ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.298

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २९८

अनंती अनंत तत्त्वता तंव एक । विरुळा जाणे एक बिंबताहे ॥१॥
एका तेजी बहु बहु तेज दृष्टी । एकतत्त्व सृष्टि मेळु शिवीं ॥२॥
तर्काचाही तर्क विवेक सकळ । तेणेंवीण गोपाळ आकळेना ॥३॥
ज्ञानदेव जाणे प्रसाद निवृत्ति । मौनाची मुक्ति वाट आहे ॥४॥

अर्थ:-

परमात्मा अनंतस्वरुप आहे. त्याच्या ठिकाणी अनंत दृश्ये जरी भासली तरी खऱ्या अर्थाने एकच अनंत आहे. तो अनंतच सर्व जीवमात्रात प्रतिबिंबित झाला आहे पण असे जाणणारा पुरुष जगात विरळ आहेत. अपार तेजोराशी जो परमात्मा तोच

तेजोरुप सृष्टि बनला आहे. सर्व वेदवाक्यपूर्वक किंवा त्याला अनुकूल तर्क या साधनाशिवाय त्या परमात्म्याचे आकलन बुद्धिस होत ना. ही मौनरुप मुक्तिची वाट श्रीनिवृत्तीरायाच्या प्रसादाने मी जाणतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *