ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.९

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

 ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ९ ला.

तुरे कांबळा डांगेवरी विषाण वेणु घेऊनि करिं । वैजंयती रूळे कैशी वक्षस्थळावरी ॥१॥ गोविंदु वो पैल गोपाळु माये । सुरतरू तळवटीं देखे कैसा उभा राहे ॥ आडत्रिपुंड्र शोभते द्रुमिळ भारेंसि जे जात । नागर केशरीचीं पुष्पें कैसी पैं मिरवत ॥२॥

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

हिरिया ऐशा दंतपक्ति अधर पोंवळ वेली । श्रवणी कुंडले ब्रह्मरसाचीं वोतलीं ॥३॥ विश्वाचें जीवन तें म्यां सार देखियेलें । योगी ध्याती ध्यानीं ब्रह्मतेंचि गोकुळांसी आले ॥४॥ आजि धन्य धन्य जावें राया कृष्णासी देखिलें । निवृत्तिमुनिराय प्रसादें ध्यान हृदयासी आलें ॥५॥

 अर्थ:-

डोक्यावर तुरा, खांद्यावर घोंगडी, हातात काठी व वेणु व वक्षःस्थळावर वैजयंतीमाला रुळत असलेला भगवान कृष्ण आहे. तोच गोविंद मला कल्पवृक्षातळी उभा राहिलेला दिसत आहे. कपाळावर तिनरेखांकित गंध रेखलेला नागर केशरीची पुष्पे डोक्यावर मिरवत ते कृष्णरुप उभे आहे. त्याचे हिऱ्यासारखे चमकणारे दात व पोवळ्यासारखे रक्तवर्ण ओठ व ब्रह्मरसयुक्त कुंडले कानात मिरवत आहेत.जे विश्वाचे जीवन आहे ते रुप मी साररुपाने पाहिले ज्या रुपाला योगी ध्यातात तेच रुप गोकुळात अवतरले आहे. आज मी धन्य झालो निवृत्तिनाथांच्या कृपाप्रसादाने ते रुप पहिले माझ्या ध्यान्यात व नंतर हृदयत स्थापित झाले असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *