ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.213

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेशअभंग २१३

मृगजळाच्या जळीं चाळिसी जळचरें । कैंचें जळ तेथे कोठे मत्स्य रे ॥ नाथिलीच खटपट करिसील किती । गगनींची सुमनें तुरंबिसी मस्तकी ॥

वांझेचिया सुता रचशील मारे । कैचापुत्र तेथे कायी संव्हरे ॥ कोल्हैरीचे वारू आणिशिल बसावया । कैचा राऊत कोणा जिकिशील रया । ऐशी नाथिलीचि नाटकें आचरसी किती । ज्ञानदेव म्हणे सहजे निवृत्ति ॥

अर्थ:-

मृगजळात जळचर चाळुन घेण्यास जातात पण त्या पाण्यात काय मासे असतात का? आकाशाच्या फुलांना वास कुठे किंवा ती डोक्यात कशी घालावी? ही वाऊगी खटपट नाही का? वांझेच्या मुलास मारण्यास मारेकरी आणले पण तो मुलगाच नाही

मग ते कोणाला मारतील. सैनिकाला बसण्यास कुंभाराने बनवलेला घोडा आणला तर तो युध्द कसे लढेल? ही अशी किती खटपट करशील नाटके करशील त्याने काही मिळणार नाही त्या पेक्षा श्री गुरु निवृत्तीनाथांना शरण जा असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *