ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१५१

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

 ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १५१

निजानंद हें पैं ब्रह्म । ऐसें जाणती योगी वर्म । विठ्ठल विठ्ठल स्मरे मना । चुके संसार दर्शना ॥ रखुमादेविवरा वांचून । कवण पुरवील जिवीची खूण’ ॥

अर्थ:-

श्री विठ्ठल हेच ब्रह्म व त्यांच्याकडेच निजानंद मिळतो हे योगी जाणतात. नुसता विठ्ठलनामाचे स्मरण केले तर संसार दुःखाचे दर्शन होत नाही. माझ्या जीवीचे लाड रखुमाईच्या पती शिवाय कोण पुरवणार? असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *