नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२९६४
करी आणिकांचा अपमान । खळ छळवादी ब्राम्हण । तया देतां दान । नरका जाती उभयतां ॥१॥
तैसें झालें दोघांजणां । मागतिया यजमाना । जाळियेलें वनां । आपणासहित कांचणी ॥ध्रु.॥
घडितां दगडाची नाव । मोल क्लेश गेले वाव । तरता नाहीं ठाव । बुडवी तारूं तरतीया ॥२॥
चोरा दिधला सांटा । तेणें मारियेल्या वाटा । तुका म्हणे ताठा । हें तंव दोघे नाडती ॥३॥
अर्थ
जो नेहमी इतरांचा अपमान करतो खळ म्हणजे जो दुष्ट आहे व इतरांना जो ब्राम्हण छळत असतो, त्याला कोणी दान दिले तर देणारा आणि घेणारा दोघेही नरकात जातात. अगदी त्याप्रमाणे दान देणारा दाता आणि दान मागणारा याचक हे दोघेही जर छळवादी दुष्ट आणि इतरांचे अपमान करणारे असतील तर तेही नरकाला जातात. अहो लाकडावर लाकडाचे घर्षण केले की अग्नी उत्पन्न होतो व ते लाकूड स्वत:ही जळते व इतरांनाही जाळते. जर दगडाची नाव तयार केली तर त्याचे मोलही वायाला जाते व केलेले कष्टही वायाला जातात. अहो ती नाव स्वत:ही तरु शकत नाही आणि त्याच्यात जे तरुन जाणारे आहेत त्यांनाही तारु शकत नाही उलट ती स्वत:ही बुडते व इतरांनाही बुडवतेच. तुकाराम महाराज म्हणतात, “जर एखादया चोराला आपण थोडयाशा धनासाठी सहकार्य करण्याचे ठरवले व त्याच्याबरोबर जाऊन चोरी केली तर ते दोघेही फसतात व दोघांनाही शिक्षा होते.”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
