नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२९५७
आहे ऐसा आतां आहे ठायीं बरा । ठेविलों दातारा उचितें त्या ॥१॥
वचनाचा भार पडिलिया शिरीं । झालें मग भारी उतरेना ॥ध्रु.॥
अबोल्याची सवे लावुनियां मना । फाकों नेदीं गुणा ऐसें करूं ॥२॥
तुका म्हणे आम्हां गोंवळ्याचा संग । राखावे तें अंग जाणतसों ॥३॥
अर्थ
हे दातारा मी जसा आहे तसा व ज्या ठिकाणी आहे तेथे बरा आहे कारण तुम्ही मला जसे ठेवले आहे तेच उचित आहे. देवा आता आमच्या बोलण्याचा भार तुमच्या शिरावर पडला आणि तो भार काही केल्याही उतरणार नाही. देवा त्यामुळे आता आम्ही आमच्या मनाला अबोला राहण्याची सवय लावू व तुमचे गुण आम्ही बाहेर पडू देणार नाही ते आमच्या हद्यातच आम्ही साठवून ठेवू. तुकाराम महाराज म्हणतात, “आता आम्हाला या गोपाळाची संगती लाभली त्यामुळे त्याची सेवा करण्यासाठी शरीर कसे राखावे हे आम्ही चांगले जाणतो आहोत.”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA