संत चोखामेळा म. चरित्र ३९

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

 संत चोखामेळा  भाग- ३९.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

चोखोबांचे सर्व संकल्प सिध्दीस गेले होते.आता फक्त “त्याच्या” बोलावण्याची वाट बघत होते.अशातच मंगळवेढ्याच्या गांवकुसाबाहेर वेशीची भींत,व बुरुज बांधण्यासाठी सर्व येसकरां नी जमावे,त्यातुन २-४ वर्षांची मुले, आजारी किंवा म्हातारी या कोणालाही सवलत नव्हती.या सर्वांनी सरदाराला भेटण्याचा हुकुम निघाला.चोखोबाला सुध्दा जाणे भाग होते. खरं तर लटपटत्या पायाने व थरथरत्या हाताने चोखोबा काय करुं शकणार होता,पण राज्यकर्त्यापुढे असले प्रश्न विचारायचे नसतात.चोखोबांनी जाण्याची तयारी केली.दोन वर्षे बांधकाम चालणार,त्यामुळे  दोन वर्षासाठी लागणारे सामान बांधुन बाकीचे कर्ममेळा ला न्यायला सांगीतले.त्यांनी जाण्याची सिध्दता केली खरी,पण कां कोण जाणे त्यांना विचित्रशी भीती,शंकांचे वादळ, विचारांचे काहूर माजले होते.वेदनेने ओथंबलेला अस्वस्थपणा सार्‍या शरीर भर पसरला होता.हद्दपारीच्या वेळीही असे वाटले नव्हते.जाणे तर भाग होते. जाण्यापुर्वी नामदेवांच्या भेटीस गेले असतां त्याच्या चेहर्‍यावरील व्याकुळता पाहुन,नामदेवांनी विचारले, तुम्ही असे घायाळ कां?ही बहुधा आपली शेवटची भेट असावी.शेवट पंढरपूरांत व्हावा अशी फार इच्छा होती,पण…

देवा! या शिष्याची एक विनंती आहे,नव्हे हट्ट आहे.या दोन वर्षात जर मंगळवेढ्यात माझा मृत्यु झाला तर,जसे  मंगळवेढ्यात उकीरड्यात पडलेल्या या चोख्याला उचलुन पंढरपुरी आणुन आयुष्याची दिशा बदलवली,तसेच यावेळीही माझ्या आयुष्याचे कांही बरे वाईट झाले तर,मातीत पडलेल्या या चोख्याला  पंढरपुरी घेऊन यावे.नामदेवां नी गहिवरुन नुसत्या स्पर्शाने आश्वासन दिले.शांत होऊन चोखोबा घरी परतले. दुसर्‍या दिवशी तुकडीबरोबर अनंत आठवणींची शिदोरी घेऊन मंगळवेढ्यास रवाना झाले

मंगळवेढ्याच्या प्रवासाची दगदग चोखोबांना सोसली नाही.ते आजारी पडले.पण आजाराचे कौतुक करायलाही त्यांना वेळ मिळाला नाही.यावनी आक्रमणाला तोंड देण्यासाठी गांवाबाहेरी ल वेशी संरक्षीत करण्यासाठी तटबंदी बांधण्यासाठी १०० मजुर आणण्यात आले होते.त्यातले बरेचसे पंढरपुर परिसरातले असल्यामुळे ते चोखोबांना ओळखत होते.चोखोबांचे कार्य आणि नांव गाजलेले असल्यामुळे सर्वजण त्यांना मान देत असत.त्यांच्या वयाचा व कार्याचा मोठेपणामुळे खड्डे खणने,घमेले उचलणे सारखी कष्टाची कामे त्यांना कुणी करुं देत नसत.तरीही विठ्ठलाचे नामस्मरण करत दिवसभर कामं करीत राही.संध्याकाळी कामं आटोपल्यावर मात्र,पंढरपूरच्या आठवणी,विठ्ठलमंदिर, नामदेव,खोपटे,दीपमाळ,विशेषतः पांडुरंगाचा वियोग सारे आठवत,जाणवत असे.आणि मग पांडुरंगाच्या वियोगाने दुःखी झालेल्या वेदना अभंगरचनेतुन बोलक्या व्हायच्या.ते भजन गायला लागले की,मजुर अगदी तल्लीन होत असे.असेच चार महिने उलटले,त्या मजुरांमधे गोविंद नावाचा मजुर होता.त्याला २-३ वर्षाचा मुलगा होता.तो सतत चोखोबांच्या मागेपुढे करायचा.त्या बाळात त्यांना गोपालकृष्ण दिसायचा.

ज्या बुरुजाचे काम सुरु होते,त्यात एक गुप्त दरवाजा ठेवायचं अत्यंत जोखमीचं व गुप्ततेचे काम होतं.त्यासाठी चोखोबा व त्यांच्याचसारखी इतर वयस्क अनुभवी मंडळींना सरदाराने बोलावुन हुकुम सोडला,तुम्ही चारजणां मिळुन येत्या चोवीस तासात अविरत हे काम पुर्ण करायचे.चौघेही वयस्कर असल्या मुळे पुर्तता होणे अवघड होते,पण हुकमापुढे इलाज नव्हता.पण चोखोबांचा विठ्ठलावर भरवसा होता.दुसर्‍या दिवशी चौघेही बुरुजातल्या गुप्त दाराच्या कामास लागले.रात्र झाली तरी काम आटपत नव्हते.चौघांनाही विश्रांतीची अत्यंत आवश्यकता होती,काम थांबवुन भाकरतुकडा खाल्ला.अजुन बरेच काम बाकी असलेल्या कामाबद्दल चर्चा करीत होते.उरलेले काम येणार्‍या रात्रीत पूर्ण करायचे होते.काम पुर्ण झाले तर मोठे बक्षीस,अर्धवट राहिले तर देहदंडाची शिक्षा!प्रसंग मोठा बाका होता.शरीर व मन अतिशय थकल्यामुळे त्यांना कांही कळायच्या आंतच गाढ निद्रा लागली. जागेपणाची जाणीव हरपण्यापुर्वी चोखोबाने विठ्ठलाला साकडे घातले. आतां तारणारा,मारणारा तूंच आहे विठुराया! आणि त्यांचे भान हरपले.मध्य रात्र उलटुन गेली.मजुरवस्तीतील गोविंद लघुशंकेसाठी उठला असतां,बुरुजाच्या भिंतीच्या बांधकामाच्या ठीकाणावरुन आवाज ऐकु आल्याने,कुतुहलापोटी पुढे जाऊन बघीतले तर,चांदण्याच्या प्रकाशात चोखोबा एककटेच बुरुजाच्या भिंतीचे बांधकाम करीत असलेले दिसले. त्यांना २-३ हाका मारल्या पण ते इतके कामात मग्न होते की,त्यांना हाका ऐकुच आल्या नाहीत.मग गोविंदाने नाद सोडला व झोपायला गेले.दुसरा दिवस उडाडला तोच मुळी एक विलक्षण प्रश्न घेऊनच!

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *