ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१०९

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग १०९

कांरे स्फुंदतोसी । कांरे स्फुंदतोसी । न भजतां विठ्ठलासी नरकीं पडसी ॥ पुण्यपाप बाधा । न पवसी गोविंदा पावशील आपदा । स्मर परमानंदा ॥ पुण्य करितां स्वर्ग पाप करिता भोग । नाम जपता

सर्वांग । होईल पांडुरंग ॥ देही आत्मा जव आहे । तंव करुनिया पाहे । अंती कोणी नोव्हे । धरी वैष्णवांची सोय ॥ जाईल हे आयुष्य । न सेवी विषयविष पडतील यमपाश । वेगी करी सौरस ॥

बापरखुमादेविवरु विठ्ठलीं मन चरणी गोंवी । हरपले देहभावीं । जालासे गोसावी एकरुप ॥

अर्थ:-

अरे कोणत्या गर्वाने फुललेला आहेस,तो गर्व सोड विठ्ठलाचे नाव घे नाहीतर नरकात पडशील. याच गर्वामुळे पापपुण्याची बाधा होऊन गोविंद स्वरूपास प्राप्त होणार नाहीस म्हणून त्या परमानंदाचे स्मरण कर.पुण्य केलेस तर स्वर्ग मिळेल तर पाप केलेस तर जन्म भोग व

नाम जपलेस तर पांडुरंग प्राप्त होईल. देहात चैतन्य आहे तोपर्यतच हे करुन पाहा. शेवटी वाचवणारे कुणी नसून संतसंगती उपयोगी पडेल.या विषयाच्या विषाचे सेवन करीत राहिलास तर यमपाश पडेल व आयुष्य संपून जाईल तेव्हा त्वरीत नाममार्ग आपलासा कर.तसे

केल्याने मनास गोसावीपण मिळून तू एकरूप होशील देहभान हरपेल व माझे पिता व रखमा देवीचे पती असणारे श्रीविठ्ठल चरणावर मन गुंतव असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *