२९६२, अभंग :- रत्नाच्या वोवणी कांचे ऐशा घरी । आव्हेरुनी दुरी अधिकारें:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.२९६२
रत्नाच्या वोवणी कांचे ऐशा घरी । आव्हेरुनी दुरी अधिकारें ॥१॥
जातिचा स्वभाव आला डोळ्यां आड । तया घडे नाड न कळतां ॥ध्रु.॥
कामधेनु देखे जैशा गाईम्हैसी । आणिकांतें ऐसी करोनियां ॥२॥
तुका म्हणे काय बोलोनियां फार । जयाचा वेव्हार तया साजे ॥३॥

अर्थ

एखादा मूर्ख मनुष्य त्याच्या अधिकाराने रत्नाची माळ काचे प्रमाणे समजून तिचा अव्हेर करुन तिला दूर फेकून देत असतो. खरा तर तो त्याच्या जातीचाच स्वभाव आहे असे समजावे कारण तो मूर्खच आहे व त्याला त्याचा मूर्खपणाच्या जातीचा स्वभावच डोळयाच्या आड आला व त्याला रत्नपरीक्षा झाली नाही त्यामुळे त्याचे व्यावहारीक नुकसान झाले आहे. ज्याप्रमाणे सामान्य गाई म्हशी असतात त्याप्रमाणे कामधेनूला तो सामान्य पशु समजून त्या कामधेनूला पाहात असतो, तुकाराम महाराज म्हणतात, “आता जास्त बोलून काय उपयोग आहे कारण जो जसा व्यवहार करतो तो त्याला शोभून दिसत असतो त्यामुळे चांगल्या वस्तू या चांगल्याच माणसाला समजत असतात.”

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading