ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.245

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २४५ २४५

स्वप्नीचा घाई विवळे साचें । चेईलिया वरी म्हणे मी न वाचे ॥ जन कैसे माया भुललें । आपले हित चुकले ॥ आपीआप देखिलें । परतोन पाहे तो येकलें ॥

आपींआप असे । मी काय जालोंसे लोकां पुसे ॥ सकळहि शास्त्रे पढीन्नले । नुगवेचि प्रपंची गुंतले ॥ बापरखुमादेविवरा विठ्ठलें । कैसे गुरूमुखें खुणा उगविले ॥

अर्थ:-

स्वप्नामध्ये आपणास शस्त्रधात झाला आहे,असे पाहून तो विवळत असतो. परंतु जागे केल्यानंतर त्यास विचारले

असता तो वाणीने मी विवळत नव्हतो असे म्हणतो.अशाच रितीने जीव अज्ञानाने भुलले असुन आपल्या हिताला चुकले आहेत. त्या जगतातील जीवांनी आपल्या आत्मस्वरूपास यथार्थ पाहून पुन्हा परतून संसाराकडे पाहावे तो

आत्मस्वरूपाशिवाय दुसरी कसलीही प्रतीति त्यास येत नाही. आत्मस्वरूप आपल्या ठिकाणी नित्य प्राप्त असता मायेच्या योगाने आत्मस्वरूपाची विस्मृती होऊन माझे आत्मस्वरूप कोठे आहे कसे आहे असे लोकांनाच विचारू लागतो.

ही गोष्ट सामान्य अज्ञानी जीवाचीच नाही सर्व शास्त्र अध्ययन केलेल्या जीवानांही गुंतलेल्या प्रपंचातून निघणे अशक्य असते.याकरीता माझे पिता व रखुमादेवीचा वर जो श्रीविठ्ठल त्याच्या कृपेने सद्गुरूमुखाने प्रपंचातून सुटण्याच्या खुणा माझ्या चित्तांत प्रगट झाल्या असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *