ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.772

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
  प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७७२

हस्ती घोडे हरण सिंहाडे । तैसें हे गुजराती लुगडें गे माये ॥१॥ पालव मिरवीत जाईन । शेला पदरी धरूनि राहीन ॥२॥ बापरखुमादेविवरू विठ्ठल सांवळा । तेणें मज माजिठा दिल्हा साउला ॥३॥

अर्थ:-

एखाद्या पटावर म्हणजे वस्त्रावर हत्ती घोडे हरण सिंह इत्यादी चित्रे काढले तर तो पट जसा चित्रविचित्र रंगाचा दिसतो. त्याप्रमाणे परस्परांत न मिसळणाऱ्या पंचमहाभूताचे हे शरीररूपी गुजराथ्यां सारखे लुगडे आहे.

त्या शरीररूपी लुगड्याचा पदर धरून मी श्रीकृष्णाकडे मिरवीत जाईन. आणि त्याच्याठिकाणी असलेल्या भक्तीरूप शेल्याचा पदर धरून राहीन. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे सांवळे श्रीविठ्ठल त्यांनी मला हा चित्रविचित्र रंगाचा शरीररूपी शालू दिला आहे. असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *