ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१०६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग १०६

समाधि साधन संजीवन नाम । शांति दया सम सर्वभूतीं ॥ शांतीची पै शांती निवृत्ति दातारु । हरिनाम उच्चारु दिधला तेणें ॥

शम दम कळा विज्ञान सज्ञान । परतोनि अज्ञान नये घरा ॥ ज्ञानदेवा सिध्दी साधन अवीट । भक्तिमार्ग नीट हरिपंथीं ॥

अर्थ:- –

ज्ञानेश्वर माऊली नाम हेच संजीवन समाधीचे साधन आहे व जो हे नाम घेतो त्याला शांती,दया व सर्वाभूती समता प्राप्त होते. निवृत्तिनाथांनी उदार होऊन मला शांतीची शांती,परमोच्च शांती दिली व ती प्राप्त करण्याचा हरिनाम मंत्र दिला. शम-दमादी सर्व

कला,विज्ञान व ज्ञानाचे समत्व करणारे ब्रह्मैक्य मला प्राप्त झाले.समाधीची सिध्दी प्राप्त करणारा हा हरिनामाचा भक्तीपंथ मला प्राप्त झाला असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

Dnyaneshwar Mauli guides us that the way,

Equipment of meditation, Samadhi is chanting name of God which is Sanjivana means always live.It bestowed me peace, pity, equality for all.The real donar,my Satguru Nivrutti Nath gave me supreme peace.He gave me name of God to chant.

This eradicate ignorance in myself.This gave me all stages in spirituality, wisdom, science (Dnyan-Vidnyan).This is a very straight and simple path of spirituality.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *