ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१५३

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

 ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १५३

सदा परिपूर्ण । तो हा जनार्दन । नित्य जपतां नारायण । कोटि याग घडतील ॥ एवढा महिमा नामाचा । काय जपशील वाचा । जो विठ्ठल म्हणे तो दैवाचा । ऐसा ब्रह्मा बोले पूर्वी ॥ तो नित्यकाळ पंढरी ।

आणि देव तेहतीस कोटी । वृक्ष झाले निरंतरीं । उद्धार करावया कुळाचा ॥ एवढं क्षेत्र पांडुरंग । तेथे उद्धरिलें हें त्रिजग । आनंदत ब्राह्मण याग । कोटिकुळें उद्धरती । कीर्तन केलीया वाळंवटी ।

घेता वैष्णवांची भेटी । होईल संसाराची तुटी । चरणरज वंदितां ॥ तुळशीच्या माळा । घालितां हरिदासाच्या गळां । तो न भिये कळिकाळा । त्यासी जिव्हाळा हरि विठ्ठल ॥ पंढरीसी जाऊं म्हणती ।

तयांकडे यम न पाहाती । तयांचे पूर्वज उद्धरती । म्हणती वैकुंठा जाऊ आता ॥ देव जाणे ऐसा । तोचि हरिदासा भरंवसा । ज्ञानदेव म्हणे परियेसा । थोर पुण्य तयाचें ॥

अर्थ:-

तो परिपूर्ण जनार्दन असुन त्या नारायणाला नित्य जपले तर कोटी याग घडतील. तो विठ्ठल दैवाचा असुन त्याचे नामाचा येवढा महिमा असुन तोच मंत्र वाचेने जप.ते ३३ कोटी देव वृक्ष होऊन आपल्या कुळाचा उध्दार करण्यासाठी पंढरीत राहिले आहेत.

हे सर्व क्षेत्र पांडुरंग असुन हे त्रिजग त्यामुळे उध्दरते ब्राह्मण आनंदात आहेत व कोटी कुळे तरतात. वाळवंटात कीर्तन केल्याने संतभेट होते व त्यांच्या चरणभेटीने संसाराची तुटी होईल.तुळशीच्या माळा हरिदास गळ्यात घालत्याने ते कळीकाळाला घाबरत नाही.

त्याला विठ्ठलाचा जिव्हाळा आहे. जे फक्त पंढरीला जातो म्हणतात.त्यांच्याकडे यम ही पहात नाही व ते थेट वैकुंठाला जातात. हे सर्व करणारा तोच देव आहे हरिदांसाचा भरवसा आहे. व जो त्याचे स्मरण करेल त्याचे थोर पुण आहे असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *