ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.277

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २७७

नित्यता समाधी असोनी पैं साधी । मायेची शुध्दि पुसे रया ॥ साधन विधान पूजा अनुष्ठान । नित्यता कीर्तन सोहं भावे ॥ स्मरण विलास तत्त्वीं तत्त्व हाला । उपदेशु बोला बोलों नये ॥ ज्ञानदेवा सिद्धि नित्यता समृद्धि । जीव शिव बुध्दि समाधी त्याची ॥

अर्थ:-

सहजस्वरूपसमाधी असून तिच्यामध्ये मायेने प्रतिबंध आणला आहे. त्या मायेच्या शुद्धिचा विचार गुरूना विचारून घे. त्या मायेच्या निरासाचे साधन म्हणजे भगवत् पूजा व नामाअनुष्ठान असा सोहंभावाचा जपही आहे.

या साधनांनी परमात्मा साध्य होईल असे समज. अशा उपदेशाशिवाय दुस-या गोष्टींना उपदेश असे समजू नये.जीवशिवाचे ऐक्य समजणे हीच नित्य समाधी आहे.असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *