ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.176

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
 प्रकरण :-७ वे, बाळक्रीडा अभंग १७६

हरिप्रेम सरोवरी । क्रीडती ये मदनकुहरी । प्रेम सरोवरी ये ॥१॥ चांदिणे निर्मळ । चंदने धवळतिये ।

पैल वृदांवनी वासुगा गोविंदु खेळतिये ॥धु ॥ प्रकृति भक्ति परमातु । मातु मा परमहंसु । ज्ञानदेवो म्हणे निवृत्तिदासु ॥२॥

अर्थ:-
श्रीकृष्णावर असलेले प्रेम हे सरोवर व मदनाची गुहा आहे असे त्या गोपींना वाटुन त्या त्याच्या जलक्रीडा करत आहेत. त्यावेळी कृष्णप्रेमाचे लख्ख टिपुर चांदणे पडले आहे. व अंगाला प्रेमाचे चंदनी उटणे लावले आहे

अशा थाटात तुळशी वृदांवनात असलेल्या कृष्णासोबत त्या गोपिका क्रिडा करतात. तो कृष्ण व गोपींचा खेळ परमहंस स्थितीत पोहचलेल्या निवृतीदास माऊलीनी सांगितला आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *