ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.201

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २०१ 

श्रवण घ्राण रसना त्वचा आणि लोचन । हें तो दैन्याची द्वारे वोळगसी । यांचे यांसीचि न पुरे तुज पुरविती काय । यालागी धरिजेसु आपुली सोय रे बापा । अरे मना रे अरे मना रे । न संडी न संडी हरिचरण कमळा रे ॥

स्वप्नीचें धन तं धनचि नव्हे । मृगजळीचे जळ तें जळचि नव्हे । अभ्रीची छाया ते साउली नव्हे । ऐसे जाणोनियां वेगी धरिजेसु ।

आपुली सोय रे रया ॥ तुं जयाचा तेथोनी जीवीं जितासी । त्या श्रीहरीतें रे नोळखसी । बापरखुमादेविवरा विठ्ठला चिंतिसी । तेणे पावसी तू सुखाचिया रासी रया ॥

अर्थ:-

विषयरुपी दैन्याची व्दारे ही कान, नाक, त्वचा, जीभ व डोळे उघडतात.हेच त्यामुळे तृप्त होत नाहीत तर तुला काय तृप्त करणार. तेव्हा स्व तृप्तीसाठी त्या सोयऱ्या हरीला धर. अरे मना तू हरीचरण कमल सोडू नकोस

स्वप्नातील धन धन नाही. मृगजळातील जळ जल नाही. अभाळाची छाया सावली नाही. असे जाणून तू आपली सोय पहा. तू ज्याच्यामुळे जीवन जगतोस त्या श्रीहरीला तू ओळखत नाहीस माझे पिता व रखुमा देवीचे पती श्री विठ्ठल यांचे चिंतन केलेस तर तुला सुखाच्या राशी मिळतील असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *