११ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!! भाग -११.

कृष्णाच्या पराक्रमी लिला कंसाला समजल्याने त्याच्या उरात धडकी भरली, क्षणभर सुन्न झाला.स्वभावानुसार त्याचा क्रोधाग्नी भडकला.स्वभावाने गरीब अस ल्याचे ढोंग करणार्‍या वसुदेवाचा वध करण्यापेक्षा भरसभेत त्याची छीःथू केल्यास सज्जनांना अपमान मृत्युसमान असतो. दोन दिवसांनंतर त्याने चापलुस सरदारां सह सभा भरवली,बंदिस्त पिता उग्रसेन ला ही सभेत आणवले.सर्व जमा झाल्या वर शक्य तेवढ्या सौम्य भाषेत कंसाने बोलण्यास सुरुवात केली.वृंदावनांत कृष्ण नांवाचा नंदपुत्र,माझ्या मुळावर घाव घालण्यासाठी रोजच्या रोज एका पेक्षा एक अलौकिक कृत्ये करणार्‍या शत्रुचे निर्दालन कसे करावे सुचत नाही. त्याच्या दैवी कृत्यांवरुन तो कोण आहे? कळत नाही.


अगदी तान्हा असतांना पुतना राक्षसीनेचे स्तनपान करुन तिचे प्राण शोषुन घेतले.यमुनेच्या डोहातील कालिया सर्पाचे दमन करुन त्याला डोह सोडण्या स भाग पाडले.धेनुक राक्षसाला ठार केले युध्दात देवादिकांनाही अजिंंक्य असले ल्या प्रलंब राक्षसाला एकाच मुष्टीप्रहाराने यमसदनाची वाट दाखवली.एवढेच नव्हे तर नेहमी होणारा इंद्राचा उत्सव बंद केला.चिडलेल्या इंद्राने सतत सात दिवस पर्जन्यवृष्टी केली तर या प्रतापी बालकाने सतत सात दिवस गोवर्धन पर्वतच छत्री सारखा उचलुन धरुन सर्वाचे रक्षण करुन इंद्राचे पारिपत्य केले.अगदी अलिकडे बैलाच्या रुपातील बलवान अरिष्ट राक्षसा चे शिंगे उपटुन त्याच्याच शिंगानी त्याला ठार मारले.वरवर पाहतां साध्या गोप रुपात वावरुन बासरीच्या सूरांद्वारे व्रज वासियांचे

मनोरंजन करतो,पण हा आपले खरे स्वरुप गुप्त ठेवुन,नक्कीच वेगळाच कुणीतरी आहे.आणि हे सर्व स्वभावाने गरीब भासवणार्‍या वसुदेवा च्या चिथावणीने होत असावे अशी शंका आहे.कंसाने भरसभेत वसुदेवाची जेवढी करतां येईल तेवढी निंदा नालस्ती करुन वसुदेवास म्हणाला, अरे मुर्खा! कंसाचा नाश करुन तुझा मुलगा मथुरेचा राजा होईल असे स्वप्न बघत असशील तर कधीच शक्य नाही.थांब! आतां तुझ्या दोन्ही पुत्रांची तुझ्या डोळ्यादेखतच वाट लावतो.आजपर्यंत मी कोणाही वृध्द,स्री ब्राम्हण किंवा नातेवाईकाची हत्या केली नाही.अरे! माझ्या पित्याचे तुझ्यावर किती उपकार आहेत. अरे तू यादवांचा मुळ पुरुष असुन चक्रवर्ती राजांच्या महा विख्यात कुलांमधे तुझी किर्ती होती. सज्जन तुला गुरुठीकाणी मानीत,पण तुझ्या कृत्यांमुळे सर्व यादवांच्या तोंडाला काळे फासलेस.आतां कृष्ण किंवा मी.. आमच्यामधे कधीही न विझणारा वैरागी चेतला असलेल्याने दोघांपैकी कुणा एका ची आहुती पडल्याशिवाय यादवकुल शांत होणार नाही.

तटस्थ झालेल्या सभे वर एक नजर टाकुन,अक्रुराला दोघांनाही धनुर्मुख यज्ञासाठी त्या दोघांनाही घेऊन येण्याची आज्ञा दिली.कंसाचे बोलणे संपल्यावर वयोवृध्द सर्वमान्य अंधक नांवाच्या तेजस्वी यादवाने निर्भय उच्च स्वरांत कंसाचा धिक्कार करीत म्हणाला, अरे कंसा!वसुदेवाचे सातही पुत्र,कारण नसतांना मारण्याचे क्रूर कर्म केलेस. तुझ्या या अमानुष राक्षसी कृत्यापासुन आपले प्राण खर्ची घालुन पुत्राचे प्राण रक्षण केले.तुझ्या पित्याने जन्मतःच तुला मारुन टाकले नाही त्याचा परिणाम तो भोगतो आहे.

तुझ्या पित्याने व वसुदेवाने आपले पितृ कर्तव्य केले,तूं मात्र कुलनाश क उत्पन्न झालास.अरे अलिकडे नाना प्रकारचे अपशकुन होऊ लागलेत यावरुन लवकरच नाश होईल असे स्पष्ट दिसत आहे.तुला जर भावी अनर्थ टाळायचा असेल तर,आता इथे सर्वांसमक्ष सन्मान्य आणि पुज्य वसुदेवाची क्षमा मागुन अका रण मांडलेले वैर मिटवुन टाक.अंधकाचे भाषण ऐकुन कंसाला भयंकर क्रोध आला पण मनावर संयम ठेवुन मानभावी पणे अक्रुराला म्हणाला,मल्लविद्येत कुशल राम-कृष्णाला,आपले प्रख्यात चाणुर व मुष्टीक मल्लांबरोबर स्पर्धेसाठी त्यांना घेऊन ये.आतुन धुसमसत असले ला पण वरपांगी शांतता दाखवणार्‍या कंसाने सभा बरखास्त करुन निघुन गेला.


कंस आपल्या महालातील मंचकावर अस्वस्थपणे विचार करुं लागला,नारदाची भविष्यवाणी खरी तर ठरणार नाही ना? नाही… नाही… तो दुष्ट कृष्ण इथे येण्यापुर्वीच त्याला वृंदावनात ठार मारण्यासाठी आपला भाऊ केशीला आज्ञा केली.आज्ञेप्रमाणे एका भयंकर घोड्यावर बसुन केशी निघाला.नेहमी प्रमाणे प्रातःकालीच बलराम कृष्ण गोपां सह गाई चारण्यास वनांंत निघाले होते. श्रीकृष्ण दिसल्याबरोबर केशीने त्याच्यावर चालुन आला तरी निर्भयपणे कृष्ण स्थीर उभा होता.त्या भयंकर घोड्याने कृष्णाला चावा घेण्यासाठी तोंड उघडले असतां,कृष्णाने आपले वज्रासारखे मजबुत मनगट थेट त्याच्या तोंडात घालुन त्याचे दात उचकटुन काढले.क्रोधीत घोड्याने पुढच्या टांचा कृष्णाच्या छातीवर मारण्यासाठी उचल ल्या बरोबर,त्याच्या टापा पकडुन उलथुन टाकल्याबरोबर पाठीवरचा स्वार व घोडा दोघेही गतप्राण झालेत.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *