ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.288

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २८८

सज्ञानी पाहतां अज्ञानी तत्त्वता । अज्ञानी अमृता सद्गुरू जाणे ॥
गुरूगम्य सत्ता शिष्य होय सरता । पूर्णी पूर्ण हातां ब्रह्म येत ॥
आदि मध्य घर हरीचा शेजार । हरिवीण थार नाही कोठे ॥
ज्ञानदेवी चित्त गुरूधर्म वित्त । अवघे जिवीत हरि केला ॥

अर्थ:-

ज्ञानी पुरूषाला इतर लोक अज्ञानी दिसतात पण तेच लोक जर सदगुरुला शरण गेले तर ते परमात्म्याला जाणून ब्रह्मस्वरुप जाणतात. श्रीगुरूच्या ठिकाणी असणाया अगम्य सत्तेला जो शिष्य शरण जाऊन सरता होईल.

त्याला परिपूर्ण असलेले ब्रह्मस्वरुप त्याच्या हाती लागेल. आणि त्यामुळे ज्याला उत्पत्ति स्थिती, नाश नाही अशा श्रीहरिचा शेजार त्याला मिळून हरि व्यतिरिक्त कांही नाही. असा त्याचा निश्चय होतो. श्री गुरुंमुळे माझे चित्त, वित्त, धर्म इत्यादी सर्व हरिरूपच झाले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *