भाऊबीज दिपावली- दिवाळी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

भाऊबीज
भाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा महाराष्टीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात.

या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीचे ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचा सत्कार करतो.

दिवाळीची संपूर्ण माहिती पाहा.

कायस्थ समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजे असे केल्यामुळे त्यावर्षी यमपासून तरी भय नसते असा समज आहे.

यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती आपली रडणे व डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबवेना. तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली आणि मग यमीचे भावा बद्दलचे दुःख थोडेसे हलके झाले तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजाची पूजा आणि प्रार्थना करवयाची.

या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करीत असते त्याला प्रेमाचा टिळा लावते तो टिळा बहिणीच्या निस्वार्थी प्रेमभावना व्यक्त करीत असतो भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा यामागचा उद्देश असतो. भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे कापड दागिना असे वस्तू ओवाळणी टाकतो. या दिवशी घरी जेवण करू नये व पत्नीच्या हातचे जेवण करू नये असे धर्मग्रंथात सांगितले आहे. जवळचा किंवा दूरचा भाऊ नसल्यास चांदोबास ओवाळण्याची पद्धत आहे आपल्या सणामागे असलेल्या कल्पनांची विशाल पण यावरून दिसून येते.

दीपोत्सवातील शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊबीज का साजरी करतात? यमद्वितीयेची कथा, महती, महात्म्य जाणून घेऊया…

Bhaubeej 2021 : भाऊबीज का साजरी करतात? जाणून घ्या कथा, महात्म्य व महती
दीपोत्सवातील शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज. बहीण आणि भावाच्या नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा, नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीया असेही देखील म्हणतात. हिंदीत या सणास भाईदूज असे म्हटले जाते. पश्चिम बंगालमध्ये भाई फोंटा या नावाने हा उत्सव साजरा केला जातो.

हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये भाऊबीजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नेपाळमध्ये देखील हा दिवस भाईतिहार म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊबीज का साजरी करतात?? यमद्वितीयेची कथा, महती, महात्म्य जाणून घेऊया…

भाऊबीजेची कथा
भाऊबीजेला यमद्वितीया का म्हणतात, यामागे एक कथा प्रचलित आहे. या दिवशी देशातील काही ठिकाणी चित्रगुप्ताच्या मंदिरात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताचे पूजन केले जाते. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे, अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया असेही म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते.

Bhai Dooj भाऊबीज : ‘या’ शुभ मुहुर्तावर करा औक्षण, जाणून घ्या महत्व आणि मान्यता

यमद्वितीयेचे महत्त्व
या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवावयास गेला व नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे केले. म्हणून या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. बहीण-भावाच्या प्रेमाचा हा अत्यंत मंगल दिवस ‘भाऊबीज’ म्हणून साजरा केला जातो. एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळण्याची पद्धत आहे. आपल्या भावाला अपमृत्यू येऊ नये, तो चिरंजीव राहावा, अशी बहीण प्रार्थना करते. अपमृत्यु येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीयेस मृत्यूची देवता यमधर्म याचे पूजन करून त्याच्या चौदा नावांनी तर्पण करण्यास सांगितले आहे. असे केल्यास अपमृत्यु येत नाही, अशी मान्यता आहे.

भाऊबीजेचे महत्त्व
भाऊबीजेचा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो, ही त्यामागची भूमिका आहे. आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता भाऊबीजेच्या सण साजरा केला जातो. बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे.

अशी साजरी करतात भाऊबीज
कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी भावाने बहिणीकडे जावे. बहिणीने शुभ मुहूर्त बघून भावाला ओवाळावे. ओवळताना भावाचे मुख पूर्वेकडे असावे. ओवळ्यानंतर यमाच्या नावाने चौमुखी दिवा लावून उबंरठ्याबाहेर ठेवावे. बहिणीने भावाच्या आवडीचे पदार्थ तयार करावे. जेवणात तांदळाचा पदार्थ अवश्य असावा. भावाने ओवाळणी म्हणून बहिणीला भेटवस्तू द्यायला हवी.
Bhau Beej यंदा भाऊबीजनिमित्त द्या मराठी भाषेतून अशा शुभेच्छा

दिवाळीची संपूर्ण माहिती पाहा.

आपणास व आपल्या परीवारास आजपासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या शुभपर्वानिमित्त अनेक हार्दिक शुभेच्छा🪔🏮🕯️

🕯🪔🏮|| शुभ दिपावली ||🪔🏮🕯२१ऑक्टोबर* पासून दीपावली ला सुरुवात होत आहे.
सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा…. !!!!!
२१ ऑक्टोबर २०२२- वसुबारस !
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो !


२२ ऑक्टोबर २०२२- धनत्रयोदशी !
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !
२३ ऑक्टोबर २०२२- नरकचतुर्दशी !


सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म
घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!


२४ ऑक्टोबर २०२२- लक्ष्मीपूजन !
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !


२५ ऑक्टोबर २०२२- पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !
२६ ऑक्टोबर २०२२- भाऊबीज !
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट
राहू दे !
ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास
आंनदाची आणि भरभराटिची जावो
💐👏🍅🍎🍏🍊🍋🥭🍲🍛🍥
❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄

दिवाळीतील महत्वाचे सण तथा दिवस

Page: 1 2
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *