७ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!!   श्रीकृष्ण   !!! भाग – ७.

कृष्णाला आठवले,एक दिवस नंदांनी सांगीतले होते की,या व्रजाच्या उत्तरेस योजन दूर एक विषारी डोह असुन तिथे कालिया नांवाचा मोठा नागराज कुटुंबासहित राहत असल्याने डोहाचे पाणी विषारी झालेले आहे, त्या मुळे त्याबाजुस जाऊं नका. संथपणे गाई कुरणांत चरत होत्या. बरोबरचे गोप बरेच मागे राहिले होते. कृष्णाने गंभीरपणे मना शी कांही ठरविले.कालियाच्या फुत्काराने जळुन वठलेल्या कदंबवृक्षावर चढुन डोहावर लोंबकळणार्‍या शेंड्यावरील आडव्या फांदीला धरुन प्रचंड आरोळी ठोकत डोहात उडी घेतली.त्याच्या उडीने

तो प्रचंड डोह खळबळुन गेला.जणुं प्रलयच! आधीच्या कृष्णआरोळीने व आतां उडीने उसळलेल्या पाण्याने आंत असलेला, भयंकर रागाने,अति प्रशस्त पांच फण्याचा कालिया नाग क्रोधाने फुस्कारत खळबळुन वर आला.त्याची बायका मुलेही विषारी फुत्कार काढत पाण्यावर आले.सर्व पाणी विषमय झाले. त्या खवळलेल्या सर्वानी कृष्णाला आपल्या वेटोळ्यांनी जखडुन टाकल्याने त्याला बिलकुल हलता येत नव्हते.

तेवढ्यात कृष्णाला शोधत गोप आले मात्र, समोरचे भयानक दृष्य पाहुन ते सारे गर्भगळीत होऊन, ओरडत,वेगाने पळतच वज्राकडे गेले.हा हां म्हणता कालिया व सर्व सापांने कृष्णाला वेढल्या ची बातमी ऐकुन वज्रामधे हाःहाकार माजला.नंद-यशोदेला सांभाळत सर्व गोप धावत सुटले.श्रीकृष्णाला कांही होणार नाही,विष्णुचे स्मरण करा,असं बलराम सर्वांना समजावत होता.तिथे पोहोचल्या वर समोरचे विदारक दृष्य पाहुन शोकमग्न यशोदा तर प्राण त्यागण्यासाठी डोहाकडेच धाव घेतली,इतरांचीही वेगळी अवस्था नव्हती. सर्वांची शोकमग्न स्थिती पाहुन बलराम कृष्णाला म्हणाला….

हे महाबाहो श्रीकृष्णा! अरे हे, मानव बुध्दी गोपबांधव तुला त्यांच्यासारखाच साधारण मानव समजत असल्यामुळे अत्यंत शोकाकुल झालेत,त्यांचा जास्त अंत न पाहतां या विषमय सर्पाचे दमन कर!बलरामाचे खुणेचे शब्द कानी पडतांच,कृष्णाने शरीराभोवतालचे वेष्टण लिलया तोडुन मुक्त झाला व नागाच्या मधल्या मस्तकावर आरोहण करुन नाचु लागल्याने,मर्दनाने त्या भुजंगाला अतिशय वेदना होऊन तोंडातुन रक्त पडु लागले.भयभित नागराज कालिया श्रीकृष्णाला शरण जाऊन म्हणाला,देवा! मी तुझे सत्यरुप ओळखले नसल्यामुळे माझेकडुन आगळीक झाली.मला जीव दान दिल्यास,तुझ्या आज्ञेप्रमाणे वागेन. तर मग,तू परिवारासह तात्काळ हा डोह सोडुन सागरात रहायला जा.लगेच त्याने मान्य केले.त्याला आशिर्वाद देत कृष्ण म्हणाला,हे सर्पराजा तुझ्या मस्तकावर माझी पाऊलं उमटल्यामुळे पन्नगांचा शत्रु गरुड तुझ्यावर कधीच प्रहार करणार नाही.कृतकृत्य झालेला कालिया नाग कृष्णचरणांवर नतमस्तक होऊन,परिवारा सह निघुन गेला.

आणि श्रीकृष्ण डोहातुन तिरावर येऊन उभा राहिला.त्याच्या अद्भुत अलौकिक कृत्यांनी स्तंभीत झालेले गोप गोपींनी त्याला प्रदक्षिणा घालुन त्यांनी मनोभावे नमस्कार केला.विनयाने कृष्ण म्हणाला,तुम्हा सर्वांच्या निष्काम प्रेमाच्या बळावरच मी हे अद्भुत कृत्य करुं शकलो आतां या यमुनेचे पाणी पुर्णपणे स्वच्छ, निर्दोष,निर्मळ व तृष्टीपुर्ण आहे असे म्हणुन तो नंदाजवळ गेल्यावर,नंदाने त्याला दृढालिंगन देऊन छातीशी धरले,

नेत्रातुन आनंदाश्रु वाहुं लागले….
वृंदावन वज्रात समवयस्क गोपां बरोबर बलराम-कृष्णांचे दिवस मोठ्या आनंदात जात होते.गाई चारण्यासाठी वनांत जाऊन यमुना किनारी दूरवर जात. विकटप्रसंगी एकमेकांना इशारा देण्या साठी गोप सवंगडी शिंग वाजवित तर, कृष्ण वेणुचे सूर आसमांत घुमत.त्यांचा आवडता खेळ कुस्त्या… विविध आखा ड्यात मल्ल कुस्तींची स्पर्धा लावीत.ही स्पर्धा मोठ्या अटीतटीची व प्रसंगी प्राणां तिक सुध्दा होई.बलरामला तर या मल्ल विद्येची जात्याच आवड होती.पण कृष्ण ही या कलेत निपुण होता.कालिया सर्पा चा विलक्षण प्रसंगा घडल्यापासुन सगळे गोपसखे कृष्णाशी मोठ्या प्रेमाने पण भितियुक्त आदराने वागत.
एक दिवस कृष्णाचे सोबती येऊन सांगु लागले इथुन उत्तलेस तालबन नावा चे सुंदर अरण्य भरगच्च ताडवृक्षांनी बहरले आहे पण कृष्णा तिथे माणसांना प्रवेश वर्ज्य आहे.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *