ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.११०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

  ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग ११०

सहज कर्म भक्ति घडवया कोडें । ज्ञानघन निवाडे नाम जपों ॥ नाम मात्र नमन ज्ञानघन पूर्ण । रामनामे कर्ण भरू रया ॥

सत्वाचे सागरी उतरो पैलथडी । रिती अर्धघडी जावो नेदो ॥ ज्ञानदेवा चित्त अवघे धन गोत । रामनामे तृप्त सकळ जीव ॥

अर्थ:-

 परमात्म्याची सहज भक्ती करण्यासाठी व ज्ञानधन मिळवण्यासाठी नाममंत्र जप हा उत्तम कर्म मार्ग आहे. रामनामाच्या घोषाने कान भरुन गेले की त्या नामामुळे ज्ञानधन मिळते.

रिकामा वेळ न घालवता नामस्मरणात रत झाले तर सत्व समुद्र पार होतो म्हणजे मुक्तीचा मार्ग मिळतो. रामनामामुळे मी तृप्त झालो माझे चित्त त्या नामाने व्यापले व ज्ञानधन मिळाले असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *