संत चोखामेळा म. चरित्र २१

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत चोखामेळा  भाग  –  २१.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

चोखोबाने नुसते पंढरपूरात येणे, संतसहवासात जीवन व्यतीत करणे, भक्तीसंप्रदायाची माहिती करुन घेणे, अभंगरचना करणे एवढेच पांडुरंगाला अपेक्षित नव्हते तर चोखोबा त्याच्या आणखी जवळ यायला हवे होते.त्या साठी पांडुरंगाला आणखी कठोर खेळी करावी लागणार होती.या खेळात चोखा कदाचित मनाने कोसळणार होते,पण लौकिकदृष्ट्या ते जितके मनाने कोसळती ल तितकेच पारमार्थिकदृष्ट्या देवाच्या जवळ होतील.आई वडीलांच्या दुःखाने चोखोबा जरी सावरले तरी सोयराला शक्य होत नव्हते.तरीबरं शेजारचे गणा काका व त्यांची पत्नी भागीरथीकाकीचा या दोघांना फार मोठा आधार होता. त्यांची सून गंगा गोधड्या खुप छान शिवायची.त्यामुळे अनेक घरांतुन शिधा देऊन गोधड्या घेतल्या जात होत्या.गंगा चा नवरा लक्ष्मणाला कांही व्यसने होती, सासु सुनेचा सुसंवाद नसल्यामुळे सतत घरांत भांडणे,कलह मारामारीपर्यत प्रकरण जायचं.मग चोखा व सोयरा त्यांची भांडणे सोडवायचे.
एक दिवस लक्ष्मण कुर्‍हाड घेऊन गंगाच्या अंगावर धावून गेला असतां चोखांनी कसंबसं भांडण सोडवलं,आणि हा प्रश्न कायमचा सोडवण्याचा निश्चय केला.एक दिवस गणाकाकांच्या घरचे सगळे नीट आहेत हे पाहुन चोखोबांनी त्या सर्वाना खूप समजावले.त्याचा परिणाम होऊन गणाकाकांच्या घरांतील लोकांचा दृष्टीकोण बदलला.एक मोडु घातलेलं घर,एक विस्कटलेला संसार सांधला गेला.भागीरथीचा सोयराला खूप आधार वाटायचा.


एके दिवशी सकाळपासुनच सोयरा अस्वस्थ होती.आज भागीरथीही गांवाला गेलेली.रात्री किर्तन ऐकुन चोखोबा घरी परतल्यावर सोयराची अवस्था बघुन तेही घाबरले.पण त्यांना घाबरुन चालणार नव्हते.धीर देत म्हणाले पांडुरंगावर विश्वास ठेव.मी लगेच जाऊन सकाळपर्यंत निर्मळाला घेऊन येतो तोपर्यंत हिम्मत ठेवुन विठोबाचे नामस्मरण कर.तो पाठीशी असल्यावर काळजीचे कारण नाही.कृष्णजन्मावेळी जसं वातावरण होतं तसच आज आहे.
आपल्याला अगदी कृष्णासारखा पोरगा होईल बघ! आतांच्या कठीण प्रसंगी तोच पाठीशी उभा राहिल,त्याने गोरोबाचे बाळ जिवंत केले.जनाबाईसाठी वाटेल ती कामे केलीत,मग आपल्याला नाही कां मदत करणार?मी लगेच जाऊन निर्मळा ला घेऊन त्वरेने परत येतो.असा धीर देऊन चोखोबा बाहेर पडले.
चोखोबांच्या शब्दांनी खरोखरच सोयराला धीर आला.तिचाही विठुराया वर गाढ विश्वास होता.पावसाचा, व वार्‍याचा जोर वाढला होता,छोटसा दिवा विझला.खोपटात भयान अंधार पसरला. विठ्ठलाचे नांव घेत पडुन होती.खोलीत सगळीकडे ओल आली होती.तीचा कधी तरी डोळा लागला.जमीनीच्या थंडगार स्पर्शाने तीला जाग आली आणि एक जीवघेणी कळ ओटीपोटातुन आली आणि कळा येतच राहिल्या.कळांचा जोर तिव्रता वाढली.आणि असा एक क्षण आला की,वेदना तीच्या सहनशक्तीच्या बाहेर गेल्या,तोंडातुन किंकाळी फुटली.

पांडुरंगाचा आर्त धावा व किंकाळ्या सोयरा ओरडतच होती.कोसळणार्‍या पावसाचा तडतड आवाजाला वार्‍याच्या आवाजाचीही साथ,त्यांत सोयराच्या किंकाळण्याचा आवाज दबुन गेला. किंचाळण्याबरोबर पांडुरंगाचा धावा सुरु असतांनाच हळुहळु शुध्द हरपु लागली. शुध्दी बेशुध्दीच्या सीमारेषेवर तरंगत असतांना जोराची कळ आली व मदती साठी देवाचा धावा करुं लागली.पुन्हा शुध्द हरपत होती.असं चालु असतांनाच अचानक झोपडीचा दरवाजा उघडला गेला.अर्धवट शुध्दीत असणार्‍या सोयराला उघडलेल्या दारातुन विलक्षण प्रकाशाची तिरीप आंत येऊन सारी झोपडी क्षणभरासाठी उजळुन निघाली. आणि परत अंधार पसरला.त्या क्षणभरा च्या प्रकाशरेषेत निर्मळा दिसली.तीला बघुन आतांपर्यंत एकवटलेला धीर कुणी तरी मदतीला आल्याचे पाहुन संपला आणि दुसर्‍याच क्षणी बेशुध्द झाली.त्या नंतर पुढे काय झाले तीला कळलेही नाही.
सकाळ झाली.आकाश निरभ्र झाले.सूर्याची कोवळी किरणे छताच्या झरोक्यातुन आंत आली.सोयराला कसल्याशा आवाजाने शुध्द आली.जवळ कसलीशी हालचाल जाणवल्याने मोठ्या कष्टाने मान वळवुन बघीतले तर, इवलासा कोवळा जीव कुशीत मुठी चोखता शांतपणे पहुडला होता

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

  1. […] संत चोखामेळा म. चरित्र २१ संत चोखामेळा म. चरित्र २२ संत चोखामेळा म. चरित्र २३ संत चोखामेळा म. चरित्र २४ संत चोखामेळा म. चरित्र २५ […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *