,निर्भय झाल्याने शनिवारी मंदवारी रोहिणी नक्षत्राच्या मूहुर्तावर द्विजश्रेष्ठांकडुन पुण्याहवाचन व स्वास्तिवाचन करवुन भुईकोट किल्ल्याच्या पायाचा दगड बसविण्याचा समारंभ सर्व यादवांसमक्ष वसुदेवांकडुन करविला.
समारंभ थाटात झाल्यावर श्रीकृष्ण याद वांना म्हणाला,मी निर्माण करीत असले ली ही नगरी व किल्ला,इंद्राच्या अमरावती सारखी,चौक,राजमार्ग, अंतःपुर सारे इथेही होणार आहे.कृष्णाने देशोदेशींच्या शिल्पकारांना बोलावुन त्यांना योग्य सुचना देऊन सर्वोत्कृष्ट देवा लय,प्रासाद,बांधण्यास सांगीतल्याप्रमाणे अतिशय सुंदर देवालये निर्माण करुन शास्रीय क्रमाने ब्रम्हदेव,प्रभुती,गृहबलिता वरुण,अग्नीसुरेंद्र यांची स्थाने निश्चित केली.किल्ल्याला चार वेशी-शुध्दाक्ष,ऐंद्र, भल्लात आणि पुष्पदंत अशा चार वेशी केल्यात.


विश्वकर्माच्या तोडीचे विस्तिर्ण अंतःपुर व भव्य प्रासाद कृष्णासाठी बांधण्याकरितां वीस योजने समुद्र मागे हटवला.त्याच बरोबर बलराम,सात्यकी, अक्रुर व अनेक प्रमुख सरदारांसाठी मोठे
टोलेजंग आणि रमणीय वाडे तयार झाले.थोड्याच अवधीत इंद्रांच्या अमरावती प्रमाणे समुद्र किनार्‍यावर अतिसुंदर विस्तिर्ण नगरीचे निर्माण झाले. सर्व शहराभोवती मजबुत दगडांचा कोट बांधुन रात्रंदिवस लखलखत राहावा या साठी सोन्याचा रत्नांनी सुशोभित पत्रा लावला.कोटाच्या बाहेर पाण्याने भरलेला रुंद खंदक व त्यात मगरी व लोखंडाचे तिक्ष्ण काटे ठेवले,मात्र पृष्ठभागावर नाना रंगी बेरंगी नित्य फुललेली कमळे लावली दरवाज्याच्या आंत डंका,उडती सुंदर कारंजी लावली.मोठमोठ्या बाजारपेठा वसवल्यात.हजारो विहिरी,हिरव्यागार बागबगिचे शिवाय भाजीपाल्यांच्या मळ्यांची योजना केली.


श्रीकृष्णाच्या उदार व समभावा मुळे प्रत्येकाचे घर अगणित द्रव्ये भरुन असल्यामुळे लहान थोर तृप्त व संतुष्ट होते.सगळी व्यवस्था पुर्ण झाल्यावर, श्रीकृष्णाने पिता वसुदेवांचा राज्याभिषेक करवला.दहा अनुभवी यादवांचे मंत्री मंडळ बलराम युवराज,विक्रदू मुख्य प्रधान,अनावृष्टी सेनापती व सात्यकीला नायक सेनापती केले.गुरु सांदीपनींना उज्जयिनिहुन बोलावुन त्यांना राजपुरोहित पद दिले.याप्रमाणे निःस्वार्थी अतुल पराक्रमी कृष्णाने स्वतःकडे एकही पद न घेता राज्याची उत्तम व्यवस्था लागली.इंद्र कुबेरालाही विस्मयचकित करणारी नगरी श्रीकृष्णाने स्वसामर्थ्यावर समुद्रकिनारी निर्माण करुन द्वारावतीचे “द्वारका” हे सुटसुटीत नामकरण केले.


२५ वर्षाचा झालेल्या श्रीकृष्णा साठी सुंदर वाडा बांधला पण त्यात गृहिणीचाच अभाव होता.बलरामाचा विवाह आधीच आनर्त देशाच्या रेवत राजाची कन्या रेवतीशी झाला होता. या संबंधामुळेच यादवांनी आनर्त देशा जवळच समुद्रकिनारी आपले नगर वसविले.
श्रीकृष्णाला सर्वतोपरी योग्य भार्या विदर्भ देशाच्या भीष्मक राजाची सुंदर, बुध्दीमान चतुर व पराक्रमी कन्या रुख्मिणीच आहे असे मातापिता व प्रमुख जेष्ठ श्रेष्ठ यादवांना वाटत होते.पण तिची प्राप्ती सोपी नव्हती.कारण दोन वर्षापुर्वी तिचे मांडलेले स्वयंवर कृष्णामुळे मोडले होते.कृष्णद्वेष्टा रुख्मी आपली बहिण कृष्णाला देण्याची शक्यताच नव्हती. शेवटचा क्षत्रियांचा मार्ग कन्याहरण!

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *