ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.११३

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

 ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग ११३

सोनियाचा दिवस आजि अमृते पाहाला । नाम आठविता रूपी प्रकट पै झाला ॥ गोपाळा रे तुझे ध्यान

लागो मना । आनु न विसंबे हरि जगत्रजीवना ॥ तनु मनु शरण विनटलो तुझ्या पायीं । बापरखुमादेविवरावाचूनि आनु नेणें कांहीं ॥

अर्थ:-

आजचा दिवस सोन्याचा आहे कारण नुसते नामस्मरण करायचे आठवले तर तो परमात्मा नामरुपानेच प्रगट झाला. हे गोपाळा तुझे ध्यान सतत माझ्या मनाला लागो तसे झाले

तर हे जगजीवना मी क्षणभर ही नामस्मरण करताना विसंबणार नाही. रखुमाईचे पती व माझे पिता श्री विठ्ठलाखेरीज मी अन्य ठिकाणी काय वाचा मनाने विनटलो नाही असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *