एकादशी अभंग, वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Ekadashi che Abhang
एकादशीचे अभंग
खाली द्वादशीचे अभंग आहेत.
एकूण एकादशीचे ६, द्वादशीचे ७, क्षीरापतीचे ४, अभंग आहेत.

स्मार्त व भागवत एकादशी म्हणजे काय ?
कोणी कोणती एकादशी करावी ?
एकादशी अभंग पाहा.
द्वादशी अभंग पहा.
क्षिरापती अभंग पहा
एकादशी व्रताचे फळ, व विधी पहा
२६ एकादशी महात्म्य पहा.

-: एकादशी व्रताचे नियम :-
दशमीला एकाच वेळी जेवण करावे,
एकादशीला निराहार म्हणजे काहीच खाऊ नये,
रात्रभर हरिजागर, कथा, किर्तन, सत्संग करावे.
शक्य असल्यास प्रदक्षणा करावी, अनवाणी राहावे, मौन धरावे.
द्वादशीला एकभुक्त म्हणजे एकाच वेळेस जेवण करावे तेही सूर्योदयाच्या अगोदर.

-: महत्वाची सूचना :-
एकादशीच्या जागराचे भजन न झोपता आपण रात्रभर भजन करत असतो,

द्वादशीचे सकाळी ब्रह्म मुहूर्तावर (४ :१५ मिनिटांनी) स्नान करावे, नंतर नित्याचा काकडा घ्यावा, व सूर्योदयाचे अगोदर नैवद्य तयार करून तो द्वादशीचे अभंग म्हणून भगवान परमात्म्याला द्यावा.

नंतर तो प्रसाद आपण ग्रहण करताना म्हणजेच उपवास सोडण्याची अगोदर क्षिरापती (खिरापती) चे अभंग सुद्धा म्हणावे, हे सर्व अभंग म्हणून मग सर्वांना प्रसाद द्यावा, अर्थात सर्वांनी उपवास सोडावा (भोजन करावे.)

स्मार्त व भागवत एकादशी म्हणजे काय ?
कोणी कोणती एकादशी करावी ?
एकादशी अभंग पाहा.
द्वादशी अभंग पहा.
क्षिरापती अभंग पहा
एकादशी व्रताचे फळ, व विधी पहा
२६ एकादशी महात्म्य पहा.

, , , ,


जागा रे गोपाळांनो रामनामी जागा।
कळिकाळ आकळा महादोष जाती भंगा ॥१॥
सहस्त्रदळ समान अनुहत ध्वनि उठी।
नामाचेनि बळें पापे रिघालीं कपाटीं ॥२॥
दशमी एक व्रत करा दिंडी दर्शन।
एकादशी उपवास तुम्ही जागा जागरण ॥३॥
द्वादशी साधन कोटीकुळे उध्दरती।
नामा म्हणे केशव ठाव देईल वैंकुठी ॥४॥

स्मार्त व भागवत एकादशी म्हणजे काय ?
कोणी कोणती एकादशी करावी ?
एकादशी अभंग पाहा.
द्वादशी अभंग पहा.
क्षिरापती अभंग पहा
एकादशी व्रताचे फळ, व विधी पहा
२६ एकादशी महात्म्य पहा.


दशमी व्रताचा आरंभु । दिंडी कीर्तन करा समारंभु।
तेणें तो स्वयंभु। संतोष पावे ॥१॥
एकादशी जागरण। हरिपूजन नामकीर्तन।
द्वादशी क्षीरापती जाण। वैष्णव जन सेविती ॥२॥
ऐसें व्रत तीन दिन। करी जो आदरें परिपूर्ण।
एकाजनार्दनी बंधन।
तया नाहीं सर्वथा ॥३॥


एकादशीस अन्नपान। जे नर करिती भोजन।
श्वानविष्ठे समान। अधम जन तें एक ॥१॥
ऐका व्रताचें महिमान। नेमें आचरती जन।
गाती ऐकती हरिकीर्तन। तें समान विष्णूशीं ॥२॥
अशुद्ध विटाळशीचे खळ। विडा भक्षितां तांबूल।
सांपडे सबळ ।काळाहातीं न सुटे ॥३॥
शेज बाज विलास भोग। करिती कामिनीचा संग।
तया जोडे क्षयरोग। जन्मव्याधी बळिवंत ॥४॥
आपण न वजे हरिकीर्तना। आणिकां वारी जातां कोणा।
त्याच्या पापें जाणा। ठेंगणा तो महामेरू ॥५॥
तया दंडी यमदूत। झाले तयाचें अंकित।
तुका म्हणे व्रत। एकादशी चुकलिया ॥६॥


पंधरा दिवसां एक एकादशी।
कां रे न करिसी व्रतसार ॥धृ॥ १ ॥
काय तुझा जीव जातो एका दिसें।
फराळाच्या मिसें धणी घेसी ॥२॥
स्वहित कारण मानवेल जन।
हरिकथा पूजन वैष्णवांचें ॥३॥
थोडे तुज घरी होती उजगरे।
देउळासी कां रे मरसी जाता ॥४॥
तुका म्हणे कां रे सुकुमार झालासी।
काय जाब देसी यमदूता ॥५॥


एकादशी व्रत सोमवार न करिती।
कोण त्यांची गति होईल नेणों ॥१॥
काय करूं बहु वाटे तळमळ।
आंधळी सकळ बहिर्मुख ॥२॥
हरिहरासी नाहीं बोटभरी वाती।
कोण त्यांची गति होईल नेणों ॥३॥
तुका म्हणे नाहीं नारायणी प्रीति।
कोण त्यांची गति होईल नेणो ॥४॥


एकादशी एकादशी। जया छंद अहर्निशी ॥१॥
व्रत करी जो नेमाने। तया वैकुंठीचे पेणे ॥२॥
नामस्मरण जागरण। वाचे गाय नारायण ॥३॥
तोचि भक्त सत्य साचा। एका जनार्दन म्हणे वाचा ॥४॥

स्मार्त व भागवत एकादशी म्हणजे काय ?
कोणी कोणती एकादशी करावी ?
एकादशी अभंग पाहा.
द्वादशी अभंग पहा.
क्षिरापती अभंग पहा
एकादशी व्रताचे फळ, व विधी पहा
२६ एकादशी महात्म्य पहा.


आम्हां देणे धरा सांगतों तें कानीं।
चिंता पाय मनी विठोबाचे ॥१॥
तेणें माझें चित्ता होय समाधान।
विलास मिष्टान्न नलगे सोनें ॥२॥
व्रत एकादशी द्वारी वृंदावन।
कंठी ल्यारे लेणे तुळसीमाळा ॥३॥
तुका म्हणे त्याचे घरींची उष्टावळी।
मज तें दिवाळी दसरा सण ॥४॥

स्मार्त व भागवत एकादशी म्हणजे काय ?
कोणी कोणती एकादशी करावी ?
एकादशी अभंग पाहा.
द्वादशी अभंग पहा.
क्षिरापती अभंग पहा
एकादशी व्रताचे फळ, व विधी पहा
२६ एकादशी महात्म्य पहा.

, , , ,

एकादशी, द्वादशी, अभंग. विधी, नियम इत्यादी माहिती

एकादशी, द्वादशी, अभंग. विधी, नियम इत्यादी माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *