ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.241

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २४१

या पिकलिया अमृताची गोडी । केवीं जाणती इतर जन । वाचा बोसिजे सेविता निवे प्राण गे माये ॥ सुखाचा साचा केवीं बोलिजे । जिवाते केवीं सुइजे ॥

अमृतकराचे रश्मी चकोर सेविती । ते सुख कोणा कैसे बोलिजे रया ॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलु भेटलिया । ते सुख कोणा कैसें सांगिजे रया ॥

अर्थ:-

ह्या परमार्थ अमृतची पिकलेला रसाची गोडी काय वर्णवी. ते इतर लोक कशी जाणतील? पण आधिकारी मुखीतुन ऐकली प्राणची यातायात निवते. हा सुखाचा विचार अनाधिकाऱ्याला कोण सांगेल.

चंद्रकिरणातुन पाझरणारे अमृत चकोर पितात ते त्यांचा अनुभव कसा काय सांगु शकतील. तसेच ते माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठलाच्या दर्शनामृताचे आहे. ते सुख मी कसे सांगु शकेन असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *