ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.347

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ३४७

सहस्त्रदळ ब्रह्मरंध्र ज्याचे घर । सत्रावी निरंतर वसे जेथे ॥ रक्त शुभ्रवर्ण नीळ पीत दिसे । दृष्टी शुद्ध असे तयामध्यें ॥२॥ फार किती सांगो सज्ञान तुम्ही जन । अर्थ हा समजोन मौन्य धरा ॥३॥ गुह्याचेंही गुह्य निवृत्तिने दाविले । मीच वाचा हो बोलें बोलतसें ॥४॥

अर्थ:-

नीळ बिंदुरुप ब्रह्माचे स्थान सहस्त्रदळातील ब्रह्मरंध्र होय, त्या ठिकाणी सतरावी जी अमृत जीवनकळा असते. त्या ज्योतीचा रंग बाहेरून पाहात असता तांबडा, पांढरा, निळा, पिवळा असा दिसत असला तरी आंत मात्र शुद्ध स्वरूपच आहे. तुम्ही सर्व सज्ञानच आहात तुम्हाला फार सांगावयाचे कारण नाही. वर वर्णन केलेल्या खुणांचे तात्पर्य लक्षात घेऊन मौन धारण करा. आशा तहेचे च गुह्यातील गुह्य जी ज्योत ती निवृत्तिरायांनी मला दाखविली व मी ती शब्दांनी वर्णन करून सांगितली असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *