ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१०३

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

 ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग १०३

समरसें घटु विराला विनटु । एकरूपे पाटु गेला सांगसी ॥ कृष्ण कृष्ण वाट सांपडली नीट । जिव्हेसी घडघडाट इंद्रियेसहित ॥

मनाच्या मोवनीं समाधीच्या ध्यानीं । चिंतिला पद्मासनीं आत्मराजु ॥ ज्ञानदेवा चित्त कृष्णध्यानी रत । जन्म जरामृत्यू हारपली ॥

अर्थ:-

 जीवरुपी घट ज्ञानामध्ये विरुन जातो.तसेच आडव्या उभ्या धाग्यांचा पट कापड रुप प्राप्त झाले की धाग्यांचे एकत्वच दिसते. त्या कृष्ण नामाचे सतत पठण जिभेने केल्यांने सर्व इंद्रियांना ही ती सवय लागली. आत्मराज जीव पद्मासन घालुन त्या नामाचे चिंतन करु लागला की

मनाला मोहिनी पडुन समाधीच्याअवस्थेत ध्यान पोहचते.चित्त कृष्ण नामात रत झाले की जन्म मृत्यूचे भय उरत नाही असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *