संत चोखामेळा म. चरित्र २७

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

 संत चोखामेळा  भाग  –  २७.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

चोखोबाच्या बाळाचे कर्ममेळाचे बारसे असे थाटात झाले.गावकर्‍यांनी वाजतगाजत नेलेले तीर्थ मंदिरांतील मोठ्या पात्रात ओतल्यावर ते तीर्थही मधुर झाले.त्यामुळे संत मंदियाळात चोखोबांचे स्थान वरचे झाले.चार महिन्या पासुन कडु होत असणारे तीर्थ चोखोबां च्या स्पर्शाने मधुर झाले ही सगळी योजना पांडुरंगाचीच!कांही धर्ममार्तंड सोडले तर चोखोबांची भगवद्भक्ती आणि  श्रेष्ठत्व,ते अस्पृश्य असुन सर्व जन सामान्यांना कळली होती.त्यांच्या बोटं बुडवल्याने कडु तीर्थ मधुर झाले ही घटना “याची देही याची डोळा” शेकडो डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिली.आणि एकमता ने ठरवल्या गेले,अस्पृश्य वस्तीत रोज तीर्थ यावे व सर्वांनी प्राशन करावे.हा ठराव गांवच्या ब्राम्हणवृंद व पंचायत समोर ठेवल्यावर अर्थातच बरीच खळखळ झाली पण,अखेर तीर्थपात्र चोखोबांच्या घरी ठेवुन पुर्ण पावित्र्य राखणाच्या अटीवर,पांचामुखी परमेश्वर  या न्यायाने सर्वांना हा निर्णय मानावाच लागला.

हा विजय अस्पृश्य वस्तीचा, चोखोबांच्या भगवद्भक्तीचा,ज्ञानदेवांच्या क्रांतीकारी विचारांचा होता.आणि दोनच दिवसांनी केशवभटाच्या हस्ते छोटा तीर्थ कलश वाजतगाजत चोखोबांच्या घरी आला.नेमकी जागा निश्चित करुन कलशाची प्रतिष्ठापना करण्यांत आली. शरीराचि अणूरेणू विठ्ठलमय झालेल्या चोखोबांना कलशाच्या जागी,कटेवर हात  हात ठेवुन उभा असलेला विठ्ठल दिसला. आणि उत्स्फुर्त शब्द उमटले…

विठोबा पाहुणा आला आमुचे घरा।
निंबलोण करा जीवे वावे।
पंचप्राण ज्योती ओवाळुन आरती।
ओवाळीला पती रखुमाईचा।
षडरस पक्वान्नाने विस्तारले ताट।
जेवू एकवट चोखा म्हणे।।

तो कलश आपल्या घरी राहणार म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठलच आपल्या घरी येतोय!हा पांडुरंगाने आपल्यावर दाखवले ला विश्वास व बाळ कर्ममेळाचा पायगुण आहे या भावनाने,भक्ती करण्याचे व संघर्षाला सिध्द होण्याचे बळही मिळाले.सगळं सुखनैवं चालले असतांना, परमेश्वराच्या मनांत वेगळेच चालले होते. आपल्या भक्तांना छळण्यांत त्याला विशेष आनंद वाटतो.भयंकर घटना पंढरपूरांत घडली.अस्पृश्य चोखोबांचे वाढलेले प्राबल्य समाजांतील किंही घटकांना सहन होत नव्हते.चोखोबांचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरु होते. नेहमी प्रमाणे त्या दिवशीही नामदेवांच्या विलक्षण रंगलेल्या किर्तनात मध्यरात्र कधी उलटली कुणाला कळलंही नाही. किर्तन संपल्यावर चोखोबा घरी येत असतांना वाटेतील समोरच्या विठ्ठल मंदिराच्या पायर्‍या चढुन महाद्वार बंद असल्याने तिथुनच दर्शन घेऊन घरी आले व निद्राधिन झाले.

दुसर्‍या दिवशी गावकीची नेमलेली कामे आटोपल्यावर शुचिर्भूत झाले.इकडे केशवभट शंकरभटाच्या मदतीने विठ्ठलाची षोडोपचारे पुजा आटोपल्यावर,विठ्ठलाला एकएक दागिना  चढवायला सुरुवात केली.आणि अस्सल तेजाने लखलखणारा नवतरत्नाचा हार गायब!सर्वीकडे शोध घेऊनही चंद्रहार न दिसल्याने दोघेही खुपच घाबरले.आणि शंकरभटाने हार चोरीला गेल्याची बोंब ठोकली.दोघांचा आरडाओरडा ऐकुन देवाळाबाहेर गर्दी उसळली.कोणीतरी मुख्य पुजारी गोविंदभटाला बोलावुन आणले.हे निंद्य कृत्य ज्याने केले त्याला शिक्षा झालीच पाहिजे.गोविंदभटाने तातडीने मंदीराच्या विश्वस्तांची बैठक बोलावली.कसुन चौकशी सुरु झाली.सर्व दागिने,उपकरण,भांडी सर्व सोडुन फक्त रत्नहारच कां चोरला असावा?

तेवढ्यात नागेश बडवा अचानक म्हणाला हे काम त्या चोखोबाचेच!मध्य रात्री मी चोखोबाला मंदिरासमोर बघीतले त्यानेच कांहीतरी क्लुप्ती करुन,नेमका रत्नहार घेऊन पसार झाला असावा. मंगळवेढ्यातही तो असाच बेभान होऊन मंदिरांत शिरलेली भूतकाळातील घटना आठवली,त्यात तीर्थप्रकरण सगळ्यांच्या डोळ्यात सलत होतेच.ज्ञानदेवांची मध्यस्थी असल्यामुळे नाईलाजाने चुप होते,पण देवाचं तीर्थ अस्पृश्य वस्तीवर नेण्यास सर्वांचा विरोधच होता.चोखोबाने नुसता हारच चोरला नाही तर,देवालाही स्पर्श झाला असेलच!या गुन्ह्याबद्दल त्याला जबर शिक्षा देण्याचे एकमताने ठरवुन बैठक संपली. इकडे चोखोबा नेहमीप्रमाणे आज पण पात्रातील तीर्थ हलवले तर तळाशी कांहीतरी दिसले म्हणुन दोन बोटाच्या चिमटीने धरुन वर काढले तर चक्क विठ्ठलाच्या गळ्यातील रत्नहार!त्यांचा विश्वासच बसेना.रात्री त्यांना स्वप्न पडले की,खोपटाबाहेर ब्राम्हणवेशातील एक व्यक्ती त्यांना हाकारत..चला चोखोबा… पांडुरंगाने तुम्हाला बोलावले आहे. भारावल्या अवस्थेत त्या व्यक्तीबरोबर चोखोबा चालत मंदिराच्या महाद्वाराबाहेर थांबल्यावर….

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *