संत चोखामेळा म. चरित्र २

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत चोखामेळा  भाग  –  २.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

त्या ब्राम्हणाच्या स्वरांतील अजिजी खरी होती,पण त्याचे तेजपुंज डोळे?त्याच्या विनवणीत लाचारी नव्हती तर एक लोभस,लाडिक आर्जव होते.सावित्री ला त्याचे ते लोभस,लाडिक भाव आणि त्याच्या डोळ्यांतील तेज आपल्या ह्रदयांत साठवीत जपुन ठेवावेसे वाटले. अनवधाने म्हणाली,घ्या महाराज घ्या एक आंबा,सुदामा अगss अगss करतोय, तोवर एक आबा त्या ब्राम्हणाच्या झोळीत टाकला व त्याच्यापुढे नमस्कारा ला वाकली असतां,त्याने प्रसन्नपणे आशिर्वाद दिला…पुत्रवती भव्! तुझ्या घराण्याचं नाव मोठ करणारा मुलगा होईल,असा आशिर्वाद देऊन निघुन गेला सावित्री आनंदाने अस्मान ठेंगणे झाले.

दोघांनी आपापल्या टोपल्या उचलुन वाट चालु लागले,तेवढ्यात हाक आली माईss थांब! मागे वळुन पाहिले, तर तोच ब्राम्हण अर्धवट चोखलेला आंबा घेऊन दिसला.त्याच्या लोभस चेहर्‍याकडे बघीतल्यावर,पाटलाच्या पडवीतल्या भिंतीवर लावलेला फोटो,गवळणीच्या खोड्या काढणार्‍या खट्याळ श्रीकृष्णा सारखा दिसला,म्हणाला! माई, घे तुझा आंबा,नको मला,आंबट आहे असं म्हणत तो आंबा सावित्रीच्या ओटीत टाकुन झपा झप चालत वळणावरुन दिसेनासा झाला   नंतर पंढरपूरला पोहचल्यावर बुधाजी पाटलाने विठुरायासाठी आंबे दिल्याचे तेथील बडव्यांना सांगीतलं.त्याने आंबे मोजल्यावर एक आंबा कमी का? असे विचारल्यावर,सावित्रीने वाटेत घडलेली हकिकत सांगीतली,पण विश्वास न बसल्याने, शिवीगाळ करुन हाकलुन दिले.दोघांनी मंदिराच्या कळसाला नमस्कार करुन गांवाबाहेरील एका झाडा खाली विसावले.दोन घरुन भाकर पाणी आणुन खाऊन धरणीचे अंथरुण व आकाशाचे पांगरुण करुन तिथेच झोपले.सावित्री झोपेत असतांना आपल्या सर्वांगात तेजाचा एक प्रज्वलित कण मनांत,ह्रदयात खोल खोल कप्प्यात  उतरत असल्याचा विलक्षण भास झाला. गाढ झोपेतली सावित्री धडपडुन उठुन बसली.सगळीकडे शांतता स्तब्धता,त्या निरव शांततेत तिला तो नाद स्पष्ट ऐकु आला.विठ्ठलाss विठ्ठलाss  जय हरी विठ्ठला।विठ्ठलाss विठ्ठलाss जय हरी विठ्ठलाss ! झुंजमुंज व्हायला आली. गाढ झोपलेल्या निरागस नवर्‍याकडे पाहुन आपण त्यांना एक बाळ देऊ शकत नाही याचे तिला  वैषम्य वाटले. अचानक त्या ब्राम्हणाचा आशिर्वाद व रात्री स्वप्नात पाहिलेले तेजाचे आरपार जाणे,नीरव शांततेत घुमणारा विठ्ठलाचा गजर!तिने भक्तीभावाने डोळे मिटुन मंदिराच्या कळसाला नमस्कार करुन सुदामाला उठवले.

दोघेही घरी परतले.त्यांचा रोजचा दिनक्रम सुरु झाला.आणि सावित्रीला दिवस गेल्याचे लक्षात आल्यावर दोघांना ही अतिशय आनंद झाला.यथावकाश सावित्रीने एका गोंडस बाळास जन्म दिला.त्या ब्राम्हणाने चोखलेला आंबा प्रसाद म्हणुन खाल्ल्याचेच हे फळ आहे. याची सावित्रीला खात्री वाटली.बाळाचे नांव चोखामेळा ठेवण्याचे ठरविले. कर कटेवर ठेवून विटेवर उभा असलेला तो काळा विठ्ठल सारं अपूर्वाईनं बघत होता.त्याच्या भक्तमेळ्यात आणखी एक मोलाची भर पडणार होती. चोखामेळा! मलिन असुनही जो चोख आहे,अपवित्र असुनही जो पवित्र आहे तो चोखामेळा!विठ्ठलालाही आनंद झाला तो वाट बघत होता एका भक्त शिरोमणीची….

चोखा जसजसा मोठा होऊ लागला तसं त्याला आवरतां आवरतां सावित्री दमुन जात होती.सुदामाही गावकीची कामे भराभर आटोपुन पोराच्या ओढीने,त्याचे लाड करायला, खेळायला लवकर घरी येत असे.विठोबा च्या रंगाचं हे काळं सावळं पोर बुध्दीने तल्लख व स्वभावाने शांत होता.मुलांमधे मिसळायला,शिव्या भांडणे करायला त्याला आवडत नसे.सुदामाने त्याला खेळायला एक लाकडी बाहुला दिला होता.चोखा त्या बाहुल्याला रोज आंघोळ घालणे,उभे गंध लावणे,तो बाहुला विठोबासारखा दिसायचा,सावळ्या विठोबाचे त्याला भारीच वेड!त्यांच्या घरात वारी होतीच.त्याचे वडील सुदामा वारीतील गमती जमती सांगायचे.विठोबा च्या नामगजराने,जयघोषाने आसमंत कसा दुमदुमुन जातो याचे रसाळ वर्णन करायचे.मग चोखा त्या विठ्ठलमूर्तीकडे तासन् तास पाहत किंवा त्याच्याशी बोलत बसायचा.बाहुल्याची जशी रोज आंघोळ घालायचा तसच रोज स्वतःच्या आंघोळीसाठीही हट्ट धरुन बसायचा

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *