ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.223

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २२३

द्वीपोद्वीपीचे पक्षी मेरु तळवटीं उतरले । रत्न म्हणोनि त्या स्फटिकासी झेंपावले ॥ राजहंस ते भ्रमले हो पाषाण चुंबितीं ।

अडकलिया चाचू मग मागील आठविती ॥ एक श्रीकृष्ण ते विसरले ऐसे ज्ञानदेव बोले । मूर्खासी संगती करिता शाहाणे सिंतरले ॥

अर्थ:-

अशी कल्पना करा की. देशोदेशीचे पक्षी मेरु पर्वताच्या तळी येऊन बसले त्याठिकाणी पांढरा स्वच्छ स्फटिकाचा खडक होता. त्या स्फटिकामध्ये नक्षत्रांचे प्रतिबिंब पडले होते. राजहंस पक्षी. रत्ने खात असल्यामुळे उतरलेल्या पक्ष्यामध्ये राजहंसही होता.

त्या राजहंसाने रत्नाप्रमाणे नक्षत्राच्या प्रतिबिंबाच्या ठिकाणी रत्न समजुन ते खाण्याकरिता चोच मारली. पण ती त्या स्फटिकांच्यात अडकुन पडली तेंव्हा त्याला आपला मुर्खपणा कळला. त्या राजहंसा प्रमाणे निरक्षिर करु शकणारे पंडित ही मुख्य श्रीकृष्णाला विसरुन संसारातील सुखदुःखात अडकले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *