ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.172

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-७ वे, बाळक्रीडा अभंग १७२

गायी चालिल्या वनाप्रती । सर्वे पेंद्या चाले सांगाती ॥ वळी गोवळिया कान्होबा । यमुने पाण्या नेई तू बा ॥ पांवया छंदे परतल्या गाई ।

विसरल्या चारा तल्लीन ठायी । ज्ञानदेव सवे सवंगडा लाठा । गाई हांकितो गोठणा तटा ॥३॥

अर्थ:-

गाई वनामघ्ये नेत असताना कृष्णासवे पेंदया चालला तेव्हा पेंदया म्हणाला हे कान्हा यांना तू यमुनेच्या तीरावर पाणी प्यायला ने तेव्हा कृष्णाने पावा वाजवायला सुरवात केली व त्या गाई चारा खायला विसरल्या व

तल्लीन झाल्या. मी त्या सर्व संवगड्यांपैकी मोठा सवंगडी होऊन गोठ्यापर्यत नेण्याचे काम करतो असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *