चंपाषष्ठी, माहात्म्यव व्रत विधी, आरती संपूर्ण माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

चंपाषष्ठी उत्सव का साजरा करतात.?

चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते.
मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात.

चंपाषष्ठी उत्सवाचे स्वरूप कसे आहे.

खंडोबा- म्हाळसा -बाणाई
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते.
जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो.

खंडोबा मंदिर जेजुरी पुणे
नवरात्री पूजा

कुलाचाराप्रमाणे ज्यांच्या पूजेत सुघट व टाक असतात ते त्यांची पूजा करतात.
नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात.
सहा दिवस नंदादीप लावतात.[४]
जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या अन्य देवळांतही |खंडोबाचा उत्सव असतो.
घटाची स्थापना,नंदादीप,मल्हारी महात्म्य वाचणे व त्याचा पाठ करणे,
एकाच वेळी जेवणे (एकभुक्त),|
शिवलिंगाचे दर्शन घेणे,
ब्राह्मण-सुवासिनी तसेच वाघ्या आणी मुरळी यांना भोजन देणे असे शा दिवस केले जाते.
चंपाषष्ठी या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवितात.
तसेच
या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात.
खंडोबाची तळी भरून आरती करतात.

अन्य
मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाचा दिवस म्हणजे देवदीपावली किंवा मोठी दिवाळी.
मुख्यत: चित्तपावनांमध्ये कुलदैवत, ग्रामदैवत यांना भजण्याचा तो दिवस.
चित्तपावनांमध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे-घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो.
प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्यांची संख्या वेगळी असते.
गावातील मुख्य देवता, इतर उपदेव-देवता महापुरुष, वेतोबा, ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात. त्याचबरोबर
काही कुटुंबांत पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात.
त्यामुळे नैवेद्याच्या पानांची संख्या सतरा, चोवीस, नऊ अशी कोणतीही असते.

चंपाषष्ठी ला सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्घ्य देण्याची पद्धती आहे.

का साजरी करतात चंपाषष्ठी
मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्र सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. यास खंडोबाचें नवरात्र असें म्हणतात. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. जेजुरी ह्या गावी मल्हारी देवस्थान आहे.

चंपाषष्ठी उत्सवाची कथा अशी आहे

मल्हारी मार्तंड नांव का पडले.

आजच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन ‘मणी’ व ‘मल्ल’ दैत्यांचा वध केला.
‘मल्हारी मार्तंड’ हा महादेवाचा एक अवतार होता.
कृतयुगात ब्रह्म देवाने मणी व मल्ल राक्षसांना वर दिले होते की तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही.
हे वर प्राप्त केल्यावर ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले.
त्यांचा हा त्रास बघून ऋषीमुनींनी देवांकडे मदत मागितली.
तेव्हा भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपले ७ कोटी अर्थात येळकोट सैन्य घेऊन राक्षसांवर चालून गेले.
मार्तंड भैरवांनी मणी राक्षसाची छाती फोडून त्याला जमिनदोस्त केले.
तसेच
मणी राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे व माझे अश्वारूढ रूपही तुझ्या शेजारी राहावे अशी इच्छा व्यक्त केली.
भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले.
नंतर
मार्तंड भैरवांनी मल्ल राक्षसाचा पराभव केला, तेव्हा त्याने शरण जाऊन तुमच्या नावाआधी माझे नाव जोडले जावे अशी मागणी केली.
तथास्तु म्हणून
मार्तंड भैरवाने तेही मान्य केले. तेंव्हापासून त्यांना मल्हारी मार्तंड असे म्हटले जाते.

या दिवशी प्रामुख्याने वडे-घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो.
तसेच
या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवितात.
तसेच या नैवेद्याचा काही भाग कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात.

चंपाषष्ठी संपूर्ण माहिती

श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत खंडोबाची उपासना जास्त केली जाते.

खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते.
मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले.

नवरात्राचे पांच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात.
सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. देवाला बेल, दवणा व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती वाहतात.

भंडारा
खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्वाचा आहे.
भंडारा म्हणजे हळदीची पूड.
खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यांत दही व मीठ घालतात.), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यांत असतात.
देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधि असतो.

खंडोबाची तळी कधी भरावी.
खंडोबाची तळी कशी भरावी.


तळी भरणे म्हणजे एका ताम्हनात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हन “सदानंदाचा येळकोट” किंवा “एळकोट एळकोट जय मल्हार” असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात. नंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात.

खंडोबाची पांच प्रतिके:
१) लिंग: हे स्वयंभू, अचल अगर घडीव असते.
२) तांदळा: हि चल शिळा असून टोकाखाली निमुळती होत जाते
३) मुखवटे: हे कापडी किंवा पिटली असतात.
४) मूर्ती: ह्या उभ्या, बैठ्या, घोड्यावर कधी धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात.
५) टाक: घरांत पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर बनविलेल्या प्रतिमा.

खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसास पावणारी आहे. त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्व आहे.

काही सौम्य नवस:
१) मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे.
२) दीपमाळा बांधणे.
३) मंदिर बांधणे किंवा मंदिराचा जीर्णोद्धार करणे.
४) पायऱ्या बांधणे, ओवरी बांधणे.
५) देवावर चौरी ढाळणे. खेटे घालणे म्हणजे ठराविक दिवशी देवदर्शनास जाणे.
६) पाण्याच्या कावडी घालणे.
७) उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरांत प्रतीकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळी कडून देवाची गाणी म्हणविणे. यालाच जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात.
८) देवाची गदा म्हणजे वारी मागणे. (देवाच्या नावाने ठराविक काळांत भिक्षा मागणे.)
९) तळी भरणे, उचलणे, दहीभाताची पूजा देवास बांधणे.
१०) पुरण-वरण व रोडग्याचा आठवा रीतिनुसार नैवेद्य करून ब्राह्मण, गुरव व वाघ्या-मुरळी यांस भोजन घालणे.
११) कान टोचणे, जावळ, शेंडी आदी विधी करणे. खोबरे भंडारा उधळणे, देवाच्या मूर्ती विकणे.

दिन विशेष: खंडोबाचा दिवस रविवार
रविवार हा खंडोबाचा दिवस मानण्यात आलेला आहे.

सोमवती अमावस्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्टी व महाशिवरात्र ह्या दिवसांना विशेष महत्व आहे. मल्हारी-मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्व आले असावे.
चैत्री पौर्णिमा हा मार्तंड-भैरवाचा अवतार दिन आहे.
श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बाणा यांचा विवाह झाला.
माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्म दिवस आहे.
तर
मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी खंडोबा,
ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले.

महाराष्ट्र आणि कर्नाटकांतील बारा प्रसिद्ध स्थाने:
महाराष्ट्र:
१) कडे-कऱ्हे पठार, जेजुरी
२) निमगाव
३) पाली-पेंबर सातारा
४) नळदुर्ग (धाराशीव-उस्मानाबाद)
५) शेंगुड (अहमदनगर)
६) सातारे (औरंगाबाद)
७) माळेगाव

कर्नाटक:
१) मैलारपूर-पेंबर (बिदर)
२) मंगसूल्ली (बेळगाव)
३) मैलारलिंग (धारवाड)
४) देवरगुडू (धारवाड)
५) मण्मैलार (बल्ळारी).

खंडोबाचे नवरात्र:
खंडोबा हे अनेक कुटुंबे आपले कुलदैवत म्हणून मानतात.
खंडोबाला मणि-मल्लाचा वध केला म्हणून मल्लारी (मल्हारी), मैलार, तसेच (म्हाळसाचादेवीचा पती म्हणून) म्हाळसाकांत, मार्तंडभैरव, किंवा (स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून) खंडोबा म्हणतात.
स्कंद पर्वतावरील श्रीशंकर आपल्या खड्गासह मल्लासुराचावध करण्यास आला,
त्यावेळी खड्गाला खंडा असे नांव पडले.
हा श्रीशंकरांचा अवतार खंडामंडित झाला म्हणून त्याला खंडोबा असे म्हणू लागले.

खंडोबाची वेशभुषा:
साधारणपणे विठ्ठलासारखी देहयष्टी,
पांढरे धोतर,
डोक्याला रुमाल,
अंगरखा,
उपरणे असा साधाच वेष असतो.

प्रमुख भक्ती:
बेल-भंडार वाहणे हीच त्याची प्रमुख भक्ति होय.
हळदपूड, सुक्या खोबर्‍याच्या वाट्या एकत्र करुन तो प्रसाद

” येळकोट येळकोट जय मल्हार ” हा गजर करतात.
याचा अर्थ असा लावतात,
की ‘हे खंडेराया, सर्वत्र भरपूर अन्न-धान्य पिकू दे. ज्यायोगे सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दान-धर्म करता येईल.

खंडोबाच्या हातातील वस्तु:
खंडोबाच्या चार हातांत खड्ग, त्रिशूळ, डमरु व रुधिर मुंडासह पानपात्र असते.
जवळ कुत्रा असतो.
मानप्रमाणे प्रथम मान नंदीला,
नंतर घोड्याला

नंतर कुत्र्याला असा असतो.

जेजुरी
जेजुरी हे गाव पुण्याच्या आग्नेयेस ३० मैलावर पुणे-पंढरपुर रस्त्यावर आहे.
उंच डोंगरावरील हे देवस्थान पूर्वाभिमुख आहे.
या मंदिरांत असणार्‍या राममंदिरांत एक लेख आहे.
त्याप्रमाणे हे स्थान ज्येष्ठ कृष्ण १३, शके १७९२ मध्ये श्री रामचंद्र मल्हार ढगे जोशी, बायजाबाईचे जेऊर यांनी बांधले असा उल्लेख आहे. गडकोटावर दोन्ही बाजूंनी उघड्या असणार्‍या ६३ ओर्‍या आहेत.

खंडोबाची उपासना:
खंडोबाचे उपासक मार्गशीर्ष प्रतिपदेपासून मार्गशीर्ष षष्ठीपर्यंत सटीचे नवरात्र म्हणून कुळधर्म पाळतात. प्रतिपदेला सकाळी लवकर उठून सडा-संमार्जन करावे.
नंतर
नवरात्र बसविणार्‍याने स्नान करुन शुचिर्भूत व्हावे.

खंडोबाची पूजा:
खंडोबाची तांदळा, शिवलिंग व चतुर्भुज मूर्ती या तिन्ही रुपकांची पूजा होते.
बरोबर कुत्रा व घोडे मात्र असतातच.
लग्नसमारंभांतच खंडोबाचा टाक घेतात.
घरी त्याच टाकावर नवरात्र बसविले जाते.

देवाची स्वच्छता, घासपूस करुन पूजा करावी.
कापूर-चंदनमिश्रीत पाणी एका भाड्यांत घेऊन ते पूजेसाठी वापरावे.
पूजा करताना फुले, गुलाल, व भंडार वहावा.
भंडार लावलेले तांदूळाचे दाणे वहावेत.
पूजा करताना देवाला प्रिय तांबडी, निळी, पांढरी कमळे व इतर त्या रंगाची फुले, पारिजातक, झेंडूची, मालती फुले अर्पण करावीत.

पत्री:
पत्री म्हणून देवाला नागवेलीची पाने, बिल्वपत्रे, हळदीची पाने, अशोकपत्रे, तुळसीपत्रे, दुर्वांकुरपत्रे, आंब्याची पाने, जाईची, कवठाची, जांभळीची, सबजाची पाने देवास विशेष प्रिय आहेत असे मल्हारी महात्म्यामध्ये म्हटले आहे. मिळतील ती पत्री-पाने देवास वहावी.

देवासमोर सुगंधी धूप जाळावा. उत्तम वस्त्रे,
अलंकार देवास अर्पण करावे.
देवासमोर वाटींत दूध ठेवावे.
त्रयोदशगुणी पानाचा विडा देवाला अर्पण करावा.
देवावर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधतात.

देवाजवळ नंदादीप
सहाही दिवस तेवत ठेवतात. देवाला रोज माळ वाहतात, देवाची रोज पूजा, नैवेद्य व आरती करतात. आरतीसाठी पीठाचे दिवेही केले जातात. सहा दिवसांपैकी एका दिवशी तरी उपवास करावा. मल्हारी महात्म्याचे, मल्हारी स्तोत्रांचे श्रवण नवरात्राच्या या दिवसांत फार फलदायी होते.

महानैवेद्य:
सटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य, वांग्याचे भरीत-बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखवितात.
खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून आठ महिने वांगी चालतात. महाराष्ट्रांत चातुर्मासांत कांदा, लसूण, वांगी वर्ज्य असतात. कांदा फक्त चंपाषष्ठीच्याच दिवशी चालतो.

चंपाषष्ठीस ब्राह्मण-सुवासीनीस भोजन,
वाघ्या-मुरळींस भोजन घालावेच भोजनानंतर त्यांना पानविडा-दक्षिणा देऊन नमस्कार करावा.
तसेच
खंडोबाची वाहने कुत्रा व घोडा यांनाही खाऊ घालावे.
सटीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य नेतात.
जेवण वाढले की घरांतील सर्वजण ब्राह्मण, वाघ्या-मुरळीकडून ‘ वारी खंडोबाची ‘ म्हणून त्यांच्या पानांतून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात.

तळी भरणे-उचळणे हाही नवस प्रकार करतात. नंतर नवरात्र उठवतात.
वारी मागणे-

काही घरांतून चंपाषष्ठीच्या दिवशी वारी मागण्याची पद्धत आहे.
वारीचा अजुनही एक प्रकार म्हणजे खंडोबाच्या रविवार या पवित्र दिवशी काही घराण्यांत वारी मागतात.
ताम्हण घेऊन पाच घरी ‘ वारी खंडोबाची ‘ म्हणून ओरडतात.
साधारणपणे कोरडे पीठ वारींत दिले जाते.
त्याची घरी येऊन भाकरी बनवून ती घरांतील सर्वजण प्रसाद म्हणून खातात.
यामुळे अशा घरास खंडोबा अन्न-धान्याची कमतरता कधीच भासू देत नाही असा समज आहे.

दान-धर्म:
या नवरात्रांत आपापल्या शक्तीनुसार खंडोबासाठी म्हणून दान-धर्म करावा.
अन्नदानास फार महत्व आहे.
कुंकू-अक्षतांसह पान-विडा द्यावा.

दिवटी-बुधले:
दिवटी- बुधले याचे महत्व असे आहे की मणिमल्लाचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याचे, पितळ्याची किंवा लोखंडाची दिवटी घेऊन ती पेटवावी आणि देवास ओवाळावे. ओवाळताना पायापासून डोक्यापर्यंत देवास ओवाळावे. नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावी. नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधांत शांत (विझवावी.) करावी.
व ते दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे.

लग्नकार्यांत अगर नंतर गोंधळ घालणे म्हणजेच मल्हारीची स्तुतीपर गाणी गाणे, ऐकणे, देवास त्यासाठी पाचारण करणे. याही प्रचलीत प्रथा आहेत.

आपल्या घरातील सर्वांना सुख, समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा, तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडःरात्रोत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढी प्रमाणे कुळधर्म कुलाचार पाळावेत.
मांसाहार, मद्यपान करू नये, विषयाच्या आहारी जावू नये.
घरामध्ये व्रत पाळावे, उपवास करावा, आचरण शुद्ध ठेवावे.
घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावे.

खंडेरायाची आरती

जयदेव जयदेव जय खंडेराया ।
भवतम संहारुनिया दाखवि निजमाया ॥धृ॥
शिवशंकर गौरीवर हर करुणाकर ।
निजभक्ताच्या साठीं घेउनि अवतार
भूलोकाच्या ठायीं येवुनि सत्वर ।
मणि – मल्हादिक दैत्या केला संहार ॥१॥
सर्वांगातें लावुनि भंडार पिवळा ।
कंठीं भूषण शोभे रुद्राक्षमाळा ।
सह्याद्रीचे वरुते बैसुनि अवलीळा ।
हरहर वदनीं बोलतसे वेळोवेळां ॥२॥
वसवोनिया बहुसुंदर सुस्थळ जेजोरी ।
महाळसा शोभतसे वामांकावरी ।
रघुविर – प्रिय अवतार तो हा मल्हारी ।
ह्मणवुनि निरंजन गुण गातो बहुपरी ॥३॥

चंपाषष्ठी श्रीखंडेरायाच्या उपासनेतील अत्यंत महत्वपूर्ण उत्सव,
श्रीमल्हारी मार्तंडाचे षडःरात्रोत्सावाचा सांगता
मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी अर्थात चंपाषष्ठी
चंपाषष्ठी श्रीखंडेरायाच्या उपासनेतील अत्यंत महत्वपूर्ण उत्सव, श्रीमल्हारी मार्तंडाचे षडःरात्रोत्सावाचा सांगता दिवस . आज मार्तंड भैरवाने मल्लासुर दैत्याचा संहार केला व भूतलावरील अरिष्ठ टाळले. विजायोत्सावामध्ये देवगणांनी मार्तंड भैरावावर भंडारा बरोबरच चंपावृष्टी अर्थात चाफ्याची पुष्पवृष्टी केली म्हणूनच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपाषष्ठी असे नाव मिळाले.

देवघरातील सर्व देवतांच्या मूर्तींची पंचामृताने ( दुध, दही, तूप, मध, साखर.) अभिषेक घालून षोडशोपचारे अथवा पंचोपचारे अथवा यथोमिलीतोपचारे पूजा करावी, चाफ्याची फुले देवाला अर्पण करावीत. घटावर फुलांची माळ लावावी.दिवटी प्रज्वलीत करून देवांना ओवाळावी. पुरणा – वरणाचा नैवेद्य आणि त्यासोबत भरित रोडग्याचा नैवेद्य देवाला दाखवावा, घोडा, कुत्रा आणि गाय यांना घास द्यावा.

घटोत्थापनकरून आप्तेष्ठांना सोबत घेऊन तळीभंडार करावा,
उपस्थितांना भंडार लावून पानसुपारी खोबरे द्यावे…
अशा रीतीने आज कुलस्वामी खंडेरायाची उपासना करुन लाभ घ्यावा.
मार्गशीर्ष महिन्यात येणारे हे नवरात्र देवीच्या नवरात्रासारखेच असते.

हा विशेषत: धनगराचा देव मानला जातो. अतिशय जागृत देव आहे. मुख्य भंडारा म्हणून हळद उधळली जाते; ज्वारीचा रोडगा व भरीत हा त्यांचा प्रसाद असतो.
सगळे मिळून श्री खंडेरायाला प्रार्थना करुया

जय खंडोबा जय म्हाळसादेवी |
सैदव आम्हांसी सुखी ठेवी |
योगक्षेमाची चिंता नसावी |
विजय व्हावा सर्वत्र || ९२ ||
पत्नी सुना कन्या पुत्र | कुटुंबपरिवार आणि पौत्र |
बंधुभगिनी आप्त मित्र | सुखी असोत सर्वही || ९३ ||
नोकरचाकर गुरेंढोरें | विद्या वैभव मिलो सारें |
वाहनसौख्यही लाभों खरें | शत्रु कोणी नसावा || ९४ ||
दुरित अवघें व्हावें दूर | ज्ञानसूर्य जावो अज्ञानतिमिर |
धनधान्य मिलो अपार | हीच पायी प्रार्थना

|| ॐ नमो मार्तण्ड भैरावय नमः ||
सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट
येळकोट येळकोट जय मल्हार

जेजुरगडपर्वत शिवलिंगाकार ।
मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ॥
नानापरिची रचना रचिली अपार ।
तये स्थळी नांदे स्वामी शंकर ॥ १ ॥
जय देव जय देव शिवमार्तंडा ।
अरिमर्दन मल्लारी तूंची प्रचंडा ॥ धृ. ॥
मणिमल्ल दैत्य प्रबळ तो झाला ।
त्रिभुवनी त्याने प्रळय मांडिला ॥
नाटोपे कोणास वरे मातला ।
देवगण गंधर्व कांपती त्याला ॥ जय. ॥ २ ॥
चंपाषष्ठी दिवशी अवतार धरिसी ।
मणिमल्ल दैत्यांचा संहार करिसी ।
चरणी पृष्ठी खंङ्‌गें वर्मी स्थापीसी ।
अंती वर देउनि त्या मुक्तीते देशी ॥ जय. ॥ ३ ॥
मणिमल्ल दैत्य मर्दुनी मल्लारी ।
देवा संकट पडतां राहे जेजुरी ॥
अर्धांगी म्हाळसा शोभे सुंदरी ।
देवा ठाय मागे दास नरहरि ॥ जय. ॥ ४ ॥
येळकोट येळकोट जय मल्हार…..
सदानंदाचा उदोउदो….

पंचांगानुसार, सोमवार, 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 01.35 वाजता मंगळ मासातील शुक्ल पक्षात षष्ठी तिथीला सुरू होत आहे. ही तिथी दुसऱ्या दिवशी मंगळवार 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.04 वाजता संपेल.अशा स्थितीत उदयतिथीनुसार मंगळवार 29 नोव्हेंबर रोजी चंपा षष्ठीचे व्रत केले जाणार आहे.

या दिवशी भगवान शंकराच्या मार्कंडेय रुपाची पूजा केली जाते. स्कंदपुराणानुसार हा उत्सव भगवान कार्तिकेयालाही समर्पित आहे. त्यामुळेच या सणाला स्कंद षष्ठी असेही म्हणतात. दरम्यान, यावर्षी चंपा षष्ठी मंगळवारी 29 नोव्हेंबरला येत आहे. महाराष्ट्रातील भाविक या दिवशी भगवान शंकराचा अवतार खंडोबाची पूजा करतात.

चंपा षष्ठी 2022 कधी आहे
पंचांगानुसार, सोमवार, 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 01.35 वाजता मंगळ मासातील शुक्ल पक्षात षष्ठी तिथीला सुरू होत आहे. ही तिथी दुसऱ्या दिवशी मंगळवार 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.04 वाजता संपेल.अशा स्थितीत उदयतिथीनुसार मंगळवार 29 नोव्हेंबर रोजी चंपा षष्ठीचे व्रत केले जाणार आहे.

रवि आणि द्विपुष्कर योगातील चंपा षष्ठी
यावेळी चंपाषष्ठीच्या दिवशी रवी योग आणि द्विपुष्कर योग बनत आहे. या दिवशी सकाळपासून दुपारी 02.53 पर्यंत ध्रुव योग आहे. रवी योग सकाळी 6 वाजून 55 मिनिट ते सकाळी 8 वाजून 38 मिनिटापर्यंत असेल. तर द्विपुष्कर योग हा सकाळी 11 वाजून 04 मिनीट ते पुढे दुसऱ्या दिवशी 30 नोव्हेंबर सकाळी 06 वाजून 55 मिनिटापर्यंत असणार आहे.

चंपा षष्ठी 2022 पुजेचा मुहूर्त
शुभ वेळ: सकाळी 06:45 ते 08:05 पर्यंत
लाभ-उन्नति मुहूर्त: दुपारी 12:06 वाजेपासून ते दुपारी 01:26 वाजेपर्यंत असेल.
अमृत-सर्वोत्तम मुहूर्त: दुपारी 01:26 वाजेपासून ते दुपारी 02:46 वाजेपर्यंत असेल.
या दिवशी केला जाणाऱ्या उपवासाचे महत्त्व
या दिवशी भगवान महादेवाची पूजा केली जाते. महादेवाची पूजा केल्याने आपले पाप मिटत असतात. महादेवाची पूजा केल्याने आपल्या सर्व समस्या दूर होत असतात.
चंपा षष्ठीचे व्रत केल्याने सुख-शांतीही मिळते आणि मोक्षही प्राप्त होतो.
असे मानले जाते की हे व्रत केल्याने मागील जन्माची सर्व पापे धुऊन जातात आणि जीवन सुखी होते.
भगवान कार्तिकेय हा मंगळाचा स्वामी आहे.
मंगळ ग्रहाला बल देण्यासाठी या दिवशी भगवान कार्तिकेयाचे व्रत करावे.

नमो मल्लारीं देवाय भक्तानां प्रेमदायिने ।
म्हाळसापतीं नमस्तुभ्यं मैरालाय नमो नमः ।।
मल्लारीं जगतान्नाथं त्रिपुरारीं जगद‌्गुरूं ।
मणिघ्नं म्हाळसाकांतं वंदे अस्मत् कुलदैवतम् ।।

महाराष्ट्रात खंडोबा आणि कर्नाटकात मैलार या नावाने ओळखला जाणारा हा लोकदेव कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अनुबंधाचे एक प्रकट प्रतीक आहे. ‘मल्लारी मार्तंड भैरव’ हे त्याचे संस्कृत नाव. या देवतेची लोकप्रियता एवढी व्यापक आहे की, धनगर, रामोशांपासून देशस्थ ब्राह्मणांपर्यंत समाजाच्या सर्व थरांत त्याची उपासना प्रचलित आहे.
‘खंडोबाचे नवरात्र’ हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे सहा दिवस साजरे केले जाते. हा खरा षड्रात्रोत्सव असतो. नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात. सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. देवाला बेल, दवणा व झेंडूची फुले फार प्रिय म्हणून ती आठवणीने वाहतात.

खंडोबा नवरात्र चंपाषष्ठी पुजा विधी मराठी| | Khandoba navratri puja vidhi in marathi
Khandoba navratri puja vidhi champashashti mahatva in marathi

आज आपण खंडोबाची पूजा विधी, उपासना कशी करावी, चंपाषष्ठी महत्व, नैवेद्य कोणता द्यावा आणि खंडोबाची तळी कशी त्याची माहिती पाहू.

खंडोबा चंपाषष्टीचे महत्व
खंडोबा नवरात्र कथा
खंडोबा चंपाषष्टी कशी साजरी करावी
खंडोबाला नैवद्य कोणता द्यावा
खंडोबाची तळी कशी भरावी
तळीचे ताट कसे सजवावे

खंडोबा चंपाषष्टीचे महत्व
खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत, यांचा निवास आहे महाराष्ट्रातील जेजुरी गडावर. या खंडोबाच्या हातात खांडा नावाची तलवार होती म्हणूनच त्यांचे नाव पडले खंडेराया किंवा खंडोबा.

खंडोबा म्हणजे शिवाचा अवतार आणि अशा या खंडोबाचा उत्सव म्हणजेच खंडोबाचं नवरात्र आणि चंपाषष्ठी जस देवीच नवरात्र असत तसच खंडोबाच असत पण ते षडरात्र म्हणजे सहा दिवस व रात्र असतं तर असे हे मल्हारी नवरात्र मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी सुरु होते.

मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासुन ते शुध्द षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते.षष्ठी म्हणजे सहा असा हा सहा दिवसांचा उत्सव जेजुरीला मोठ्या प्रमाणात व अतिशय भक्तिभावाने साजरा होतो. जेजुरी प्रमाणेच खंडोबाच्या इतर देवळातही हा उत्सव साजरा केला जातो.

खंडोबा नवरात्र कथा
आता आपण हा उत्सव का साजरा केला जातो त्यामागची कथा जाणुन घेऊया. मार्तंड भैरवाने आणि मल्ल या दैत्यांचा संहार केला आणि भूतलावरील मोठे अरिष्ट टळले.

त्याच्याच विजयोत्सवात देवगणांनी मार्तंड भैरवावर भंडाऱ्या बरोबरच चंपाषष्ठी म्हणजेच चाफ्याच्या फुलांची वृष्टी केली म्हणुनच मार्गशीर्ष शुध्द षष्ठीला चंपाषष्ठी हे नाव मिळाले आणि या उत्सवाची सुरुवात झाली.

खंडोबा चंपाषष्टी कशी साजरी करावी
खंडोबाचा वार रविवार म्हणून शक्यतो त्याच दिवशी हे कुलाचार करतात कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. आता हा खंडोबाचा टाक कसा असतो तर यात घोडा आणि खंडोबा असतो या टाकाची स्थापना नवरात्रात केली जाते.

नवरात्रप्रमाणेच माळा वाढवत घटावर फुलांच्या माळा लावल्या जातात. नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात. देवाला बेल, दवणा, चाफ्याची आणि झेंडूची फुले वाहिली जातात. सहा दिवस नंदादीप लावतात.

खंडोबा नवरात्र करण्याची पध्दत कोणाकडे टाक असतो तो बसवला जातो, कोणाकडे खंडोबाची मूर्ती असते, कोणाकडे कलश असतो कलशावर ताम्हण ठेवून त्यात तांदूळ पसरतात व त्यावर खंडेरायाची मूर्ती स्थापना केली जाते.

कोणाकडे माळाबंधन असते म्हणजे काय तर विडयाच्या पानांच्या किंवा झेंडूच्या माळा सोडल्या जातात. काही जणांकडे उपवास केले जातात. जागरण गोंधळ असतो, तळी आरती सुध्दा असते.

खंडोबाला नैवद्य कोणता द्यावा
प्रथम देवघरातील सर्व देवांची पंचामृताचा म्हणजेच (साखर, दही, दूध, तूप, मध) या मिश्रणाचा अभिषेक करून पूजा करून घ्यावी. त्यानंतर कलश, घंटा, गणपती, शंख, यांची पूजा करावी.

प्रथम हळदीकुंकू वाहून मग फुले वहावीत. कलशात सुपारी फूल अक्षता वहाव्यात आणि मग त्यात विड्याची पाने ठेवावीत. नारळाला हळदी कुंकू वाहून तो कलशावर ठेवावा. कलशाखाली अक्षता ठेवून मग त्यावर कलश ठेवावा. त्यानंतर गणपतीची पूजा करावी यासाठी गणपती ताम्हनात घ्यावा.

हळदकुंकू अक्षता वाहून दुधाचा अभिषेक करावा, नंतर पाणी घालून पुसून घ्यावा. मग गणपती जागेवर ठेवून हळदीकुंकू, फुले ववाहीत नंतर खंडोबाचा टाक ताम्हनात घ्यावा दुध व पाण्याचा अभिषेक करून पुसून घ्यावा नंतर एक विड्याचे पान घेऊन त्यावर स्वस्तिक काढावे आणि त्यावर तो टाक ठेवावा. हळदीकुंकू वहावे.

हळद जास्त वहावी कारण खंडोबाला हळद जास्त प्रिय आहे. पिवळे फूल वहावे.नंदादीप लावावा, तो सहा दिवस ठेवावा आणि तळी आरती करावी. आता आपण तळी आरती म्हणजे तळी भरण्याचा विधी पाहूया.

खंडोबाची तळी कशी भरावी
खंडोबाच्या उपासनेत भंडारा म्हणजेच (हळदीची पूड) फार महत्वाची आहे. देवाला नैवद्य देण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो. आता हा विधी घरी देवासमोर कसा करावा ते पाहू.

ताम्हनामध्ये विड्याची किंवा नागिणीची पाने, सुपारी, खोबऱ्याचे तुकडे, भंडारा म्हणजेच हळदेची पूड हे साहित्य घेऊन तीन, पाच, सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळीनी एकत्र येऊन “सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार” असे मोठ्याने तीन वेळा म्हणत ताम्हण उचलावे.

त्यानंतर पानाचा विडा ठेवून म्हणतात (काही घरांमध्ये डोक्यावरील टोपी, रुमाल भुवा वस्त्र जमिनीवर ठेवतात) त्यावर ताम्हण ठेवतात. एक विडा देवासमोर मांडला जातो तळी उचलणाऱ्या प्रत्येका पुढे एक एक विडा ठेवाला जातो.

देवाला भंडार वाहून प्रत्येकाच्या कपाळी भंडारा हा लावतात. त्यानंतर पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट च्या गजरात ताम्हण उचलले जाते आणि शेवटी तळीचे ताम्हण मस्तकी लावले जाते नंतर बुधली आणि दिवटी घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळून प्रसाद वाटला जातो. आता आपण त्या दिवशी नैवद्याच्या जेवणाची माहिती घेऊया.

खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी दिवशी ठोंबरा (म्हणजेच जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घालतात) तर असा ठोंबरा पुरणा वरणाचा नैवद्य कणकेचा रोडगा किंवा बाजरीचा रोडगा वांग्याचे भरीत, पातीचा कांदा आणि लसुन या सर्वाचा नैवद्य करावा.

तळीचे ताट कसे सजवावे
या ताटात पाच बाजरीचे रोडगे घ्यावेत त्यावर वांग्याच भरीत घालाव. एका ताटात पाच विछ्याची पाने ठेवून खोबऱ्याचे तुकडे, भंडारा व रुपया ठेवावा. ऊस असल्यास पाच ऊसाची झोपडी करावी अस हे नैवद्याचे तळीचे ताट तयार झाल्यानंतर घोडा, गाय, कुत्रा यांना नैवद्याच्या ताटातील पास द्यावा.

घटस्थापना करून नातलांगाना सोबत घेऊन तळी भंडारा कराव. उपस्थितांना भंडारा लावून पानसुपारी खोबरे द्यावे. अशा रितीने या चंवाषष्ठीच्या निमित्ताने खंडेरायाच नवरात्र साजरं केलं जातं आणि खंडेरायाची उपासना केली जाते.

Q.1) महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेरायाचे नाव खंडोबा असे का पडले ?
Ans.खंडोबाच्या हातात खांडा नावाची तलवार होती म्हणूनच त्यांचे नाव पडले खंडेराया किंवा खंडोबा असे पडले.

Q.2) खंडोबा यांचे निवासस्थान कोठे आहे ?
Ans.खंडोबा यांचे निवासस्थान जेजुरी येथे आहे.

चंपाषष्ठीचा उत्सव हा राज्यात प्रामुख्याने जेजुरी, पाली, गुड- गुड्डापूर/ देवरह या ठिकाणी साजरा केला जातो. तसेच खंडोबा हे ज्याचं कुलदैवत आहे त्यांच्याकडे हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

श्रीक्षेत्र जेजुरी मध्ये श्रींना तैलस्नान घातले जाते, त्याला श्रीखंडोबा आणि म्हाळसा विवाहातील तेलवण विधी असे म्हणतात. या दिवशी तिन्हीसांजेला आपल्या घरातील व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नागदिवे आणि दोन मुटके तयार करावेत त्यासोबत पुरणाचे पाच दिवे तयार करून घ्यावेत. सर्व दिवे शुद्ध तुपाच्या वातींनी प्रज्वलित करून देवाला औक्षण करावे .

मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी अर्थात चंपाषष्ठी

चंपाषष्ठी श्रीखंडेरायाच्या उपासनेतील अत्यंत महत्वपूर्ण उत्सव, श्रीमल्हारी मार्तंडाचे षडःरात्रोत्सावाचा सांगता दिवस या दिवशी मार्तंड भैरवाने मल्लासुर दैत्याचा संहार केला व भूतलावरील अरिष्ठ टाळले. विजायोत्सावामध्ये देवगणांनी मार्तंड भैरावावर भंडारा बरोबरच चंपावृष्टी अर्थात चाफ्याची पुष्पवृष्टी केली म्हणूनच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपाषष्ठी असे नाव मिळाले.

देवघरातील सर्व देवतांच्या मूर्तींची पंचामृताने ( दुध, दही, तूप, मध, साखर.) अभिषेक घालून षोडशोपचारे अथवा पंचोपचारे अथवा यथोमिलीतोपचारे पूजा करावी, चाफ्याची फुले देवाला अर्पण करावीत. घटावर फुलांची माळ लावावी.दिवटी प्रज्वलीत करून देवांना ओवाळावी. पुरणा – वरणाचा नैवेद्य आणि त्यासोबत भरित रोडग्याचा नैवेद्य देवाला दाखवावा, घोडा, कुत्रा आणि गाय यांना घास द्यावा. घटोत्थापनकरून आप्तेष्ठांना सोबत घेऊन तळीभंडार करावा, उपस्थितांना भंडार लावून पानसुपारी खोबरे द्यावे.

*संकलन :- अशोककाका कुलकर्णी

चंपाषष्ठी उत्सव संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटकात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, हे आपणास माहीतच आहे. हा उत्सव ज्यांच्या नावे साजरा करण्यात येतो ते श्री खंडोबा हे होत. शिवाय त्यांना मल्हारी, मार्तंड, मार्तंडभैरव, म्हाळसाकांत (मैलार, मलप्पा कानडी उचलणार) इ. नावांनीही स्मरतात. हे दैवत सुमारेअकराव्या शतकापासून विशेष लोकप्रिय झाले. ब्राह्मणांपासून ते धनगर रामोश्यांपर्यंत अठरा प्रगट जातीत खंडोबाचे उपासक आहेत. ते अनेकांचे कुलदैवतही आहेत. मणी आणि मल्ल ह्या दैत्यांच्या नाशासाठी शंकराने मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीस (चंपाषष्ठी), मार्तंडभैरवाचा अवतार धारण केला. अशी कथा मल्लारि-माहात्म्यम् ह्या संस्कृत ग्रंथात आहे.

घोड्यावर स्वार असलेले तर बसलेल्या अवस्थेतील खंडोबाच्या मूर्ती आढळतात. ते चतुर्भुज असून कपाळाला भंडारा, हातांत डमरू, त्रिशूळ, खड्‌ग आणि म्हाळसा व बाणाई त्यांच्या भार्या. म्हाळसा आणि बाणाई ह्या जातीने अनुक्रमे वाणी आणि धनगर असल्याच्या लोककथा रूढ आहेत.

खंडोबाच्या परिवारात हेगडे प्रधान बाणाईचा भाऊ अर्थात खंडोबाचा प्रधानासह श्वानाचा यांचा समावेश असतो. अपत्यासाठी भक्तखंडोबास नवस करतात आणि मुलगा झाल्यास ‘वाघ्या’ व मुलगी झाल्यास ‘मुरळी’ म्हणून खंडोबाच्या सेवेस अर्पण करतात. महाराष्ट्र व कर्नाटकात खंडोबाची पवित्र क्षेत्रे प्रसिद्ध असून सर्व परिचीत जेजूरी चा उत्सव तर आगळा वेगळाच.अहिल्यादेवी होळकरांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केलाय. त्यापैकी औरंगाबाद च्या साताऱ्यात पण भव्य मंदीर व यात्रोत्सव असतोच.

महाराष्ट्रात आणखी पाली (जि. सातारा) हे क्षेत्रही प्रसिद्ध आहे, तर कर्नाटकात मंगसूळी (जि. बेळगाव), मैलारलिंग (जि. धारवाड), मैलार (जि. बेल्लारी) इ. क्षेत्रे पण प्रसिद्ध आहेत. रेवड्या बेल, भंडार व दवणा ह्या वस्तूंना त्याच्या पूजेत अग्रक्रम.

कांद्या वांग्याचा पण नैवेद्य खंडेरायांना आवडतो. तळी मध्ये हे पदार्थ चंपाषष्ठी ला असतातच.

मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा चंपाषष्ठी चा उत्सव करतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *