गुढीपाडवा महात्म्य सविस्तर माहिती

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

समूह सदस्य हो सप्रेम सादर नमस्कार
दरवर्षी गुढीपाडवा येतो चैत्र शुद्ध प्रतिपदा ला आपण गुढी उभारतो गुढी सजवतो गुढी पूजन करतो पंचांग पूजन करतो पंचांग श्रवण करतो सुंदर वस्त्रे अलंकार घालतो नटून थटून उत्साहात प्रसन्न मनस्थिती मध्ये गोडधोड जेवतो एकमेकांना भरभरून शुभेच्छा देतो पण हे सर्व का करायचे ह्याचा कोणी विचार केला आहे का?
चैत्र शुद्ध प्रतिपदा ला च का? इतर कोणतीही तिथी का नाही चालत खरेतर पंचमी दशमी पौर्णिमा ह्या पूर्ण तिथ्या आहेत त्यातल्यात्यात तर नवरात्र मधली पंचमी श्री पंचमी असते तर त्या दिवशी का नाही असा सण साजरा करायचा ? प्रभू रामचंद्र ह्यांची जन्मतिथी ला राम नवमी ला उत्सव होतो पण असा नूतन वर्षारंभ चा होत नाही बर त्याचा ही आधीचे अवतार आपण मत्स्य कूर्म वराह अवतार चा प्रकट तिथी तर 99%तथाकथित हिंदू ना माहीत ही नाहीत भगवान नरसिंह किंवा भगवान भार्गव परशुराम ह्यांचा ही प्रकट दिन तिथी बाबत 90% तथाकथित हिंदूंना माहीत नाही रामायण व महाभारत मालिका मुळे लॉर्ड रामा आणि लॉर्ड कृष्णा नशीबवान ठरलेत.

वैशिष्ट्ये
दिवशी सत्य युगाची सुरुवात झाली.

🙏 गुढीपाडवा वर्षारंभ कां ????🙏

१) आपण सर्व हिंदू आहोत!!!!!
२) आपला वर्षारंभ शालिवाहन शक प्रमाणे आहे!
३) आपण तिथी प्रमाण मानतो!!
४) तिथी हे कालक्रमण सत्य माप आहे!
५) तिथी अनादी काळ दर्शवते!!
६) सृष्टी ही प्रवाहरूप अनादी आहे!
७) कालक्रमण हे ब्रह्मदेवा पासून आहे!
८) सध्या ब्रह्मदेव ५१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे!
९) ५० वर्षे, १३ घटका, ४२पळ, ३ अक्षरं हे त्याचं वय आहे!
१०) आता आपण वराह कल्पात आहोत!
११) या कल्पातील ७ व्या मन्वंतरात आहोत!
१२) ७ व्या मन्वंतरातील २८ व्या युगात आहोत!
१३) २८ व्या युगातील कलियुगात आहोत!
१४) कलियुगाच्या ३ ऱ्या शालिवाहन शकात आहोत!
१५) शालिवाहनाच्या १९४३ व्या वर्षात आहोत!
१६) शके १९४३ वर्ष दि. ०१.०४.२०२२ ला संपणार आहे!
१७) गुढीपाडव्याला शके १९४४ वर्ष चालू होणार आहे!
१८) कालक्रमण हे सृष्टी उत्पत्ती माप आहे!
१९) हे माप इंग्रजांना माहित नव्हतं!!
२०) त्यांनी त्यांच्या धर्माचा शक चालू केला!…….


२१) त्याला इसवीसन म्हणतात!
२२) इसवीसन म्हणजे इसाई सण !
२३) इसाई म्हणजे येशू नावाने !!
२४) आपण ईश्वर नियोजित कालक्रमण मानतो!
२५) मागे गेलो तर ब्रह्मदेवा पर्यंत !
२६) पुढे गेलो तर प्रलया पर्यंत !
२७) हे सर्व निसर्ग संमत आहे !
२८) हे सर्व वृक्ष सृष्टीला सुद्धा मान्य आहे !
२९) वृक्षांना चैत्रात पालवी फुटते !!
३०) म्हणून चैत्र पालवी म्हणतात !
३१) फूट ५ तरुवर उष्ण काळ मासी !
३२) पक्षी सुद्धा हे कालक्रमण मानतात !
३३) कोकिळा वसंत ऋतूत गाते !


अरे ज्या समाजाला आपले प्रमुख दश अवतार कधी झाले? का झाले? हे माहीत नाही ज्या समाजाला स्वतःचा इतिहास माहीत नाही अगदी सविस्तर नसू दे आणि तशी अपेक्षा ही नाही ते शक्य ही नाही इतिहासातील किमान ठळक तेजस्वी अभिमानास्पद घटना माहीत नाही ज्या समाजाला आपल्या सांस्कृतिक उंचीची कल्पना नाही धार्मिक रूढी परंपरा मागील विज्ञान माहीत नाही त्याचा सांस्कृतिक अर्थ माहीत नाही पर्यावरण व आयुर्वेदिक कारणे माहीत नाहीत असा समाज केवळ टोळी मध्ये बदलून जातो आणि टोळी ह्या शब्दा पाठी मागे गर्भित अर्थ एकच असतो आणि ती म्हणजे गुंडाची टोळी आणि गुंड हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकारे संपलेच किंवा संपवले गेले आहेत अगदी प्राचीन काळापासून भारतावर झालेली परकीय आक्रमणे यवानांची असो की गोर्‍या कातडीच्या पोर्तुगीज डच फ्रेंच इंग्रज या सर्वांनी भारताच्या बौद्धिक परंपरिक ची संपत्तीची जाणीवपूर्वक विल्हेवाट लावली बुद्धीभेद केला आणि संस्कृतीचा ऱ्हास केला मी सर्वात जास्त दोषी ब्रिटिश सरकारला मानतो अगदी पद्धतशीरपणे सर्वात जास्त काळ बुद्धिभेद इतिहासात वाटेल तशा गोष्टी घुसवणे केवळ हिंदू-मुस्लीम मध्येच नव्हे तर हिंदूं मध्येही जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणे हे सर्व केले आणि ते यशस्वी झाले कारण समाज आपल्या दिव्य परंपरांना तेजस्वी इतिहास ला विसरून परकीय सत्तेच्या दिखाव्याला भुलला असो


आपला विषय चैत्र शुद्ध प्रतिपदा हा गुढीपाडवा का म्हणावे? या दिवसाचे महत्त्व काय आहे ?या दिवशी कोणती कामे करावीत ? ती कामे का करावीत?ह्या वर यथाशक्ती यथामती अगदी थोडक्यात विवेचन करायचा प्रयत्न करतो
गुढी पाडवा हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक आंध्र प्रदेश तेलनगणा मध्ये ही फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो.
१. गुढीपाडव्याचे पौराणिक महत्त्व म्हणजे आजच्याच दिवशी सत्य युगाची सुरुवात झाली म्हणून या तिथीला युगादी असेही म्हणले जाते आंध्रप्रदेश तेलंगणा येथे तर त्याच नावाने म्हणजे उगादी म्हणूनच हा सण ओळखला जातो.

२. दुसरे म्हणजे ब्रह्मदेवाने याच दिवशी पहिली प्रजा उत्पन्न केली किंवा सृष्टीचा प्रारंभ चैत्र शुद्ध प्रतिपदेला झाला.

३. दुसरा अजून एक महत्वाची घटना शुद्ध प्रतिपदेला झाली ती म्हणजे शालिवाहन राजाने मिळवलेला विजय याच दिवशी सहा हजार मातीचा पुतळा मध्ये जीव ओतून त्यांच्या साह्याने युद्ध जिंकले म्हणून सुद्धा चैत्र शुद्ध प्रतिपदेला सण साजरा केला जातो.


४. त्या शिवाय प्रभू रामचंद्र आजचा दिवशी अयोध्येला आले असेही म्हणले जाते रामायण अनेकांनी लिहिले आहे ते प्रत्येक चतुरयुगात घडत आलेले आहे म्हणून कल्पभेद प्रमाणे थोडाबहुत घटनाक्रम मध्ये फरक सांगितले जातात त्यामुळे जेवढी म्हणून रामायण आहेत त्यात काही ठिकाणी काही घटनां वेगळ्या दाखवल्या आहे.


५. अजून एक कथा सांगितली जाते, ती म्हणजे आजच्या दिवशी म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला शिव आणि पार्वती यांचा विवाह ठरला म्हणूनच चैत्रगौर या दिवसात साजरी केली जाते राजस्थान मध्ये तर हा सण म्हणजे चैत्रगौरीचा अत्यंत मोठा प्रमाणात साजरा केला जातो जोधपूरमध्ये तर संपुर्ण एक रात्र शहर पूर्णपणे सर्वसामान्य महिलांच्याच अधिपत्याखाली असते रात्रभर महिला मिरवणुकीने विविध पोशाखात फिरत असतात आणि त्या दरम्यान एखादा पुरुष त्यांचा वाटेत दिसला तरी त्याला फटके पडतात अजून एक गमतीची गोष्ट म्हणजे ज्या अविवाहित पुरुष ला महिलांची काठी पडते त्याचे लग्न एक वर्षाचा आत होतेच होते म्हणून अनेक लग्नाळू तरुण मुदाम त्यांचा वाटेत जातात आणि छडी खाऊन लग्न जमवतात हे अगदी सत्य आहे बरे.


६. देवी पार्वतीचा आणि महादेवाचा विवाह पाडव्याच्याच दिवशी ठरला असल्याची देखील कथा आहे. पाडव्यापासुन लग्नाच्या तयारीला सुरूवात झाली आणि तृतियेला त्यांचा विवाह संपन्न झाला. पाडव्याच्या दिवशी देवी पार्वतीची आदिशक्तीची पुजा करण्याची देखील प्रथा आहे. त्याला चैत्र नवरात्र देखील म्हणतात.

विवाहानंतर देवी पार्वती महिन्याभरा करिता माहेरी येते. तिचा कौतुक सोहळा म्हणुन हळदीकुंकु आयोजित केले जाते. देवी पार्वती अक्षयतृतियेला सासरी निघते…


७.
साडे तिन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणारा हा दिवस गुढीपाडवा! (दसरा, गुढीपाडवा, अक्षयतृतिया हे तीन पुर्ण मुहूर्त आणि दिवाळीचा पाडवा म्हणजे कार्तिक शुध्द प्रतिपदेचा अर्धा मुहूर्त).
कोणतही शुभकार्य करण्याकरिता या दिवशी सुरूवात करावी. इतर दिवसांसारखे या दिवशी मुहूर्त बघण्याची गरज नसते.


गुढी कशी उभारावी जाणून घ्या

गुढी उभी करण्यासाठी आपण जी काठी वापरणार आहोत ती स्वच्छ धुऊन, पुसून घ्यावी. त्याला रेशमी वस्त्र बांधून त्यावर एखादे चांदीचे भांडे किंवा घरातील कोणतेही स्वच्छ भांडे ठेवावे. गुढीला कडुनिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या बांधाव्यात, साखरेची माळ घालावी. जिथे गुढी उभी करावयाची आहे ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. अंघोळ करून त्या जागी गुढी बांधावी व हळद, कुंकू, फुले वाहून तिची पूजा करावी. ब्रह्मदेवाने या सृष्टीला चालना दिलेली असल्याने या गुढीलाच ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते. म्हणून ब्रह्मध्वजाची पुढील मंत्राने प्रार्थना करावी.

ब्रह्मध्वज नमस्तेरस्तु सर्वाभिष्ट फलप्रद।
प्राप्तेरस्मिन्वत्सरे नित्यं मदगृहे मंगल कुरु ।।


ही प्रार्थना झाल्यावर पंचांगाचे पूजन करून नवीन वर्षांचे पहिल्या दिवसाचे पंचांग वाचावे. त्यानंतर कडुनिंब, गूळ, जिरे आदी घालून केलेले कडुनिंबाचे पाणी घ्यावे. त्यानंतर वर्षभरातील महत्त्वाच्या घटना पीक-पाणी यांची माहिती करून घ्यावी. सकाळी लवकर गुढी उभी करावी आणि सूर्यास्ताच्या सुमारास नमस्कार करून ती पुन्हा उतरवून ठेवावी.

आता आपण चैत्र शुद्ध प्रतिपदेला दिवसाचा क्रम कसा असावा याविषयी बघूया
सर्वप्रथम सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करून उत्तम अशी वस्त्रे परिधान करून ब्रह्म ध्वज किंवा इंद्र ध्वज उभा करावा म्हणजे गुढी उभी करावी एका उत्तम बांबू घेऊन त्याला कडुलिंबाची डहाळी तसेच त्या बांबूच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र फुलांचा हार साखरेचा गाठींचा हार बांधून त्यावर एक तांब्याचे भांडे बसवावे ही गुढी उंच उभी करावी तिची यथासांग पूजा करावी दुपारी त्या गुढीला नैवेद्य दाखवावा आणि संध्याकाळी परत एकदा पूजा करून ती गुढी उतरवावी ह्या दरम्यान सकाळी गुढी उभी केली की सर्व वडीलधार्‍या माणसांनी चे आशीर्वाद घ्यावेत.


त्यानंतर पंचांग श्रवण करावे पंचांग श्रावण करण्याचे फळ मी थोडक्यात सांगतो
तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते .
वाराचा श्रवणाने आयुष्य वाढते,
नक्षत्राचा *श्रवणाने पापनाश होतो .
योग श्रवणाने रोग जातो.
करण श्रवणाने चिंतीत कार्य सफल होते.
नित्य पंचांग श्रवणाने गंगा स्नानाचे फळ *मिळते.
आता संवत्सर चे संपूर्ण फळ श्रवण करण्याचे अनेक लाभ आहेत.


पावसाच्या बदल अंदाज असतो पीक पाणी बाबत असतो व्यापार उदीम बाबत अंदाज असतो। इंग्रजी दिनदर्शिका ज्याला मराठीत कॅलेंडर म्हणतात त्याने तुम्हाला पंचांग पासून दूर नेले त्याने तुम्ही तुमचा संस्कृती पासून दूर गेलात धर्म कमकुवत झाला 12 बलुतेदार 18 अलुतेदार पद्धती मध्ये समाज एकजिनसी होता
कोणीही उच्च नीच नव्हता प्रत्येकाला एककाम नेमून दिले होते ते तो करायचा पिढ्यानपिढ्या त्या बदल्यात त्याचा कुटुंब ची काळजी संपूर्ण गाव संपूर्ण वर्ष घ्यायचा
देश काल प्रमाणे रूढी परंपरा ही बदलल्या

गुढीपाडव्याचे उल्लेख महाभारत ग्रंथात आदिपर्व मध्ये सुद्धा सांगितलेला आहे.
उपरिचर नावाचा राजाने इंद्राने दिलेल्या कळकाच्या काठीच्या ची पूजा केली म्हणून अन्य राजा ही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून काठी ला शृंगार करून पुष्पमाला घालून तिची पूजा करत होते याशिवाय अनेक मोठ्या मोठ्या संतांनी अगदी नामदेव महाराज त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली आणि इतरही समकालीन संतांनी गुढीपाडव्याचे उल्लेख केलेले आहेत आता आयुर्वेदिक दृष्टिकोन बघुया चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रात काळी ओवा मीठ लिंग मिरी आणि साखर कडू लिंबाचा पान सोबत कुटून खातात यामुळे पचनक्रिया सुधारते पित्तनाश होतो त्वचा रोग बरा होतो कडूलिंब त्यामुळे अनेक आरोग्य यांचा चांगल्या गोष्टींचा कारक मानला गेलाय उष्ण ऋतू सुरू होत असल्यामुळे कडुलिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात घालून स्नान केले असता शरीराला थंडावा मिळतो प्राचीन काळी देवी आली म्हणजे कडुलिंबाच्या पानांवर झोपवले जायचं दुसरे असे खूप वेगळा दृष्टिकोन सांगतोय भूमी म्हणजे गर्भाशय आणि सूर्य हा बी पेरतोय आणि येणाऱ्या वर्षा ऋतु नंतर भूमी सु फलित होते.


आता आपण या दिवशी करायची पुण्यकर्मे बघु

१. गुढीपाडव्याच्या दिवशी पितर निम्मित अन्नदान करावे.
२. गुढीपाडव्याच्या दिवशी पाणपोई घालावी, पाण्याने भरलेल्या घड्याचे दान करावे असाही संकेत रूढ आहे.
३. दानधर्म करावा.
४. देवतांची दर्शन घ्यावीत कारण विशिष्ट तिथी वर केलेले पुण्यकर्म हे अधिक फलदायी होते आणि कोणतेही देवकार्य करण्याआधी पितृ कार्य अवश्य करावे.
या गुढी प्रतिपदेला सिंधी लोक चेटी चंड म्हणजे त्यांचा समाज चा आद्यपुरुष चा दिवस साजरा करतात.
राजस्थानी गुर्जरगौड ब्राम्हण आमचा समाजाचे आद्यपुरुष न्यायशास्त्र प्रणेते अक्षपाद गौतम ऋषी ज्यांचा तपस्ये ने गोदावरी अवतीर्ण झाली त्यांची जयंती साजरी करतो.
वैष्णव संप्रदाय चा प्रथे अनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला श्रीराम नवरात्र सुरू होते
अशा ह्या अनेक अंग ने महत्वपूर्ण असलेल्या चैत्र शुद्ध प्रतिपदेचा सर्वांना अग्रीम शुभेच्छा पुण्यलाभ अधिकात अधिक घ्या आपल्या सण चे सर्वार्थाने महत्व जाणून घेऊन त्या प्रमाणे साजरा करूयात आणि इतरांनाही प्रेरित करूयात
सर्वांना एक कळकळीची विनंती प्रत्येकाने पंचांग वाचन आणि पंचांग समजून घ्या त्या साठी तुम्हाला आवडेल ते सोपे वाटेल ते पंचांग विकत घ्या आपल्या इष्टमित्र ना भेट द्या *कॅलेंडर वर किंवा अँप वर विसंबून राहू नका*
पंचांग हे संस्कृती कडे परतण्याचा प्रवेशद्वार आहे त्याला कोणत्याही जाती समाज बरोबर जोडू नका जन्मल्या पासून अंतिम संस्कार पर्यंत प्रत्येक जाती ची गरज लागते आणि पंचांग प्रत्येक जाती समाजला उपयुक्त आहे आता एकजिनसी समाज ची तीव्र आवश्यकता आहे
काळा ची पावले ओळखा
हा लेख जितका शेयर करता येईल तितका करा नावा सोबत करा नावा शिवाय करा जसा करायचा आहे तसा करा कॉपी पेस्ट किंवा शेयर करा पण करा आणि १तरी पंचांग विकत घ्या व १ तरी पंचांग कोणाला भेट द्या

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading