ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.९३

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग ९३

अनंत नामाचे पाठांतर । रामकृष्ण नाम निरंतर । सर्व सुखाचे भांडार । हरि श्रीधर नाम वाचे ॥ हरिनाम गजर खरा । येणें तूं तरसील सैरा । जन्म जुगाच्या येरझारा । खंडती एक्या हरिनामे ॥ अनंत

तीर्थाचे मेळ । साधलिया हरिनाम कल्लोळ । पूर्वजांसहित अजमेळ । उध्दरिला सहपरिवारे ॥ कोटी जन्मांचे दोष । हरतील पातके जातील निःशेष । अंती होईल वैकुंठवास । कोटि कुळांसी उध्दार ॥ हें

योगियांचे निजजीवन । रामकृष्ण नारायण । येणें जगत्रय होय पावन । हरिस्मरण जीवांसी ॥ ज्ञानदेवीं घर केले । हरि ऐसें रत्न सांठविले । शेखी कोटिकुळा उद्धरिले । हरि हरि स्मरिले निशीदिनी ॥

 अर्थ:-

 परमात्म्याची अनंत नामे आहेत पण निरंतर रामकृष्ण हेच सुखाचे भांडार असुन मुखात श्रीधराचे नाम सतत यावे.ह्या हरिनामाचा गजर करुन तु सैराट राहणारा तरशील तुझ्या जन्मोजन्मीच्या येरझारा एका हरिनामामुळे संपतील.एका हरिनामात अनंत तीर्थे एकत्रीत आहेत

व त्याच नामामुळे पुर्वजांसहित परिवारासह पापी अजामेळा तरला. कोटी जन्माचे पाप जाईल व अनंत पातकांचे हरण निशेष होईल व त्याच योगे कोटी कुळांचे उध्दारण होऊन वैकुंठ प्राप्त करु शकतील.ह्या हरिस्मरणामुळे त्रिभुवन पावन होईल. रामकृष्ण नारायण ह्या

नामामुळे तो योग्यांचे जीवन झाला आहे. घर करुन त्यात हरिनामरत्ने साठवली व दररोज हरिनामाचे स्मरण करुन कोटी कुळांचे उध्दरण करुन घेतले असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *