ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.११८

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग ११८

प्रेमाचा जिव्हाळा नाम मुखाशी आलें । सार्थक पै झालें संसाराचे ॥ केशव नाम सार विठ्ठल उच्चार । राम निरंतर हृदयी वसे ॥

पाहातां हा भाव लीळा तो विग्रह । तेथींचा अनुभव विरळा जाणे ॥ बापरखुमादेविवरू पाहतां विस्तारू । नामाचा बडिवारू न बोलवे ॥

अर्थ:-

ह्रद्यात प्रेम व जिव्हाळा असल्यामुळे माझ्या मुखात नाम आले व त्यामुळे माझ्या संसाराचे सार्थक झाले. केशव व विठ्ठल हे नाम साररुप असल्याने तो श्रीराम माझ्या ह्रदयी निरंतर वास करतो.

सगुण रुपाने भक्तासाठी लीला करणारा परमात्मा पाहणारे व अनुभवणारे विरळच आहेत. रखमादेवीचे पती व माझे पिता यांचा विस्तार व त्याच्या नामाचा मोठेपणा वर्णन करता येत नाही असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *