संत चोखामेळा म. चरित्र ३४

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

 संत चोखामेळा  भाग  – ३४.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

चोखोबा! मी आतां तीर्थाटनाला जातोय,परतायला बराच अवधी लागेल. आतां तुम्हाला कोणाची गरज नाही. तुमचा एकांतवास असाच व्यतीत करा. आशिर्वाद देऊन नामदेव संतपरिवारासह परत गेले.हव्या तेवढ्या वीटा जमा झाल्यावर चोखोबांनी दीपमाळेच्या बांध कामाला सुरुवात केली.दीपमाळेचे बांध काम,श्वासागणिक उच्चारले जाणारे विठ्ठलनाम व अधूनमधून रचली जाणारी अभंगरचना असा त्रिमूर्ती कार्यक्रम अविरत सुरु होता.मधुन मधुन पंढरपूर हुन त्यांना भेटायला संतमंडळी आले की,  तो दिवस अतिव आनंदात जात असे. सोयराही त्यांचे आगत स्वागत मोठ्या आनंदाने करीत असे. एक दिवस असा प्रसंग घडला की, चोखोबांच्या बुध्दीचातुर्याची आणि अध्यात्माच्या खोलीची झलक सगळ्याना अनुभवायला मिळाली.नामदेव तीर्थाटना वरुन आले त्याच दिवशी संतमेळा चोखोबांना भेटण्यास आले,पण त्यांच्यात नामदेव व जनाबाई दिसले नसल्याने, चौकशी केल्यावर ते मागाहुन येत असल्याचे कळले.सर्व मंडळी त्यांची वाट बघत गप्पा गोष्टी सुरु असतांना,अचानक चोखोबा म्हणाले….

” कैसा हा हाट कवणाची गोणी।वेगळाचि राहिला मालधणी।
कवणाचा वाण विकतसे कवणा।अवघा पसारा ठेवी झाकोन।।
मावळला दिन झाकलास हाट।अवघा बोभाट वाटलासे।
चोखा म्हणे माप भेटियेले सिंगे।आता कोणाचे पदरी देऊ उगे।।
ही अभंगरचना सुरु असतांनाच जनाबाईसह नामदेव येऊ पोहचले.वाss चोखोबा वाss हे नाविन्यपुर्ण हाटाचे आणखी अभंग ऐकवा.मग हाटावर बरेच व्यक्तव्य करुन सुंदर सुंदर अभंगरचना चोखांनी म्हणुन दाखवले.नामदेव म्हणाले हाट संकल्पना ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत अत्यंत समर्पक रीतीने मांडली आहे.ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, “एरव्ही त्रैलोक्य हे धनुर्धरा ।
तिथे गावीचा हा पसारा ।।तो हा दिनोदयी एकसारा।मांडत असे।
पाठी रात्रीचा समो पावे।आणि आपैताचि साठवे।


म्हणिजे जेथीचे तेथं स्वभावे।साम्यासि येअभंग संपताच सगळ्यांनी भक्तिभावाने हात जोडले.चोखोबा म्हणाले, देवा ।ज्ञानोबा माऊली म्हणजे साक्षात ईश्वराचा अवतार वयाच्या अठराव्या वर्षी त्यांच्या ज्ञानाचं तेज सहस्र सूर्याइतकं होतं.त्यांची विद्वता एवढी मोठी होती की, सारं जग त्यांच्यापायाशी झुकलं असतं,पण पृथ्वी वरचं जिवितकार्य संपवण्याची जाणीव झाल्याने त्यांनी समाधी घेतली.संतांनी कसं जगावं?किती जगाव?कसा या जगाचा निरोप घ्यावा याचा आदर्शच ज्ञानोबा माऊलीने घालुन दिलं.असं अलौकिक कार्य ,असं लोकोत्तर जीवन, अशी संजीवनी समाधी हे सगळं,मी यति हीन असुनही मला या सर्वांचा साक्षीदार होता आलं यापेक्षा आयुष्याचं वेगळं सार्थक कोणतं?तुम्हा सर्वांच्या प्रेम, आपुलकीमुळे माझं कचराकुंडीसारखं जीवन तीर्थक्षेत्र बनलं.भावनाविश होऊन  चोखोबा बोलत होते.त्यांच्या त्या शब्द वैभवाने ज्ञानेश्वरांचा संजीवन समाधीचा प्रसंग जसाच्या तसा सर्वांच्यासमोर उभा राहिला.एकांतवासात चोखोबांच्या बुध्दी ला आणखी धार चढली.भक्तीची तिव्रता वाढली.अभंगरचनेतुनाआत्मज्ञानाची व्याप्ती रुंदावली.माणसांचा भूकेला चोखोबा माणसांपासुन दूर फेकल्या जाऊनही आयुष्य व्यवस्थित सार्थकी लावले.नामदेव तीर्थाटनाला गेल्यावर अदृष्यरुपाने विठोबा त्यांची प्रगती बघत होते.

ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीला समाधी घेतल्यानंतर कांही दिवसांनीच सोपानदेवांनीही सासवडला समाधी घेऊन पंचतत्वात विलीन झाले.पुढच्याच वर्षी ज्ञानदेवांची लाडकी बहिण मुक्ताई जी साक्षात आदीमाया,आदीशक्ती तिने मेहुण येथे स्वतःला पंचतत्वात विलीन केले.या तिघांनंतर ज्ञानदेवांचे गुरु व मोठे बंधु निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वर येथे आपला देह ठेवला.आपले कार्य पूर्ण झाल्यावर,प्रत्यक्ष परमेश्वर स्वरुप असलेल्या चारही भावंडांनी स्वतःला परमेश्वरा स्वाधीन केले.चोखोबांना हा विरह तर फार मोठा होताच,पण जास्त दुःख गोरोबाकाकांच्या मृत्युने झाला. गोरोबांच्या आधी सावतामाळी,विसोबा खेचर,नरहरी सोनार यांचेही मृत्यु झाले. नामदेवांनंतर चोखोबांवर त्यांची श्रध्दा होती.गोरोबांच्या पाठोपाठ दुसरा मोठा आघात चोखोबांचा लाडका शिष्य व मेहुणा असला तरी त्यांचे बंकाशी एक वेगळे नाते होते.म्हणुनच त्याच्या जाण्याचे दुःख चोखोबाला चटका लावुन गेले. एके दिवशी नामदेव व जनाबाई भेटीस आले असतां,समग्र चर्चा झाल्या वर नामदेव म्हणाले,काळ कुणासाठी थांबत नाही.सृष्टीचक्र नियमित चालुच असते.विठोबा व गुरुमाऊलीच्या आज्ञेने तीर्थाटन करुन शतकोटी अभंग लिहिण्या चा संकल्प सोडुन वारकरी संप्रदायाची पताका सार्‍या महाराष्र्टात पसरवली. आतां पंजाबात जाण्याचा संकल्प आहे.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *