ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.११६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

 ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग ११६

राम नाम वाट हेचि पै वैकुंठ । ऐसी भगवतगीता बोलतसे स्पष्ट ॥ अठरा साक्षी साही वेवादत ।

चौघांचेनि मतें घेईन भागु ॥ शेवटिले दिवसीं धरणे घेईन । बापरखुमादेविवरा बळेंचि साधीन ॥

अर्थ:-

श्रीमत् भगवतगीता स्पष्ट सांगते की श्रीरामाचे नाम हीच वैकुंठाची वाट आहे अठरा पुराणे साही शास्त्र व चार वेद यांचेही तेच मत आहे म्हणून मी सतत रामनाम घेईन.रखमाईचे पती व

माझे पिता यांचे नाम माझ्या अंतःकाळापर्यत अट्टाहासाने घेईन व त्या बळावर त्या परमात्म्याला आपलासा करुन घेईन असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *